आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१

गणेशोत्सवात नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे

अलिबाग : पुढील काही दिवसांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या लाटेची गरोदर स्त्रिया व लहान मुलांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोस्तवात नागरिकांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक असलेल्या तोंडाला मास्क बांधणे, वेळोवेळी सॅनिटायझरने हात साफ करणे, सोशल डिस्टसिंग या त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. तसेच ताप, सर्दी, खोकला आजार असलेल्या रुग्णाने शासकीय रुग्णालयात अॅटींजन व आर.टी.सी.पी.आर. चाचणी करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

  जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आली आहे. मात्र तरीही दिवसभरात जिल्ह्यात १००हून अधिक कोरोना रुग्ण सोडत आहेत. पुढील काही दिवसांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यातच पुढील काही दिवसांमध्ये गणेशोस्तव सुरू होणार आहे. जिल्ह्यात घराघरात गणेशोस्तव मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी साजरा करण्यात येतो. मात्र सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता उत्सवादरम्यान नागरिकांनी गर्दी करू नये, तसेच शासनाने सुचविलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही डॉ. किरण पाटील यांनी सांगितले आहे.

  ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, चव नसणे, वास न येणे ही कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत. ही लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी त्वरित अँटींजन व आर.टी.सी.पी.आर. चाचणी करणे गरजेचे आहे. ताप, सर्दी, खोकला किंवा इतर कोरोनाची लक्षणे असणारा एखादा रुग्ण एखाद्या खासगी डॉक्टरांकडे तपासणी करण्यासाठी जातात. अशावेळी खासगी डॉक्टरांनी रुग्णाला त्वरित अँटींजन व आर.टी.सी.पी.आर. चाचणी करण्याचा सल्ला देणे गरजेचे आहे. कोरोना आजाराला रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्क वापरावा, सोशल डिस्टंसिंगचे‌ पालन करावे, सॅनिटायजरचा वापर करावा, असे आवाहन डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

..............

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील गावांच्या विकासकामांचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी घेतला आढावा

अलिबाग :- महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील समाविष्ट 22 ग्रामपंचायतीच्या विकासकामाची आढावा बैठक काल (दि.30 ऑगस्ट 2021) रोजी जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात घेण्यात आली. 

     या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, महाराष्ट्र सामाजिक ग्रामपरिवर्तन अभियानाचे जिल्हा कार्यकारी अधिकारी रत्नशेखर गजभिये, तालुका समन्वयक  धनंजय पाटील,  दत्तात्रय गायकवाड,अवधूत पाटील व श्रीराम पन्हाळकर उपस्थित होते.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील समाविष्ट गावांच्या विकासकामे तसेच प्रलंबित कामांबद्दल माहिती घेण्यात आली. तसेच पुढील काळात इतर विभागांच्या सहकार्याने गावातील सामाजिक विकास करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी मार्गदर्शन केले.

     यावेळी उपस्थित महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन चे जिल्हा कार्यकारी अधिकारी रत्नशेखर गजभिये व तालुका समन्वयक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांना तालुक्यातील गावातील उद्दिष्टांबद्दल सविस्तर माहिती दिली.या बैठकीत मनरेगामधील कामांचा महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तनमध्ये समाविष्ट असलेल्या गावांसाठी प्राधान्याने उपयोग, अभियानातील  गावांतील लोकांचे 100% कोविड लसीकरण,स्वदेशच्या माध्यमातून आधी निवडलेल्या गावांव्यतिरिक्त इतर गावांचा समावेश व तळागाळातील लोकांनाही या अभियानाचा लाभ, या अभियानांतर्गत उपजीविका साधने व उदरनिर्वाह होण्याकरिता महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच मनरेगाच्या माध्यमातून सहकार्य, महसूल विभागाच्या ई-पीक पेरा योजनेबाबत अभियानातील गावांमध्ये प्रबोधन करून मोहीम यशस्वी करणे,माझं गाव सुंदर गाव ही योजना यशस्वी करणे, महिला सक्षमीकरण, बचतगट निर्मिती, गटविकास अधिकाऱ्यांच्या समन्वयातून समृद्धी बजेट बनविणे आदि विषयासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

     या बैठकीच्या निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. किरण पाटील यांनी अभियानातील सर्व गावांमध्ये मनरेगा अंतर्गत श्रमदान, 15 वा वित्त आयोग, सीएसआर फंड व सामाजिक संस्थांच्या मदतीने लोकांना लाभ मिळावा,याकरिता कामे करण्यासंदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले तसेच विविध विभागांतर्गत प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, अशा सूचना केल्या.शेवटी श्री.रत्नशेखर गजभिये यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची ऑनलाईन बैठक संपन्न ; नागरिकांच्या विविध प्रश्नांवर घडली साधक-बाधक चर्चा

रायगड :- जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक काल (दि.30 ऑगस्ट 2021) रोजी "वेब एक्स" या दूरदृष्य प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. 

       या बैठकीस समितीचे शासकीय सदस्य या नात्याने जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके,सहाय्यक आयुक्त (अन्न) लक्ष्मण दराडे, जिल्हा वजनमापे नियंत्रक राम राठोड, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजित पिंगळे, पोलीस अधीक्षक कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, स्टेट बँक ऑफ इंडिया या शासकीय कार्यालयाचे प्रतिनिधी हे शासकीय सदस्य तर प्रा.डॉ.संगिता चित्रकोटी, पत्रकार उद्धव आव्हाड, गणेश भोईर, विनायक सारणेकर, सचिन पिंगळे, यशवंत बागूल, डॉ.फरीद चिमावकर, अनंत गुरव, स्नेहा येरुणकर, प्रशांत बच्छाव, अमित कांबळे, नागेश वाकडे, संदीप चाचले, मकरंद जोशी हे अशासकीय सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.

      बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले व अशासकीय सदस्यांना त्यांच्या जिल्हा ग्राहक संरक्षण संबंधीच्या अडीअडचणी तसेच काही सूचना असल्यास त्या मांडण्याबाबत विनंती केली.यानुषंगाने नागरिकांच्या रेशन कार्ड, बँक खाते, जनधन अकाउंट, मिठाई किंवा तत्सम दुकानातील अन्न भेसळीचे प्रकार, महावितरणची देयके इत्यादी विषयांबाबत ग्राहकांच्या छोट्या-मोठ्या समस्यांविषयी समिती सदस्यांनी साधक-बाधक चर्चा केली. तसेच ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनीही आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ राबविण्याविषयी, कार्यवाही करण्याविषयी  आश्वस्त केले.

    याशिवाय करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर सर्व नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून स्वतःचे, कुटुंबाचे आणि समाजाचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचे मत सर्वांनी मांडले. त्या दृष्टीने प्रशासन आणि जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य मिळून नागरिकांचे प्रबोधन करतील,असेही सर्वानुमते ठरले.या ऑनलाईन बैठकीच्या संपूर्ण समन्वयाची जबाबदारी जिल्हा पुरवठा शाखेच्या श्रीमती मयुरा घरत यांनी उत्तमरित्या सांभाळली.

    बैठकीच्या शेवटी जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी उपस्थित सर्व शासकीय व अशासकीय समिती सदस्यांना पुढील काळात येणाऱ्या सण-उत्सवानिमित्त शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानले.

आता रुग्णालय प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार ; विद्युत दोषांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी

आदर्श वार्ताहर वृत्तसेवा,मुंबई- कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. 

काही महिन्यांपूर्वी भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून बालकांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे नागपुरातील वाडी परिसरातील खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांना प्राण गमवावे लागले. या आगी लागण्याचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले जात असल्याने रुग्णालयातील वीज पुरवठ्याच्या संदर्भात अधिक काळजी व उपाययोजना करण्याचे निर्देश राज्य सरकारने शासकीय व खासगी रुग्णालयांच्या संचालकांना दिलेले आहेत. कोविड काळात रुग्णालयातील वीज पुरवठा सुरळीत ठेवणे, जनित्र संच तसेच इन्व्हर्टरच्या माध्यमातून अंतर्गत वीज पुरवठा उपलब्ध करणे, ऑपरेशन थिएटर, आयसीयू येथील वातानुकूलित यंत्रणा सुसज्ज ठेवणे, विद्युत उपकरणांची निगा व देखभाल योग्यरितीने करण्याच्या संदर्भात रुग्णालयांना शासनाने दिशानिर्देश दिलेले आहेत. 

रुग्णालयात अंतर्गत वीज संचमांडणीच्या सुरक्षेसोबतच वीज पुरवठ्याची अखंडता तेवढीच महत्त्वाची आहे. अखंडीत वीज पुरवठा राखण्याची रुग्णालय प्रशासन तसेच पुरवठादार कंपनीची सामुहिक जबाबदारी राहणार आहे. उच्चदाब व मध्यमदाब फिडर्सची नियतकालिक पेट्रोलिंग व पाहणी करणे, रुग्णालयातील वीज भार मंजूर भारापेक्षा अधिक राहणार नाही, याची तपासणी करणे केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनियम, २०१० नुसार वीजसंच मांडणी राखणे अनिवार्य आहे. १५ मीटरपेक्षा उंच इमारतीतील रुग्णालयांनी विद्युत सुरक्षिततेच्या दृष्टीने अंतर्गत वीज संचमांडणीचे निरीक्षण विद्युत निरीक्षक मार्फत ''ना हरकत प्रमाणपत्र" मार्गदर्शक सूचना निर्गमित झाल्याच्या एक वर्षाच्या आत प्राप्त करून घेणे बंधनकारक केले आहे. या इमारतींचे फायर ऑडीट नियमितपणे सक्षम संस्थेमार्फत करून अग्नी सुरक्षाप्रणाली प्रमाणित करावी लागणार आहे. 

    आयओटी तत्वावर चालणारे मायक्रोकंट्रोलर संयंत्र अंतर्गत वीज संरचना मांडणीमध्ये निर्माण होणाऱ्या दोष किंवा असामान्य बाबींचे विश्लेषण करून दोष निदान करणे शक्य होते. वीज संच मांडणीच्या संरचनेमध्ये उपलब्ध होणारी माहिती एकत्रित करून त्याचे विश्लेषण करू शकणारे एन.ए.बी.एल. टेस्टिंग लॅबद्वारे प्रमाणित असे आयओटी तत्वावर चालणारे मायक्रोकंट्रोलर सयंत्र सर्व शासकीय व खासगी रुग्णालये तसेच सार्वजनिक इमारतींमध्ये बसविण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. तसेच शासकीय, खासगी रुग्णालये आणि सार्वजनिक इमारतींच्या परिसरात कार्यरत असलेल्या उद्वाहनामध्ये होणारे अपघात टाळण्यासाठीच्या मार्गदर्शक उपाययोजनाही या परिपत्रकानुसार जारी करण्यात आल्या आहेत. 


रुग्णांच्या जीवन सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य- डॉ. नितीन राऊत

   कोरोना काळात शासकीय व खासगी रुग्णालयांवर बराच ताण होता. त्याचप्रमाणे वीज उपकरणांची निगा व देखभाल योग्यरितीने न राखल्याने या अनुचित घटना घडल्या आहेत. शासकीय व खासगी रुग्णालयातील वीज पुरवठा योग्य राहावा, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या जीवन सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य राहावे, या उद्देशाने राज्य सरकारने हे निर्देश जारी केले असल्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

निसर्गकन्या, साहित्यिक बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती उत्साहात साजरी

आदर्श वार्ताहर वृत्तसेवा,मुंबई- बहिणाबाई साहित्य संस्था डोम्बिवली   साहित्य जागर मंच मुंबई  आयोजित दिनांक २९ ऑगस्ट रोजी निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी जयंती कार्यक्रम ऑनलाईन उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यांनतर  माझी माय सरसोती हे काव्य धनश्री महाजन हिने सादर केले.साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. नि. रा. पाटील व डॉ. चंद्रशेखर भारती यांना साहित्य गौरव सन्मान प्रदान करून गौरवण्यात आले.डॉ. नि. रा. पाटील व डॉ.चंद्रशेखर भारती यांनी आपल्या मनोगतातून बहिणाईचे साहित्य हे लिहिणाऱ्याला नेहमी नवनिर्मितीची प्रेरणा देणारे आहे असे मत मांडले. यानंतर विविध कवी, लेखक, रसिक यांनी काव्य, विचार सादर केले. कार्यक्रमाचे निवेदन तसेच संपूर्ण तयारी प्रदीप कासुर्डे सर यांनी केली होती.

  यावेळी अनमोल खजिना पुस्तक प्रकाशनाबद्दल लिलाधर महाजन यांचा ही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात, कवी राजेश साबळे,कवी अजय सोंडूलकर,कवयित्री लता पाटील, भाग्यश्री महाजन, आरती मूळे, कादंबरीकार पंढरीनाथ कोळी,महेश साळवे तसेच इतर मान्यवर रसिक उपस्थित हॊते.

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.)चेंबुरतर्फे जिल्हा परिषद शाळा, लेंडी पाडा,पो. सायबान केंद्र भाताने येथे स्वाध्याय पुस्तिका, वह्या, शैक्षणिक साहित्य, गोष्टींची पुस्तके आणि कपाट वाटप

मुंबई(शांत्ताराम गुडेकर) -सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था. या संस्थांची संघटना एका विशिष्ट हेतूने व उद्दिष्टासाठी केलेली असते आणि त्यांत काम करणारे स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींत सापडलेल्यांना साहाय्य करतात; प्रसंगी आर्थिक मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळतर्फे गेली अनेक वर्षे केले जात आहे.सामाजिक बांधिलकीचा वारसा अखंडपणे जपत आलेल्या पंचरत्न मित्र मंडळातर्फे रविवारी जिल्हा परिषद शाळा, लेंडी पाडा,पो. सायबान केंद्र भाताने, ता. वसई, जि. पालघर ,येथे स्वाध्याय पुस्तिका, वह्या, शैक्षणीक साहित्य, गोष्टींची पुस्तके आणि कपाट वाटप कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री.अश्विन कांबळे(वरिष्ठ प्रबंधक -आरसीएफ), तसेच विशेष पाहुणे श्री. डी. एफ. निंबाळकर (महासचिव - सैनिक फेडरेशन महाराष्ट्र) तसेच पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.अशोक भोईर, सचिव श्री प्रदीप गावंड तसेच मंडळाचे पदाधिकारी वैभव घरत, हनुमंता चव्हाण, एम डिसोझा, डी. एम. मिश्रा, रहीम शेख, संतोष नाईक,रमेश पाटील, संदीप पाटील, मंदार भोपि आदी मान्यवर   उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील मेस्त्री यांनी तर आभार प्रदर्शन अशोक भोईर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाला मदत करणारे देणगीदार, शुभचिंतक, तसेच सर्व कार्यकर्ते यांचे मंडळाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले. यापुढेही आपले असेच सहकार्य मंडळाला लाभेल या अपेक्षाही यानिमिताने व्यक्त करण्यात आली.नोकरी,व्यवसायाच्या निमित्ताने कोकण सोडून मुंबईत आलेल्या मात्र कोकणाचे म्हणजेच आपल्या जन्मभूमी ऋण फेडण्यासाठी सामाजिक,शैक्षणिक ,वैद्यकीय ,पर्यावरण क्षेत्रात सातत्याने गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष-अशोक भोईर ,सचिव प्रदिप गावंड,खजिनदार सचिन साळुंखे  यांच्या प्रयत्नाने  अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. मंडळाची स्थापना २००६ मध्ये करण्यात आली असून आजपर्यंत मंडळाच्यावतीने  मुंबईसह उपनगरात व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अनाथश्रम,वृध्दाश्रम व खेडेगावातील तसेच आदिवासी भागातीलशाळांमध्ये शालेय साहित्य वाटप व आरोग्य शिबिर आणि वृक्षारोपण तसेच विविध स्पर्धांचेही आयोजन केलेले आहे. कोविड-१९ काळातही लाँकडाऊन सुरु झाल्यापासून अनेक ठिकाणी अन्नधान्य वाटप करण्यात आले. यापुर्वीही चेंबुर येथील वाशी गाव,मुंबई-७४ येथेही अन्नधान्य व मास्क वाटप करण्यात आले.प्रस्तावना करताना सांगितले की, पंचरत्न मित्र मंडळाने आजवर महाराष्ट्रात विविध ठिकाणी आवश्यकच तेथे मदतीचा हात सातत्याने दिला आहे.देत आहे न यापुढेही देत राहिल. मंडळाचे कार्यकर्ते समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेने सतत मदतीचा हात देत असतात.प्रत्येकाने गरजूंना मदत करावी ही मदत करत असताना जो आनंद मिळतो त्याची तुलना होऊ शकत नाही.तर प्रमुख पाहुणे आर.सी.एफचे वरिष्ठ प्रबंधक अश्विन कांबळे  यांनी मंडळ राबवित असलेल्या या उपक्रमांचे कौतुक केले.शासनाने घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकाने पालन करा.स्वःता सुरक्षित रहा व इतरांनाही सुरक्षित ठेवण्याचा मोलाचा सल्ला यानिमिताने दिला.कोविड-१९ चे सर्व नियमानुसार हा वाटप कार्यक्रम अंत्यत साधेपणाने पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ पदाधिकारी,सदस्य व सभासद,हितचिंतक यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अशोक भोईर यांनी करुन कार्यक्रमाची सांगता केली.

विनिता रामटेके यांचा शोधनिबंध सादर

 

कोकण :डॉ तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय मार्गताम्हानेची विद्यार्थिनी ,रानवी -गुहागर येथील  विनिता रामटेके हिने स्कुल ऑफ आर्टस्, हयूम्यॅनिटीज अँड सोशल सायंसेस, इंडियन सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंग्लिश ल्यांग्वेज अँड लिटरेचर,रेव्हा युनिव्हर्सिटी इंडिया आणि लिव्हरपुल युनिव्हर्सिटी लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन अंतराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये Annabhau Sathe's Fakira: An Epitome of Culture and Psyche या विषयावरती शोधनिबंध सादर केला. तीला इंग्रजी विभागाचे प्रा डॉ सुरेश सुतार यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्धल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजयकुमार खोत व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

ओवली (दसपटी) या खेडेगावातील आदिवासी पूरग्रस्त गावकऱ्यांना रिटेनमायेर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (जे.आर.एस.फार्मा )या कंपनीच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मुंबई(शांत्ताराम गुडेकर)- महाड,पोलादपूरसह चिपळूण मध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने तेथील अनेकांची घरे पुरात सापडली तर अनेकांचा नाहक बळी गेला.पूरग्रस्त भागातील नागरिकांचे मोठे हाल सुरू असल्याने राज्यातून ठिकठिकाणाहून मदत कार्य सुरू आहे. चिपळूण येथील ओवली (दसपटी) या खेडेगावातील आदिवासी पूरग्रस्त गावकऱ्यांना  रिटेनमायेर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड(जे.आर.एस.फार्मा )या कंपनीच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.मदतीत चटई १२०नग, चादर १२० नग, ब्लँकेट १२० नग,ताडपत्री ८० नग व औषधे याचा समावेश होता.ही मदत चिपळूण मधील पूरग्रस्त अशा योग्य ठिकाणी पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी मदत करणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र चिपळूण शाखेच्या कर्मचारी सौ.आशा सुहास लोवलेकर यांनी मोलाचे सहकार्य केले.ओवली गावातील ७५ वर्षीय सरपंच सौ.पवार व माजी सरपंच श्री. शिंदे व अजय शिंदे यांची या वस्तूंचे शिस्तबद्ध पध्दतीने वाटप करण्यास खुप मदत झाली.यावेळी जे.आर.एस फार्मा ठाणेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री.रोहित राऊत,श्री संजीव चव्हाण, श्री.रवींद्र भोसले, श्री.आदिनाथ अमुप आणि सुभाष कोकणे यांनी विशेष परिश्रम घेतले.जे.आर.एस.फार्मा ठाणे यांनी कर्तव्य समजून दिलेला मदतीचा हात लाखमोलाचा असल्याचे मत अनेकांनी यावेळी  व्यक्त केले.आवश्यक साहित्य व औषधे वाटप केल्यामुळे अनेकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.ग्रामस्थांनी या टिमचे मनापासून आभार व्यक्त केले.

कोकण सुपूत्र राहुल भडवळकर यांच्या रेकॉर्डिंग स्टुडिओचा उद्घाटन सोहळा संपन्न !

मुंबई :(दिपक  कारकर)- जीवनात प्रत्येक व्यक्तीच्या अंगी अवगत असलेल्या विविध कला त्यास कधीच गप्प बसु देत नाही,मात्र जिद्द,मेहनत,घेण्याची आवड असणाऱ्या व्यक्तींना हे यश निश्चितच मिळते.कोकण भूमीतील अनेक सुपुत्र आज स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा मुंबई सारख्या शहरात उमटविताना दिसत आहेत.असंच एक चिपळूण तालुक्यातील डुगवे गावचे भूमिपुत्र राहुल रामचंद्र भडवळकर या रंगभूमीवरील हौशी कलाकाराने चक्क मुंबईत आपलं स्वतःचं "एक धडपड रंगभूमीसाठी" असं ओम साई म्युझिक स्टुडिओ या नावाने - अवेरे बंधू चाळ,महाराष्ट्र नगर,आप्पापाडा मालाड ( पूर्व ) येथे उभारले आहे आणि याचा उद्घाटन सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दि.२९ ऑगस्ट २०२१ रोजी संपन्न झाला.

   आई-वडिलांच्या संस्कारातून वाढेलला राहुल मुंबईत वास्तव्य करताना आपला कौटुंबिक उदरनिर्वाह करता-करता लोककलेची प्रचंड आवड असणाऱ्या या कलाकाराने आपली खरी सुरुवात नमन/जाखडी कलेतून केली.सर्वप्रथम ओम साई नमन नाट्य मंडळ,( मालाड - पूर्व ) यामधून त्यांनी कलाकार भूमिका साकारली. त्यांना शाहिर राजेंद्र टाकले यांनी मार्गदर्शन करत या कलाकाराला घडवले.गेले कैक दिवस स्वतःच मुंबईत रेकॉर्डिंग स्टुडिओ निर्मित करून एक व्यावसायिक सुरुवात आणि त्याचबरोबर मुख्य हेतू नवोदित गायकांना अल्प खर्चात व्यासपीठ निर्माण करण्याचे स्वप्न त्यांचं प्रत्येक्षपणे साकार केलं आहे.

    या स्टुडिओची निर्मिती करताना माझे जन्मदाते आई-बाबा व कलेतील सोबती दिनेश,प्रविण, सुहास,रुषाल,सुशांत,निलेश,सिद्धेश,अंकित,जयेश व मित्र परिवार यांनी मोलाचं योगदान दिले व हा स्टुडिओ उभा राहिला असे राहुल याने बोलताना सांगितले.या सोहळ्याला शाहीर विकास लांबोरे,शाहीर तुषार पंदेरे,शाहीर सचिन धूमक,शाहीर प्रविण कुळये,संगितकार बेंजो मास्टर सतीश साळवी,ऑक्टोपॅड वादक - स्वप्नील गुरव,युवा समाजसेवक दीपक कारकर,कलाकार प्रशांत पाष्टे आणि मित्रमंडळी यांची उपस्थिती होती.कलाकारांना स्फूर्ती देणाऱ्या राहुल भडवळकर यांच्याबद्दल अनेकांनी शब्दसुमनांनी स्तुती करत त्यांस पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या.

लायन्स क्लब तर्फे शेकडो रोपांची लागवड

पनवेल : लायन्स क्लब पनवेल रत्नाच्या वतीने धोदाणी जवळील चिंचवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी आंबा,कांचनार,करंज आदी शेकडो रोपांची लागवड करण्यात आली.

    सदर कार्यक्रमास लायन्स क्लब ऑफ पनवेल रत्नाचे अध्यक्ष प्रदीप भट्टाचार्य, गाव दत्तक योजनेचे अध्यक्ष विंग कमांडर राजेंद्र महानुभाव,महेश किनरे सचिव,सर्व्हिस चेअरपरसन   दिनेश करिपारा,सरपंच हर्षदा चौधरी,सोमनाथ चौधरी,लायन्स क्लबचे अन्य वरिष्ठ अधिकारी गण,रीजन चेअरपरसन दोनच्या ज्योती देशमाने,ट्रेव्हर मार्टीस,सरोज शर्मा,प्रकाश चराटकर,संजय गोडसे,हरी अरोरा,निर्मला अरोरा,फ्रान्सिस जोसेफ,रुपेश मेहता,सिंधू रामचंद्रन,हरनीश कौर सेठी,राजी सैनी,साई पिल्लई,उमा पिल्लई, निर्मला अरोरा,चंद्रा बोरा,रिनाक्षी बॉथियाल,रोहन देशमुख आदी मान्यवर , पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.   

    लायन्स क्लब तर्फे चिंचवाडी हे गाव दत्तक घेण्यात आले असून या उपक्रमांतर्गत या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय,शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, वृक्ष लागवड आदी उपक्रम राबविण्यात आले.या वेळी महिला सक्षमीकरण,मुलांना पोषक आहार,तरुण मुला मुलींसाठी प्रशिक्षण तसेच लहान मुलांसाठी शालेय शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे,शाळेचे छप्पर दुरुस्ती आदी कामाचे आश्वासन लायन्स क्लब तर्फे ग्रामस्थांना देण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिली जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट ; कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर घेतला आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा आढावा


अलिबाग:- कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज (दि. 30 ऑगस्ट) रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग येथे प्रत्यक्ष भेट दिली व येथील कामकाजाचा तसेच अडचणींचा आढावा घेतला.

    तज्ञांच्या मते कोविडची संभाव्य तिसरी लाट उद्भवू शकते. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणेने खबरदारीच्या उपाययोजनांबाबत नेमकी काय तयारी केली आहे, या तयारीच्या अनुषंगाने आणखी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, ऑक्सिजन पुरवठाबाबत काय तयारी आहे, आरोग्य यंत्रणेच्या काय अडचणी आहेत, या सर्व बाबींचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या पाहणी दरम्यान घेतला.

       यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल फुटाणे, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार विशाल दौंडकर, अलिबाग तहसिलदार सचिन शेजाळ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजकर,आरटीपीसीआर लॅबच्या समन्वयक डॉ.शितल जोशी घुगे, मेट्रन श्रीमती भोपी आदी उपस्थित होते.

परिवार सह्याद्री ट्रस्ट लि. कडून दिव्यांगजन बांधवांना निरामय आरोग्य विमा संरक्षण मिळण्याबाबतच्या मागणीचा विचार करावा -संजय पंढरीनाथ काळे व मित्र परिवार यांचे निवेदन

रायगड : परिवार   सह्याद्री ट्रस्ट लि. ने  भारतातील दिव्यांग जनबांधवांसाठी केलेले अप्रतिम महान उल्लेखनीय सामाजिक  कार्य कि जे सामाजिक न्याय व सक्षमीकरण भारत सरकार व नॅशनल ट्रस्ट अंतर्गत चालवलेली ‘निरामय आरोग्य विमा योजना’  ही ट्रस्ट ने केलेल्या  खडतर  प्रयत्नांनी यशस्वी झाली आहे.  

     सामाजिक महान अप्रतिम कार्याचे मूल्यांकन करणे दिव्यांग जन बांधव आणि त्यांचे परिवार यांना शक्य नाही किंवा त्यासाठी  शब्दच नाहीत.  निरामय आरोग्य विमा योजनेअंतर्गत एक ०१.आत्ममग्न ०२.मेंदूचा पक्षघात ०३. मतिमंद ०४. बहुविकलांग या चार प्रकारच्या दिव्यांग  जन बांधवांना नॅशनल ट्रस्ट अंतर्गत या सुवर्ण योजनेचा फायदा मिळत आहे. परंतु या सर्व बाबींचा योग्य असा विचार विनिमय करावा.

   सर्व दिव्यांगजन बांधवांचे एकूण एकवीस प्रकार आहेत.  त्यामध्ये ‘शीर्ष 10’ प्रमुख दिव्यांगजन बांधवांचे वर्गीकरण केलेले आहे.  त्या वर्गवारी मध्ये बसणारे दिव्यांग जनबांधव यांना  आपण राबवित असलेल्या परिवार   सह्याद्री ट्रस्ट लि. यांच्या माध्यमातून निरामय आरोग्य विमा योजनेअंतर्गत समाविष्ट करून घेण्यास भारत सरकार व सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्रालय तसेच नॅशनल ट्रस्ट यांच्याकडे  आपल्या दिव्यांगजन बांधवांसाठी पाठपुरावा करून सुवर्ण मोलाचा फायदा कसा मिळेल या अनुषंगाने  बहुमोलाचे सामाजिक सहकार्य केले तर नक्कीच परिवार सह्याद्री ट्रस्ट लि. यांना यश प्राप्त होईल 

 वरील सर्व बाबींचा योग्य, सकारात्मक दृष्ट्या असा  विचार विनिमय  करून  कायदा व नियमांच्या रचनेत न्याय्य मागणी करणे योग्य ठरेल. वास्तविक पाहता आपल्या दिव्यांग जन बांधवांच्या खऱ्या मागणीला विनाविलंब मान्यता मिळेल त्याच प्रमाणे भारत सरकार हे जनतेसाठीच आहे याची जाणीव आपल्या परिवार  सह्याद्री ट्रस्ट लि. यांनी किंवा यांच्यावतीने भारत सरकार व नॅशनल ट्रस्ट यांना करावी यासंबंधी योग्य तो सकारात्मक विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घ्यावा.  हा निर्णय घेतल्यास भारत सरकारला  काही मोठा आर्थिक फरक पडेल असे दिसून येत नाही,परंतु आपले जे काही दिव्यांगजन बांधव आहेत व त्यांचे परिवार आहेत की ज्यांचे उत्पन्न मर्यादित आहे किंवा असणाऱ्या दिव्यांगजन बांधवांना व परिवारासाठी हा एक उपयुक्त महत्त्वाकांक्षी सुवर्ण निर्णय असू शकतो.

     या अप्रतिम उल्लेखनीय महान कार्याची सुवर्ण सुरुवात महाराष्ट्रातून आपल्याच परिवार   सह्याद्री ट्रस्ट लि. कडून करण्यात यावी .  आपली हि कार्यपद्धती बघून इतर राज्य सुद्धा त्याचा शुभारंभ करतीलच यात मात्र शंकाच नाही . तेव्हा  वरील सर्व बाबींचा योग्य तो विचारविनिमय करून दिव्यांगजन बांधवांसाठी एक खास बाब म्हणून शीर्ष 10 प्रमुख दिव्यांगजन बांधव यांच्या सवलतीचा विचार करण्यात यावा अशी  विनंती  संजय पंढरीनाथ काळे व मित्रपरिवार तसेच सर्व दिव्यांगजन बांधव आणि परिवार त्यांच्यामार्फत परिवार  सह्याद्री ट्रस्ट लि. चे  अध्यक्ष यांच्यासह सर्व पदाधिकारी सदस्य यांना केली आहे . 


गलिच्छ राजकारणः अवघ्या 9 दिवसात कर्नाळा बँक अवसायकांची तडकाफडकी बदली ; पनवेल संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा

पनवेल/प्रतिनिधी- कर्नाळा बँक बुडित प्रकरणानंतर पनवेल आणि रायगडचे राजकारण ढवळून निघाले असतानाच गलिच्छ राजकारणाने थेट कर्नाळा बँकेत पुन्हा शिरकाव करण्यासाठी अवसायकांच्या बदलीचा घाट घालून सहकार खात्यामार्फत त्यांची तडकाफडकी बदली केली आली आहे. अवघ्या 9 दिवसात अवसायक बदलण्याचे सहकार आयुक्तांनी कुणाच्या दबावाखाली हत्यार उपसले याची चर्चा सुरू झाली आहे.

    20 फेबु्रवारी 2020 पासून कर्नाळा बँकेवर जिल्ह्याचे उपनिबंधक जी. जी. मावळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 9 ऑगस्टला रिझर्व्ह बँकेने कर्नाळा बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर 17 ऑगस्टला सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी मावळे यांच्या अवसायकपदाच्या नियुक्तीचे आदेश बजावले. त्यानुसार त्यांनी पदभार स्वीकारला. दोनच दिवसांपूर्वी कवडे यांच्या आदेशाप्रमाणे डिपॉझिट इन्सुरन्स क्रेडिट गॅरंटी कापॉरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ई. संगीता यांनीही मावळे यांच्या नावाचे प्रतिज्ञापत्र घोषित केले. असे असताना 26 ऑगस्टच्या एका आदेशानुसार मावळे यांच्याकडून सुत्रे काढून घेताना नव्या आदेशानुसार कवडे यांनी पनवेलचे सहाय्यक निबंधक बालाजी वाघमारे यांची नियुक्ती करून कर्नाळा बँकेच्या ठेविदारांना मोठा धक्का दिला आहे.

      मावळे हे क्षेणी-1 चे अधिकारी असून त्यांच्याकडून तडकाफडकी सुत्रे काढून घेताना आयुक्तांनी त्यांच्या जागी निम्नस्तरीय ब-क्षेणीच्या अधिकार्‍यांची नियुक्ती केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

 कर्नाळा बँक बुडित निघाल्यानंतर बँकेच्या कारभारात मावळे यांनी कुणाही राजकीय नेत्यांना ढवळाढवळ करू दिली नव्हती. त्याशिवाय वसुलीसाठी अनेकांविरूद्ध सहकार खात्याच्या कलम 101 अन्वये कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे काही राजकीय नेते आणि त्यांचे प्यादे अडचणीत सापडले आहेत. त्यातच ठेविदारांना विम्याचे पैसे परत मिळण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने तिथे श्रेयवादासाठी काहींनी हातपाय पसरले आहेत. परंतु, मावळे यांचा अडसर ठरत असल्याने सहकारमंत्र्यांकडून मावळे यांच्या बदलीसाठी दबावतंत्र वापरल्याची खास माहिती उपलब्ध होत आहे.

 याबदलीप्रकरणी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी सकाळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकारचे प्रधान सचिव अनुपकुमार यांच्याशी थेट भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून मावळे यांची बदली रद्द करण्याचे साकडे घातले आहे. त्याशिवाय त्यांनी संबंधितांसह आयुक्तांना पत्र पाठवून आंदोलनाचा इशाराही दिला आहे. कर्नाळा बँक प्रकरणात ठेविदारांच्या अब्रुचे धिंडवडे निघाले तेवढे थोडे झाले. आता त्यांच्या भावनांशी कुणी खेळण्याचा प्रयत्न केल्यास तो खपवून घेतला जाणार नसल्याचा गंभीर इशारा कडू यांनी लेखी स्वरूपात दिला आहे.

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता अभय योजना लागू करा - पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची मागणी

अंबरनाथ /अविनाश म्हात्रे :-  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता अभय योजना लागू करा,पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची लेखी मागणी केली असून गेल्या दीड वर्षांपासून वैश्विक महामारी ठरलेल्या कोरोनाच्या काळात अनेकांनी आपला रोजगार गमावलेला असल्याने पाणी बिल भरलेले नाही. या परिस्थितीत अवाजवी बिले आल्याने ते भरू शकलेले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता अभय योजना लागू करण्यात यावी अशी लेखी मागणी पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केली आहे यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच अभय योजना लागू करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

माजी नगराध्यक्षा सौ.मनीषा वाळेकर यांचा वाढदिवस सामाजिक कार्य करून साजरा

अंबरनाथ /अविनाश म्हात्रे :- संपूर्ण वाळेकर कुटुंब नेहमी सामाजिक उपक्रमाद्वारे आपले वाढदिवस साजरे करीत असतात या वर्षी देखील सामाजिक उपक्रमाद्वारे माजी नगराध्यक्षा सौ. मनीषा वाळेकर यांनी आपला वाढदिवस साजरा केला,शिवसेना व युवासेनेच्या माध्यमातून वैद्यकीय मदत,रक्तदान शिबीर, पुरग्रस्थाना मदत, विद्यार्थी गुणगौरव,जेष्ठ नागरिकांना छत्री,गरजू लोकांना अन्नधान्य,गोरगरीब महिलांचे लसीकरण  झाले नाही त्यांना प्रधानाने लसीकरण  करून घेण्यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत बोलणी व लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी अग्रक्रम,असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले गेले, शिवसेनेच्या तत्व,सामाजिक बांधिलकीनुसार ८०% समाजकारण आणि २०% राजकारण याची प्रचिती सामाजिक उपक्रमाद्वारे माजी नगराध्यक्षा सौ.मनीषा वाळेकर यांचा वाढदिवस साजरा करताना दिसला.  

लोकप्रतिनिधींनी, सर्वच पक्षांच्या नेत्यांचा आदर करून सन्मान द्यावयास हवा.

सध्या देशातील व राज्यातील राजकीय क्षेत्रात राजकारणाचा दर्जा काही राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या भाषणातून किंव्हा प्रसार माध्यमां समोर वक्तव्य करताना अत्यंत खालावत चाललेला असल्याचे, जनतेला जाणवत आहे. राजकारणात विरोधक असावेतच व राज्य कर्त्यांवर वचकहि असावा हे सर्वमान्य आहेच. परंतु सर्व जनतेने बहुमताने निवडून दिलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी, आपल्या समृद्ध भारत देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान,मंत्री, व राज्यांचे  राज्यपाल, मुख्यमंत्री,मंत्री  खासदार व आमदार यांनी आदर बाळगून जनतेसमोर सन्मानाने बोलायला हवे. कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांवर वैयक्तिक टीकाटिपणी न करता चांगल्या सुसंस्कृत भाषेत विचारांचे आदान प्रदान करणे आवश्यक आहे. जनतेसमोर भाषण देताना किंव्हा प्रसार माध्यमांशी बोलताना, समाजात विपरीत प्रतिक्रिया उमटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे व त्याचे नेहमीच भान राखले पाहिजे.. कोणतेही विधान करताना वा चुकीची हीन दर्जाची भाषा वापरताना आपण जनतेचे निडून दिलेले प्रतिनिधी म्हणून समाजात वावरत असतो  याची जाण  ठेवणे आवश्यक आहे उगाचच जनतेची दिशाभूल करू नये व तरुण पिढीसमोर चांगले आदर्श संस्कार ठेवावेत. नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते जे पक्षासाठी आहोरात्र मेहनत करीत असतात व नागरिकांमद्धे आपापसात वादविवाद होऊन भांडणे होतात त्याचे रूपांतर आंदोलने, हिंसक प्रकार होण्यात होते त्यामुळे विनाकारण अशी हिंसक परिस्तिथी नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणेला अश्रूधूर, लाठीचार्ज, करावा लागतो त्यातून कार्यकर्त्यांना अटक  केली जाते त्यांचेवर  गुन्हे दाखल केले जातात. यामद्धे विनाकारणच  तरुणपिढी भरकटली जात आहे त्यांना योग्य दिशा दाखवून, चांगले संस्कार घडवून देशाच्या प्रगतीच्या प्रवाहामद्धे त्यांचा सदुपयोग करणे आवश्यक वाटते तसेच लोकप्रतिनिधींनी समाजासमोर चांगले विचार मांडणे हि काळाची गरज आहे 



-प्रदीप पंढरीनाथ जोशी, घणसोली, नवी मुंबई

(वृत्तपत्रलेखक व मुक्त पत्रकार )

आर टी ई अंतर्गत प्रवेश नाकारणाऱ्या तसेच अवैधरित्या शुल्क आकारणी करणाऱ्या बदलापूर मधील खाजगी इंग्रजी शाळेला दणका ; मा. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी तक्रारीची तात्काळ घेतली दखल, शाळेला दिले लेखी आदेश

पालक प्रतिनिधी डॉ. अमितकुमार गोईलकर यांच्या पाठपुराव्याला यश

आदर्श वार्ताहर वृत्तसेवा,ठाणे : राज्यातील खाजगी इंग्रजी शाळांच्या फिवाढ आणि फि वसुली विरोधात सर्वत्र गोंधळाचे आणि संतापाचे वातावरण असतानाच बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ (RTE) अंतर्गत सन २१-२२ सालचे प्रवेश नाकारल्याबाबत तसेच ज्यांना प्रवेश दिले आहेत त्यांच्याकडून इतर अशैक्षणिक सुविधांच्या नावाखाली फि वसूल केली जात असल्याच्या आणि फी न दिल्यास शिक्षण बंद केल्याबाबतच्या अनेक तक्रारी पालक प्रतिनिधी तथा रा काँ पा डॉक्टर्स सेल ठाणे जिल्हा सरचिटणीस डॉ. अमितकुमार गोईलकर यांचेकडे प्राप्त झाल्या होत्या.

   त्यानंतर या पालकांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करून तसेच आवश्यक कागदोपत्री संदर्भ पुरावे घेऊन मा. जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्या आसनाकडे तक्रार नोंदवली. मा. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन मा. गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती, अंबरनाथ यांना या प्रकरणी कारवाई करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले.

डॉ. अमितकुमार गोईलकर

   या आदेशानुसार संबंधित शाळा प्रशासनाला मा. गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या दालनात हजर रहायला सांगितले. त्यानुसार पालक प्रतिनिधी डॉ. अमितकुमार गोईलकर यांचे स्वयंसेवक मंडळ यांनी मा. गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनात अधिकाऱ्यांची भेट घेऊन पालकांची बाजू मांडली असता शाळा प्रशासनाचे गैर प्रकार उघड झाले. शाळा सुरू होऊन तीन महिने पूर्ण झाले तरी या शाळेने RTE प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना खोटी कारणे सांगून, पालकांची दिशाभूल करून शाळेत प्रवेश देण्यास  मनाई केल्याचे निष्पन्न झाले.

यावर मा. गटशिक्षण अधिकारी यांनी शाळा प्रशासनाला मुख्याध्यापकांच्या नांवे सक्त आदेश दिले ते पुढील प्रमाणे-1) आपली शाळा अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त असली तरी त्यावर्षीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे.2) सदरचे विद्यार्थी RTE प्रवेश प्रक्रियेच्या प्रतिक्षा यादीतील असून प्रवेश नाकारलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नियमानुसार तात्काळ प्रवेश देण्यात यावेत.3) सदर शाळेला अल्पसंख्यांक दर्जा जरी मिळालेला आहे तरी या अनुषंगाने उचित प्रक्रिया राबवून सण २०२२-२३ पासून RTE प्रवेश पक्रियेतून ही शाळा वगळण्यात येईल याची नोंद घ्यावी.4) सबब RTE प्रवेश अंतर्गत २०२१-२२ मध्ये निवड झालेल्या सर्व प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावा.5) एकही पात्र विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील. तसेच 6) सन २०२१-२२ च्या RTE च्या प्रवेश अथवा फी संदर्भात आपल्या शाळेची एकही तक्रार या कार्यालयास प्राप्त होणार नाही याची दक्षता घ्यावी.

वरीलप्रमाणे लिखित आदेश माननीय गटशिक्षण अधिकारी यांनी संबंधित शाळेला दिला. या आदेशानुसार RTE अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून. सर्व पालकांनी डॉ. अमितकुमार गोईलकर यांचे आभार मानले. या आदेशाची प्रत कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच RTE प्रवेश आणि शुल्क संदर्भात कुठल्याही शाळेच्या पालकांची तक्रार असल्यास 867258725 या क्रमांकावर किंवा जनसंपर्क कार्यालयात सम्पर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे डॉ. गोईलकर यांनी सांगितले.

जगातील सर्वात मोठा शेतकऱ्यांचा संप यशस्वी करणारा आगरी माणुस क्रांतीसुर्य नारायण नागू पाटील

 लोकनेते दि.बा पाटलांचा इतिहास तर झाकी आहे…जगाला नारायण नागू पाटील सांगणं अजून बाकी आहे’

२४ जुन २०२१ च्या आंदोलना नंतर आपला लढवय्या योध्दा आदरणीय दि.बा पाटील आणि त्यांच्या नेतृत्वात प्रस्थापित झालेला साडेबारा टक्केचा कायदा संपुर्ण महाराष्ट्राला माहित पडला. परंतू असे आमच्या भुमीपुत्रांत रत्नांचा आगार आहे जे केवळ आपल्या पुरती नाही तर अखंड समाजासाठी लढले आहे ज्यांचा इतिहास जगा समोर यायचा आहे आणि अशाच एका रत्नांचा म्हणजे क्रांतीसुर्य नारायण नागू पाटील यांचा स्मृती…तर जाणुन घेऊया ‘लोकनेते दि.बा पाटलांचा इतिहास तर झाकी आहे…जगाला नारायण नागू पाटील सांगणं अजून बाकी आहे’

    आप्पासाहेबांच्या आई महादीबाई यांनी आपल्याला पुत्ररत्न प्राप्त व्हावा यासाठी नागेश्वर देवाला नवस केला होता.दिनांक २९ ऑगस्ट १८९२ रोजी अलिबागच्या खारेपाटातील धेरंड या गावी श्रावणी सोमवारी क्रांतीसुर्य नारायण नागू पाटलांचा जन्म झाला अन अखंड आगरी समाजाच्याबरोबर शेतकऱ्यांना त्यांचा देव लाभला.शाळेत असतानाच एकूण वर्तन पाहून आप्पासाहेबांना लाभलेले पहिले गुरू काणे गुरूजींनी तर हा मुलगा पुढे हूशार होणार ही भविष्यवाणीच केली होती. कै.दत्तू गुरुजींनी विद्यार्थ्यांसाठी ‘आगरी बोंर्डिंग’ स्थापन केले होते

   विद्यार्थी दशेत ‘आगरी बोर्डिंगात’ असतानाच त्यांना ईंग्रज सरकार विरुध्द येणारे वाङ्मय मिळत असे जे ते रात्रभर जागुन वाचीत अन त्यातील आवडणारा भाग लिहून ठेऊन पाठांतर करत असत. या गुप्तवाङ्मयात सर्वाधिक भाग स्वातंत्र्यवीर  सावरकरांच्या क्रांतीप्रवन काव्यानेच भरलेले असत ज्याचे ते पठन करुन ठेवीत. अशाप्रकारे देशभक्तीचे धडे त्यांनी विद्यार्थीदशेतच गिरवले होते.

आप्पासाहेबांसोबच डॉ.बाबासाहेबांचे दुर्मिळ छायाचित्र

कठीण काळात चिकाटीने आपले शिक्षण घेत पुढे ते शाळेत प्राध्यापकही झाले अन पुढे ते आगरी समाजातील पहिले आमदारही झाले, त्यांच्या पत्नी देखील मुख्याध्यापिका होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळात कोकणामध्ये जमीन कसणाऱ्या कुळांची खोतांकडून पिळवणूक होत होती ज्यात खोतांनी काही सामाजिक काळिमा फासणाऱ्या  गोष्टी देखील केल्या न या पिळवणुकीतून शेतकऱ्यांची सुटका करण्याचे आप्पासाहेबांनी निश्चय केले.२५ फेब्रुवारी १९३० रोजी पेण येथे खोती विरोधात सभा झाली त्या परिषदेचे नेतृत्व आप्पासाहेब अन अनंत चित्रे यांनी केले होते. असंख्य शेतकऱ्यांचा या परिषदेत सहभाग होता अन सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार ॲड.ए.एन सुर्वे अध्यक्ष स्थानी होते. त्यानंतर या चळवळीशी अनेक शेतकरी संघटना जोडू लागल्या. २४ जानेवारी १९३१ ला पोलादपुर येथे सभाझाली आणि मग आप्पासाहेबांनी या सभेचे सत्र करीत संपुर्ण कोकण पिंजुन काढला.

खोती पध्दतीच्या विरोधात वाढता पाठिंबा पाहता सावकारांनी कुरगोडी अन कारस्थाने करीत नाना पाटलांविरोधात खोट्या तक्रारीदेखील केल्या. १९३२ ते १९३३ आप्पासाहेबांवर सरकारने भाषणबंदी ही आणली अन नजरकैदेतही ठेवले होते तेव्हा आप्पासाहेब वेषांतर ठिकठिकाणी भाषणे यशस्वी करीत. १९३३ ला सरकारने भाषणबंदी उठवली. २७ ऑक्टोंबर चरी सारख्या छोट्यागावात शेतकऱ्यांची सभा बोलवली आणि या सभेत शेतकऱ्यांना संपावर जाण्याचे आवाहन केले मग सुरू झाला ऐतिहासिक असा शेतकऱ्यांचा संप!

  कुळांनी जमीनी कसायला नकार दिला आणि अन्न पिकवायचे नाही असा ठाम निश्चय केला. या दरम्यान शेती न केल्यामुळे उपासमारीची वेळ येणार होती परंतू इकडचा भुमीपुत्र शेतकरी हबकला नाही तर त्याने लाकडे विकली,कंदमुळे विकली. एक महत्वाची बाब म्हणजे त्यावेळसही आपले सागरी जिल्हे हे एक होते. संपूर्ण मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, वसई भागातील आगरी, कुणबी, गवळी, कोळी, भंडारी, खारवी, भोई, कराडी, सुतार, कुंभार या शेतकरी समाजांचा त्यांना पाठिंबा होता.ठाणे-डोंबिवलीतून अनेकदा धान शेतकऱ्यांना दिल्याचे अनेक ज्येष्ठांचे सांगणे आहे.

   या ऐतिहासिक संपात मोलाची साथ नारायण नागू पाटील यांना मिळाली ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. १९३४ ला बाबासाहेब बोटीने चरी येथे येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले अन यासंदर्भात कायदा बनविण्याचेही सुचवले होते यानंतर स्वत: जिल्हाधिकारी मध्यस्थी करण्यासाठी आप्पासाहेबांकडे आले होते परंतू त्यातून काही निष्पण झाले नाही.याच दरम्यान संपावर आरोपवजा वृतांत करण्याचे काम काही वृत्तपत्रातून चालू होते. मग आप्पासाहेबांनी ७ जून १९३७ रोजी संपाचे वृत्तांत योग्य पध्दतीने शेतकऱ्यापर्यंत पोहचावे यासाठी  ‘दै.कृषीवल’ वृत्तपत्र सुरु केले.

१७ सप्टेंबर १९३९ रोजी खोती पध्दती बंद करण्याचे विधेयक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजदुर पक्षाच्या १४ आमदांच्या पाठिंब्यानिशी मुंबई विधीमंडळात मांडले यातून सरकार जागे झाले अन सरकार चरी येथे आप्पासाहेबांना भेटण्यास गेले आणि शेतकऱ्याचा विजय झाला अन ‘कसेल त्याची जमीन’ #कुळकायदा हे तत्व प्रस्थापित झालं! तब्बल ६ वर्ष चाललेला हा शेतकऱ्यांचा यशस्वी असा एकमेव संप आहे ज्याचं नेतृत्व आपल्या भुमीपुत्राने केले होते यासमोर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली बंगालमधील निळी च्या बागेतील व गुजरातमधील बोर्डोली सत्याग्रह लहान होता. अशा क्रांतीसुर्याची दखल महाराष्ट्र सांस्कृतीक मंडळाने वा पाठ्यपुस्तकात का बरी घेतली नसेल या वादात न जाता आतातरी ती घ्यावी हीच या योध्यास आदरांजली असेल…..

-सर्वेश रविंद्र तरे 

(लेखक प्रसिद्ध आगरी कवी व साहित्यिक तसेच पंचमहाभूत संघटनेचे सहसंस्थापक आहेत)


नाथ वास्तु एंटरप्राईजेस आणि यूथकौन्सिल नेरुळ यांच्या सहयोगाने तुळशी रोपांचे वाटप

आदर्श वार्ताहर वृत्तसेवा,नेरुळ : नाथ वास्तु एंटरप्राईजेस आणि यूथकौन्सिल नेरुळ यांच्या सहयोगाने श्रीनाथ वास्तु ज्योतिष कार्यालय यांच्या बेलापूर येथील व्दितिय शाखेत दिनांक २६.८.२०२१ रोजी आयोजित श्री सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने तुळशी वृंदावन सप्रेम भेट व दाते पंचांगचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय किर्तनकार चारुदत्त आफळे बुवा यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळुन संपन्न झालेल्या या कार्यक्रमास मा. नगरसेवक रविंद्र इथापे, साई मंदिर वहाळचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र पाटील, अभिनेते प्रकाश राणे, अभिनेत्री नयन पवार, यूथकौन्सिल नेरुळचे सुभाष हांडेदेशमुख, भालचंद्र माने, आर. एस. नाईक, जेष्ठ नागरिक संघ नेरुळ चे उपाध्यक्ष प्रभाकर गुमास्ते, पत्रकार प्रियाताई मालवणकर, सामान्य नागरिक वृत्तपत्राचे संपादक साबीर शेख आदि मान्यवर उपस्थित होते.

     आप आपल्या परीने दिवा लावत गेले तर सूर्य उगवायची वाट पहावी लागत नाही. तसेच काहीसे यूथकौन्सिल नेरुळ च्या तुळशी संवर्धन उपक्रमाचे आहे. अशा प्रकारच्या विविध उपक्रमांतून तुळशी रोपे वाटत गेले तर त्याची व्याप्ती अधिक वाढून त्याचा वैज्ञानिक तसेच धार्मिक लाभ  जनसामान्यास होऊ शकतो. असे सांगुन आफळे बुवा पुढे म्हणाले की, उपासना ही प्रत्येक क्षेत्रात आहे. आणि संसार सुखी करण्यासाठी ती आवश्यक आहे. धर्मशास्त्राच महत्व आपल्या जीवनात खूप आहे. आपल्या धर्मशास्त्राने आयुर्वेदालाच धर्मशास्राच रुप दिल आहे. म्हणूनच ज्योतिष शास्त्राबरोबरच धार्मिक साधनेतून सर्वार्थानं समाज उन्नती साधण्याचा पंडीत जितेंद्र कुलकर्णी यांचा प्रयत्न खूप चांगला आहे. यातून ते त्यांच्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या कामासाठी करत आहेत. सगळ्यांच्या मनामध्ये मांगल्याची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. 

         पंडीत जितेंद्र कुलकर्णी यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष हांडे देशमुख यांनी केले तर ज्योतिष कार्यालयातील कर्मचारीवर्गाने खूप मेहनत घेऊन सत्यनारायण पुजेचे मांगल्य जपत तो यशस्वी केला.

दीड कोटीचा बॉडीगार्ड

अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे यांना वर्षाकाठी दीड कोटी रु मिळत असल्याचे त्यांच्यावर बदलीची कारवाई करण्यात आली असून सरकारी ठिकाणी नोकरी करणाऱ्या व्यक्तीला एकाचवेळी दोन ठिकाणी कार्यरत राहता येत नाही. वर्षाला दिडकोटी म्हणजे महिन्याला साधारण बारा लाख रु शिंदे यांना मिळत होते.अमिताभ यांनी आतापर्यंत कौन बनेगा करोडपती मधून अनेकांना करोडपती केले,पण बॉडीगार्ड शिंदे हॉट सीट वर न बसताच करोडपती बनले आहेत.

देशातील मोठमोठ्या सेलिब्रिटी व प्रमुख व्यक्तींना संरक्षण देण्याचे काम शिंदे आपल्या पत्नीच्या नावे असणाऱ्या एजन्सी मार्फत करीत आहेत असे त्यांचे म्हणणे असून,माझा प्रत्यक्ष त्यात कोणताही सहभाग नसल्याचे सूतोवाच केलं आहे.तेव्हा असे असले तरी घरातील पत्नी व इतर कुटुंबीय काय करतात याची माहिती शिंदे यांना नसावी हे हास्यास्पद वाटते.तेव्हा शिंदेंसारखे सरकारी नोकरी करीत असतानाच अजून कितीजण वेगवेगळ्या मार्गांनी करोडपती झाले आहेत हे शोधून काढणे पोलीस खात्याला औत्सुक्याचे ठरेल.

-गणेश हिरवे,जोगेश्वरी पूर्व

अष्टपैलू व्यक्तिमत्व जयंत पवार यांच्या अकाली निधनाची बातमी धक्कादायक !!

पत्रकार, नाटककार, नाट्य समीक्षक, कथा- कादंबरीकार  जयंत  राजाराम  पवार  यांच्या  अकाली  निधनाची  दुःखद  बातमी  आम्हाला  निश्चितच  धक्कादायक  आहे !पवार  कुटुंब  आमच्या  चाळीत  राहत  होते. जयंतचा  जन्म  व  त्याचे  बालपण  आम्ही  जवळून  पाहिले  होते. त्याचे  बालपण  लोअर परळच्या  मानाजी  राजूजी(कामाठी)  चाळीत  गेले. त्याचे  वडील  श्रीनिवास  मिल्समधे  नोकरी  करीत  होते. भांगेतून  तुळस  उगवते  तसे   एका  चाळीत  हे  साहित्यिक-पत्रकार  रत्न  जन्मले  होते. जयंत  याची  नाटके , चित्रपट  कथा-पटकथा, सुरुवातीला  याच  चाळीत  त्याने  लिहिली. कालांतराने  जयंत  बोरिवली(पूर्व) येथे  स्थायिक  झाला. त्याची  पत्नी  संध्या  नरे  ही  देखील  पत्रकार  आहे. जयंत  मला  आंगचेकर काका  म्हणून  संबोधीत  होता. तो  पुरोगामी  विचारांचा  होता.

  २००५ मध्ये  मानाजी  राजूजी  चाळीत  आम्ही  S.S.C. व्याख्यानमाला  करायचे  ठरवले. तशी  कामाठी चाळ  म्हणजे  गुंडांचा  अड्डा  म्हणून  ओळखली  जायची. त्या  व्याख्यानमालेच्या  उदघाटनाला   जयंताला  बोलवायचे  असे  ठरले. ती  जबाबदारी  माझ्यावर  टाकण्यात  आली  होती. मी  जयंतला  फोन  लावून  सांगितले . जयंतला  त्याचे  आश्चर्य  वाटले ! " काका  काय  सांगता ? आपल्या  चाळीत  S.S.C. व्याख्यानमाला ?"  त्याने  उदघाटनाला  नाही जमणार, पण  मध्येच  येऊन  जाईन  म्हणाला. अखेर  आम्ही  जयंतला  समारोपाला  बोलावले. आणि  तो  वेळ  काढून  आला.जयंत  महाराष्ट्र टाइम्स मध्ये  वरिष्ठ  उपसंपादक  होता. माझ्या  ब-याच  बातम्या  तो  मटामधे  छापत  होता. एक  पत्रकार, साहित्यिक , नाटककार  आमच्या  चाळीत  राहतो  याचा  आम्हाला  अभिमान  वाटत  होता. जयंत  सुप्रसिद्ध  दिवंगत अभिनेते  सुहास  भालेकर  यांचा  भाचा  होता. तो  अत्यंत  बुद्धीमान  तरीही  साधा  व  निगर्वी  होता. वसा दिवाळी  अंकाचे  संपादन  जयंत  पवार  करीत  होता. असा  एक  सव्यासाची व  साक्षेपी  मित्र  आम्ही  गमावला  आहे. जयंत  पवार  यांना  माझी  भावपूर्ण  श्रध्दांजली ! 

 - अनंत  आंगचेकर, भाईंदर (ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक-पत्रकार  )

विक्रोळी -कांजूरमार्ग एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी चा कार्यक्रम संपन्न

मुंबई (प्रतिनिधी )- विक्रोळी कांजूरमार्ग एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या पूर्वसंध्येला दहीहंडीचा कार्यक्रम कोरोना चे सर्व नियमाचे पालन करून अंगणवाडीतील लहान मुले- मुली, गरोदर स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांच्या सहकार्याने तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी हेमा काटकर व सेक्टर अ च्या सुपरवायझर /पर्यवेक्षिका नंदिका काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका  व मदतनीस यांच्या विशेष परिश्रमातून विक्रोळी टागोर नगर हरियाली व्हिलेज त्याठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला.

       श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या पूर्वसंध्येला झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात विभागातील तसेच परिसरातील बालक-पालक मुले मुली यांच्या उपस्थितीत विभागातील अंगणवाडी क्रमांक 103, 105 ,15, 16, 11 ,8 ,6, 14 ,102 ,101, यांच्या विशेष परिश्रमातून संपन्न झालेला आहे . यावेळी मुलांना व उपस्थित पालकांना दहीहंडीचा प्रसाद तसेच अल्पोपहाराच वाटप करण्यात आले असून यावेळी अंगणवाडी सेविकांनी सर्वांनी   मास्क व सॅनिटायझर  चे वापर करून कोरोना वर मात करण्याचा संदेश देण्यात आला. तसेच प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज असल्याचे यावेळी सर्व उपस्थित बालक पालक व ज्येष्ठ नागरिकांना सांगण्यात आले असून प्रत्येक विभागातील अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीतील मुलांना श्रीकृष्ण व राधा यांचा  गणवेश परिधान करून" मच गया शोर सारी नगरी में "या गाण्याच्या तालावर मुलानी ठेका धरत दहीहंडी फोडून मडक्यातील दहयावर ताव  मारून एक प्रकारे आनंद लुटण्यात आला .

समर्थ मंच माध्यमातून एरिया सभा कार्यशाळा मानखुर्द विभागात संपन्न

मानखुर्द- शुक्रवार दि. २७ ऑगस्ट रोजी चाईल्ड सेफ्टी फोरम एम/ पूर्व विभागाने संस्था संघटनाच्या प्रतिनिधी साठी एरिया सभा समर्थ मंच यांच्या माध्यमातून सावली फाऊंडेशन मानखुर्द या ठिकाणी एरिया सभा विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेत ११ संस्था संघटना   आणि वस्ती मधील स्थानिक कार्यकर्ते अश्या ३४ प्रतिनिधीनी आपल्या सहभाग नोंदविला. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शन वर्षा ताई विद्या विलास एरिया सभा समर्थ मंच चे संयोजक आणि सूरजजी भोईर, एरिया सभा समर्थ मंचचे सहसंयोजक हे होते.प्रमुख पाहुण्यांची ओळख आणि स्वागत संकल्प संस्थांचे विनोद हिवाळे यांनी केले, चाईल्ड सेफ्टी फोरम एम पूर्व विभागाचे उद्देश आणि कार्यशाळा ची प्रस्तावना युवा संस्था चे प्रकाश जी भवरे यांनी मांडली.कार्यशाळा चे सुरुवातीला सूरजजी यांनी आपल्या सूंदर मधुर आवाजात चळवळीचे गीत सादर करून कार्यकर्ताना ऊर्जा निर्माण केली.

    वर्षा ताई यांनी एरिया सभेचे मुख्य कार्य व कार्यप्रणाली यावर प्रकाश टाकला, संविधान मध्ये ७३ आणि ७४ घटना दुरुस्ती का केली ? या घटना दुरुस्ती काय उद्देश होता याची पूर्ण तपशीलवार माहिती दिली त्यानुसार आपण आपल्या प्रविभागात कसे कार्य करू शकतो एरिया सभा ची बांधणी कशी करावी तसेच एरिया सभा मुळे वस्ती विकास कशाप्रकारे होऊ शकतो या बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.उपस्थित फोरम च्या कार्यकर्त्यांनी आपल्या संस्थांच्या कार्यक्षेत्र मध्ये  एरिया सभा संघटित करण्याच्या दृष्टीने विचार करत आहे प्रमाणे काही नियोजन बद्ध कार्यक्रमाची आखणी या कार्यशाळेत व्यक्त केले.कार्यशाळा चे सांगता समारंभ आणि आभार प्रदर्शन सावली फाऊंडेशन चे संतोषजी सुर्वे यांनी केले.

अविनाश शां. लाड - राजकारणातील समाजसेवक

    महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नुकतीच नवीन कार्यकारिणी जाहीर केली त्यामध्ये नवी मुंबई माजी उपमहापौर श्री अविनाश लाड यांची चिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.गेली २० वर्षे सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या या हरहुन्नरी माणसाचा हा बहुमान पक्ष श्रेष्ठींनी केला आहे. हे श्रेय त्यांच्या कामाला आहे.श्री. लाड विद्यार्थी असल्यापासून शैक्षणिक क्षेत्रात आहेत. कमवा आणि शिका हे तत्त्व त्यांनी अंगीकारले. वडिलांच्या व्यवसायात अर्धा दिवस काम केले आणि पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. रयत शिक्षण संस्थेच्या मॉडर्न कॉलेज नवी मुंबई येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्याठिकाणी  ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्याशी त्यांचा परिचय झाला तो अखेपर्यंत कायम होता. एन डी पाटील साहेबांचे माणस पुत्र म्हणूनच ते ओळखले जातात.लाड गेली १५ वर्षे रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद आहेत.साखरापा आणि राजापूर येथील संस्थेचे व्यवस्थापन ते आस्थेने विचारपूस करतात आणि वेळप्रसंगी स्वखर्चाने कामे करतात.सन २००० साली लाड नवी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले.कुटुंबात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ विद्यार्थी असताना केलेले काम त्यांच्या उपयोगी आले. पहिल्याच वर्षी त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श नगरसेवक पुरस्कार प्राप्त झाला. त्यातून अनेक कामे करण्याची ऊर्जा मिळाली.राजकारणात असूनही ते सामाजिक आणि शैक्षणिक व सहकार, शेती क्षेत्रात जास्त रमले. कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई, तालुका शाखा संगमेश्वर, कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संगमेश्वर, संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतपेढी आणि कुणबी सहकारी बँक मुंबई या कोकणातील कुणबी समाजाच्या प्रमुख संस्थांतून ते कार्यरत आहेत. याशिवाय नवी मुंबई येथील डझनभर संस्थांमध्ये त्यांचे कार्य आजही सुरू आहे. काही संस्था त्यांनी स्वतः सुरू केल्या आहेत.

          श्री. लाड कुणबी सहकारी बँकेचे सल्लागार समिती सदस्य आहेत. गेली ५ वर्षे मुंबईतील संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतपेटीचे अध्यक्ष असून त्यांच्याच  कारकीर्दीत संगमेश्वर आणि देवरूख येथे नवीन शाखा सुरू करण्यात आल्या. देवरूख येथे सुरू असलेल्या मामासाहेब भुवड कॉलेज ऑफ कॉमर्स अँड हाँटेल मॅनेजमेंट सुरू करण्यात सहभाग होता. दापोलीतील रामराजे कॉलेज आणि कुणबी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे कॉलेज सुरू व्हावे यासाठी ज्या प्रमुख व्यक्तींनी पुढाकार घेतला त्यापैकी एक लाड आहेत.श्री.अविनाश लाड तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. एक वेळा केवळ नऊ मतांनी पराभव झाला. त्याच त्यांच्या पत्नी निवडून आल्या. गेली २१ वर्षे त्यांच्या घरी नगरसेवकपद आहे.मुंबईत वास्तव्य करून ते कोकणात गावी जाऊन सार्वजनिक जीवनात काम करीत असतात. सन २०१६ साली कोकणातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब उर्फ शामराव पेजे यांच्या जन्मशताब्दी वर्षात कोकणातील अनेक ठिकाणी शेती, सहकार व शिक्षण विषयक मेळावे आयोजित करण्यात आले. शामराव पेजे स्मृती न्यास रत्नागिरी यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्यात श्री. लाड अग्रेसर होते. नवी मुंबई आणि मुंबईतील षण्मुखानंद येथे त्यांनी भव्य सभा आयोजित करून कोकणातील कुणबी व तत्सम बहुजन समाजातील अनेक नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणले होते.श्री. लाड यांनी राजापूर लांजा मतदार संघातून विधान सभा निवडणूक लढविली. थोड्या मतनी अपयश आले परंतु मतदारांशी संपर्क कायम ठेवला. कोरोना महामारीत ते सर्वप्रथम मदतीसाठी धावून गेले. गावोगावी फिरून वैद्यकीय साधने आणि धान्य वितरण केले.शहरी भागात राहूनही ते ग्रामीण भागात जास्त रमले. शेती आणि सहकार यातूनच कोकणात प्रगती होईल अशी त्यांची धारणा आहे. त्यासाठी त्यांनी अनेक कृषी तज्ञांच्या सोबत शेती मेळावे आयोजित केले.श्री.अविनाश लाड यांच्या सेवाभावी कार्याची पक्ष श्रेष्ठींनी दखल घेतली आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चिटणीस म्हणून नियुक्ती केली आहे. श्री. लाड यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि कामाची ही पावती आहे.त्यांना हार्दिक शुभेच्छा.

- पी. डी. ठोंबरे , संचालक,कुणबी सहकारी बँक, मुंबई

सार्वजनिक क्षेत्रात काम करताना अण्णासाहेब हजारे यांचे मार्गदर्शन मोलाचे - राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी व्यक्त केली भावना

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी सामाजिक जीवनात एक आदर्श निर्माण केला आहे . त्यामुळे सार्वजनिक जीवनात काम करताना त्यांचे मार्गदर्शन मोलाचे आहे, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्‍पादन, क्रीडा व युवक कल्‍याण, राजशिष्‍टाचार, माहिती व जनसंपर्क, विधि व न्‍याय राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी केले.

   राळेगण सिद्धी (ता. पारनेर) येथे आज राज्यमंत्री कू. तटकरे यांनी श्री. हजारे यांची भेट घेतली.यावेळी आमदार निलेश लंके, राजेन्द्र फाळके, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

   यावेळी राज्यमंत्री कु. तटकरे यांनी श्री. हजारे यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. राळेगण सिद्धीचा विकासाची माहितीही त्यांनी घेतली. सार्वजनिक जीवनात अण्णांचे काम आणि योगदान खूप मोठे आहे.त्यामुळे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येतानाच अण्णांना भेटायचे ठरवले होते. त्यांचा आमच्या कुटुंबीयांशी स्नेह आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीने नवीन ऊर्जा मिळाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.अण्णांचे सार्वजनिक क्षेत्रातील काम आमच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी राळेगण सिद्धीला आल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी अण्णांनी माजी मंत्री तथा सध्याचे खासदार सुनील तटकरे यांच्याशीही दूरध्वनी वरून संवाद साधला आणि कौटुंबिक स्नेहाला उजाळा दिला. 

शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१

1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनसाठी मुंबई येथे सहविचार सभा संपन्न


मुंबई | प्रतिनिधी : 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवानिवृत्ती नंतर 1982 ची जुनी पेन्शन मिळावी , यासंदर्भात मुंबईतील घाटकोपर मधील महेश्वरी विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे सहविचार सभा संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांनी मुंबईतील 2005 पूर्वीचे नियुक्त 532 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना एकत्रित करून संघटित लढा प्रबळ करणे कारण राज्यातील इतर सर्व विभागातील 2005 पूर्वी नियुक्त कर्मचार्‍यांना जूनी पेन्शन मिळते , ती आपल्यालाही मिळालीच पाहिजे असे मत व्यक्त केले. राज्याचे लोकप्रिय व संवेदनशिल मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे , उपमुख्यमंत्री आजितदा पवार व महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांची पुढील काही दिवसांत भेट घेवून पत्र देण्याचे सर्वानुमते ठरले.

           यावेळी संघटनेचे राज्य सहसचिव भानुदास शिंदे यांनी प्रास्ताविक मांडले. सचिन ढेरंगे  व संगीता सरोदे यांनी प्रशासकीय बाबींवर प्रकाश टाकला. तसेच याप्रसंगी मुख्याध्यापक धनंजय काळे , मुख्याध्यापक अशोक परदेशी , मुख्याध्यापक लोकरे सर , प्रा. शितलप्रसाद  बडगुजर , प्रा. कलीम शेख , अनिल करवंदे , गणीभाई शेख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अब्दुल जब्बार , समिक्षा तावडे , सविता गटे , कविता कालेकर , संतोष काळू , सुरेखा शिंदे ,  वृषाली पत्की ,  अजयकुमार पांडे , महेश धारकर , रविंद्र भालेराव , प्राची तवटे , अनघा हरचेकर , हेमंत बोढारे , सुभाष गायकवाड , मुकुंद शिंदे आदी शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते. सहविचार सभेचे सूत्रसंचालन संघटनेचे मुंबई सचिव दत्तात्रय शेंडकर यांनी केले. आभार मुख्याध्यापक विद्याधर राणे यांनी मानले.

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

श्री अविनाश म्हात्रे यांचा मालेगावात ॲड.शिशिर हिरे - नामांकित विशेष सरकारी वकील महाराष्ट्र शासन मुंबई हाय कोर्ट मुंबई यांच्या उपस्थितीत पुरस्कार आणि भव्य सत्कार

आदर्श वार्ताहर वृत्तसेवा , मालेगाव :-  दिनांक २६/०८/२०२१ रोजी जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन  ( दिल्ली भारत ) यांचे तर्फे नियुक्ती पत्र वितरण आणि कोरोना काळात विशेष कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचे कोरोना योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हा सोहळा हाॅटेल न्यु सुखसागर मालेगांव येथे संपन्न झाला, या वेळी संस्थेची धेय्य धोरणे याची माहिती देण्यात आली आणि ॲड शिशिर जी हिरे साहेब यांनी मानव अधिकार या विषयावर अत्यंत प्रबोधनामत्मक माहिती देण्यात आली, या सोहळ्याला प्रमुख मान्यवर ॲड शिशिर जी हिरे साहेब-विशेष सहकारी वकिल महाराष्ट्र शासन मुंबई हायकोर्ट,मा.श्री खंडेराव शेवाळे शेतकरी राजा क्रुषी भुषण पुरस्कार विजेते महाराष्ट्र शासन, मा.श्री राजेंद्र आहेर साहेब  राष्ट्रीय अध्यक्ष जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन श्रीमती रेखा सोलंकी राष्ट्रीय अध्यक्षा,मा.श्री बाबासाहेब बनसोडे राष्ट्रीय महासचिव, मा.श्री प्रदीप पाटील.  राष्ट्रीय सचिव, मा.श्री खेमराज कोर साहेब  राष्ट्रीय जाॅइंट सेक्रेटरी,मा.श्री राम घरत  कार्यकारी सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश,मा.श्री डाॅ.सुनिल निकम महाराष्ट्र सचिव,मा.श्री नाना भाऊ वाघ, श्रीमती शबाीया शेख गोवा प्रदेश अध्यक्षा, सौ पल्लवी आहेर  सल्लागार जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन,आयोजक  मा.श्री अनिल जाधव. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष,मा. श्री सुनिल सुर्यवंशी युवा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष व अनेक मान्यवर उपस्थित होते हा सोहळा अत्यंत शिस्तीत आणि खेळीमेळीच्या आणि आनंदाच्या वातावरणात साजरा झाला.

निर्दोष गोंधळी यांच्या पाठपुराव्याला यश

उरण - बामणडोंगरी गावाजवळ  सातत्याने रस्त्यावर  नागरीक  कचरा टाकत होते. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून त्याचा उग्र वास सर्वत्र पसरत होता.त्यामुळे  तिथे  राहत असलेल्या लोकांना त्याचा  त्रास होत होता. शिवाय नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले होते.म्हणून मनसेचे पनवेल  तालुका उपाध्यक्ष निर्दोष  केशव गोंधळी  यांनी पाठपुरावा  करून तो कचरा पुर्ण  साफ करून तिथे  सिडको मार्फत बोर्ड  लावुन घेतले. यावेळी गव्हाण  विभाग  अध्यक्ष तुषार सुनिल म्हात्रे,उरण  विधानसभा उपाध्यक्ष श्रीमत रविंद्र घरत, उलवे  शहर उपाध्यक्ष-आकाश देशमुख, उलवे शहर शाखाध्यक्ष -अशोक वडांगले आदी मान्यवर उपस्थित  होते.कचरा साफसफाई केल्याने सदर परिसर स्वच्छ व सुंदर झाला आहे. येणारे जाणारे ग्रामस्थ, नागरिक, प्रवाशी वर्गांनी निर्दोष गोंधळी यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे आभार मानले आहे.

कामगार नेते महेंद्र घरत यांची रायगड जिल्हाध्यक्ष पदी निवड

आदर्श वार्ताहर वृत्तसेवा ,रायगड  - काँग्रेस पक्षाचा विस्तार, प्रसार, प्रचार, संघटन करण्याच्या दृष्टीकोणातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. उपाध्यक्ष, महासचिव, सचिव, प्रवक्ते यासह अनेक नवे पदाधिकारी या कार्यकारिणीत जाहीर करण्यात आले आहेत. रायगड मधून रायगड काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी प्रसिद्ध कामगार नेते महेंद्र तुकाराम घरत यांची निवड करण्यात आली आहे.

बॅरिस्टर अंतूले,लोकनेते स्व.मधुशेठ ठाकूर, स्व.माणिकराव जगताप यांचा लोकहिताचा वारसा पुढे सुरू ठेवणार असल्याचे सांगून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांचे कामगार नेते महेंद्र घरत यांनी या नियुक्तीबद्दल आभार मानले आहेत.

2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्षाचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याच्या अनुषंगाने तसेच काँग्रेस पक्षाला नवीन उभारी मिळवून देण्याच्या उद्देशाने अनेक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती काँग्रेस पक्षात करण्यात आली. यात रायगड जिल्ह्यातून महेंद्र घरत यांचे नाव सर्वात आघाडीवर होते. काँग्रेसला अनुभवी, सक्रिय, क्रियाशील, प्रतिभाशाली नेतृत्व हवे होते. त्यामुळे काँग्रेसला महेंद्र घरत यांच्या रूपाने प्रतिभाशाली व्यक्तिमत्व मिळाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.

महेंद्र घरत हे सध्या इटंकचे राष्ट्रीय सचिव आहेत.कामगार क्षेत्र, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील महेंद्र घरत यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.न्यू मेरिटाइम जनरल कामगार संघटना या कामगार संघटनेच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देत हि संघटना आंतर राष्ट्रीय स्तरावर महत्वाची भूमिका निभावत आहे. महेंद्र घरत यांना सर्वच गोष्टीचा उत्तम अनुभव असल्याने रायगड जिल्ह्याला महेंद्र घरत यांच्या जिल्हाध्यक्ष पदाने खरा न्याय मिळाला असल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.महेंद्र घरत यांच्या जिल्हाध्यक्ष निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, राजकीय क्षेत्रातील नेते मंडळींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तर एकच जल्लोष साजरा केला. महेंद्र घरत यांच्या निवडीने संपूर्ण रायगड जिल्ह्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

[[ माझी काँग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने मी सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांचे आभार मानतो. काँग्रेसचे सर्व सेल, विभाग तसेच काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या आशीर्वादामुळेच मला हि संधी मिळाली . या संधीचे मी नक्की सोने करेन. रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेईन.]]

- महेंद्र घरत,रायगड जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने व्यायाम शाळा, योग केंद्र, खेळांची मैदाने अशा विविध ठिकाणी सर्वांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे क्रीडा विभागाचे आवाहन

आदर्श वार्ताहर वृत्तसेवा ,रायगड : कोविड-19 प्रादूर्भाव प्रसार हळूहळू  कमी होत असताना सर्वसामान्य जनतेसाठी निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात येत आहे. मात्र यापुढेही तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या क्रीडा, शारीरिक शिक्षण, फिटनेस व लेजर कौशल्य परिषद, नवी दिल्ली (Sports, Physical Education Fitness & Leisure Skills Council) यांनी खाजगी क्रीडा संस्था, योग केंद्रे आणि क्रीडा सुविधा यांच्यासाठी मानक प्रणाली निश्चित केली आहे.

        या पार्श्वभूमीवर व्यायाम शाळा, योग केंद्र, खेळांची मैदाने अशा विविध ठिकाणी सर्वांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे क्रीडा विभागाने आवाहन केले आहे.

     कोविड-19 महामारीच्या प्रसारामुळे दि.23 मार्च 2020 पासून आज रोजी पर्यंत संपूर्ण देशात टाळेबंदी व आवश्यक निर्बध लागू करण्यात आले आहे. हीच परिस्थिती राज्यातही होती. पहिली व दुसरी लाट ओसरल्यानंतर आरोग्य विभागाने 11 जिल्ह्यांमध्ये स्तर विषयीचे निर्बंध कायम ठेवून, उर्वरीत 14 जिल्ह्यांमधील निर्बंधामध्ये शिथिलता आणली आहे. यामध्ये व्यायामशाळा, योग-केंद्र, चालणे, धावणे, सायकलिंग याकरिता मैदान, सार्वजनिक बाग यांना परवानगी  देण्यात आलेली आहे.

      व्यायामशाळा, योग केंद्र, ॲरोबिक व झुंबा केंद्र तसेच खाजगी क्रीडांगणे व क्रीडा संस्था यांच्याकरिता मानक प्रणाली (Standard Operationg Protocol) तयार करण्यात आलेली असून ती https://irefs.in/Policies-and-guidelines/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे. यामध्ये मानक प्रणाली तसेच  Fitness Centre Covid Protocol Quiz उपलब्ध असून व्यायामशाळा, योग केंद्र, ॲरोबिक केंद्र इ. करीता नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. या संस्थेमार्फत व्यायामशाळा, योग केंद्र इ.करिता कोविड-19 च्या नियमावलीचे पालन करण्यात येत असल्याचे एक शपथपत्र तयार करण्यात येत असून हे पत्र अधिकाऱ्यांच्या तपासणी दरम्यान शिफारसपत्र म्हणून स्विकारले जाईल. 

       क्रीडा, शारीरिक शिक्षण, फिटनेस व लेजर कौशल्य परिषद, नवी दिल्ली (Sports, Physical Education Fitness & Leisure Skills Council) यांची मानक प्रणालीवरील नमूद वेबसाईट वरुन उपलब्ध असल्याचे रायगड जिल्ह्यातील सर्व व्यायामशाळा, योग केंद्र, ॲरोबिक, झुंबा प्रशिक्षण केंद्र, खाजगी क्रीडा संस्था इ. यांना कळविण्यात येत आहे. प्रत्येकाने आपली व्यायामशाळा, योग केंद्र, ॲरोबिक, झुंबा केंद्र, क्रीडांगणे  इत्यादींचे संचालन या मानक प्रणाली (SOP) नुसार व जिल्हा/स्थानिक प्रशासनाचे कोविड प्रतिबंधात्मक आदेशानुसार करणे बंधनकारक असून 

याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास dsoraigad.2009@rediffmail.com या ईमेलवर अथवा टपालाव्दारे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करण्यात यावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर यांनी कळविले आहे.

वडखळ ग्रामपंचायतीच्या आधार केंद्र व अभ्यास केंद्राचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

वडखळ  :- वडखळ ग्रामपंचायतीच्या आधार केंद्र व अभ्यास केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आज शुक्रवार, दि.27 ऑगस्ट रोजी संपन्न झाले.

      वडखळ ग्रांपचायतीच्या माध्यमातून चांगली विकास कामे करण्यात येत आहेत. ग्रामपंचायतीचा अधिक विकास करण्यासाठी खासदार सुनिल तटकरे यांचा पहिला खासदार निधी वडखळ ग्रामपंचायतीला देण्यात येईल तसेच या अभ्यास केंद्राचा युवक, विद्यार्थी यांना एकत्रितरित्या अभ्यासासाठी तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी उपयोग होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी याप्रसंगी केले.

      सरपंच राजेश मोकल यांनी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे शाल श्रीफळ देवून स्वागत केले.यावेळी दयानंद भगत, जितू ठाकूर, राजिप सदस्य हरिओम म्हात्रे, योगेश पाटील, जिल्हा उपाध्यक उदय जवके, मंगेश नेने, प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार तहसिलदार डॉ.अरुणा जाधव, योगिता मोकल, चैताली पाटील, मीनाक्षी पाटील,शरद पाटील, पूजा मोकल, प्रमिला म्हात्रे, सुचिता चव्हाण, विकास पाटील आदि उपस्थित होते. 

"निर्मल गणेशोत्सव" स्पर्धेत नागरिक, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळांनी मोठया प्रमाणात सहभागी व्हावे - मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील

 आदर्श वार्ताहर वृत्तसेवा, रायगड :- गणेशोत्सवात सामाजिक जाणीव जागृतीची व प्रबोधनाची श्रेष्ठ परंपरा पुढे नेण्याच्या दृष्टीने कोविड काळात नियम पाळून सामाजिक भावनेने रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत “निर्मल गणेशोत्सव स्पर्धेचे ” आयोजन दि.9 सप्टेंबर 2021 ते 21 सप्टेंबर 2021  या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध गणेशोत्सव मंडळे,सामाजिक संस्था तसेच वैयक्तिक स्तरांवरील नागरिकांनी मोठया प्रमाणवर सहभाग घ्यावा,असे आवाहन जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.

     या स्पर्धेचा उद्देश हा पर्यावरण रक्षण ,निसर्ग संवर्धन , परिसर स्वच्छता व आरोग्याप्रती चांगल्या सवयी लावून गावपातळीवर जास्तीत जास्त लोकसहभाग घेऊन निर्मल वातावरणात पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करणे, हा आहे.या स्पर्धेमध्ये  स्पर्धकांनी  सहभाग घेण्याकरिता http://bit.ly/raigadganesh या गुगल लिंकवर  दि.21 सप्टेंबर 2021   पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता सर्व स्पर्धकांनी नियम व अटींच्या अधीन राहून ऑनलाईन नोंदणी करावी.

    या स्पर्धेकरिता पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बसविणाऱ्या सार्वजनिक मंडळे,विविध सामाजिक संस्था तसेच मंडळाचा गणपती नसल्यास गावात घरगुती पातळीवरील गणपती उत्सवात सहभागी होऊन या स्पर्धेत मंडळे सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेत सहभागाकरिता गणेश पूजनाचे दैनंदिन निर्माल्य गोळा करून ते निर्माल्य कलश,पोते,गोणी यात संकलन करावे व त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी कंपोस्टिंगसाठी पाठविणे/सेंद्रीय खत यासाठी वापरणे, गणपतींच्या सजावटीसाठी वापरण्यात येणारे आरास,मखर,पूजेतील प्लास्टिक वेस्टन असलेले साहित्य गोळा करून ग्रामपंचायतीच्या संकलन केंद्रात जमा करणे, पर्यावरण पूरक शाडूच्या मूर्तीचा वापर, मूर्ती विर्सजनाकरिता बनविलेल्या  कृत्रिम तलावाचा वापर इत्यादी  पर्यावरणपूरक विविध जनजागृतीपर उपक्रम स्लोगन,पोस्टर, बॅनर,जिंगल्स,व्हिडिओ,भजन यांच्या माध्यमातून  राबवावयाचे आहेत. 

संपूर्ण जिल्हयातून प्रथम,व्दितीय व तृतीय असे तीन क्रमांक व दोन उत्तेजनार्थ क्रमांक जिल्हा स्तरावरून निवडून त्यांना बक्षीस म्हणून रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.तसेच सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येईल.

     तरी रायगड जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे,सामाजिक संस्था तसेच वैयक्तिक स्तरावरील नागरिकांनी निर्मल गणेशोत्सव स्पर्धेत मोठया संख्येने सहभागी होऊन आपला गणेशोत्सव पर्यावरणपूरक होण्यास हातभार लावावा, असे  आवाहन पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ.ज्ञानदा फणसे यांनी केले आहे.

केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालयाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय परिषदेचा "वन डिस्ट्रिक्ट वन ग्रीन चॅम्पियन" पुरस्कार नवीन पनवेलच्या श्री.डी.डी.विसपुते कॉलेज महाविद्यालयाला घोषित

पनवेल :- उच्च शिक्षण मंत्रालयाच्या ग्रामीण शिक्षण विभागाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय परिषदेने “वन डिस्ट्रिक्ट वन ग्रीन चॅम्पियन” हा पुरस्कार नुकताच श्री.डी.डी.विसपुते कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड मॅनेजमेंट, नवीन पनवेल या महाविद्यालयाला घोषित करण्यात आला आहे. 

       हा पुरस्कार दि.24 ऑगस्ट 2021 रोजी रायगड जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या हस्ते श्री.डी.डी.विसपुते कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड मॅनेजमेंट, नवीन पनवेल या कॉलेजच्या वतीने सचिव श्रीमती संगीता विसपुते व  प्राचार्या विद्या मोहोळ यांनी स्विकारला. 

       उच्च शिक्षण विभाग, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या हरित भारत उपक्रमासाठी रायगड जिल्ह्यातील या महाविद्यालयाने एक मानक स्वच्छता कृती योजनाबध्द रितीने राबवून विद्यार्थी आणि परिसर स्तरावर स्वच्छ आणि हरित परिसर साकारण्यासाठी अथक परिश्रम घेतले.  हरित परिसर, परिसर स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि ऊर्जा संवर्धन या विषयांवर एकत्रित काम करण्यासाठी महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि विद्यार्थी यांनी सांघिक अथक प्रयत्न केले.  

     या पुरस्काराचा मुख्य उद्देश स्वच्छ भारत अभियानाकडे विद्यार्थी, प्राध्यापक आणि संस्थांचे फक्त लक्ष वेधणे, हा नव्हता तर कागद, पाणी, ऊर्जा यासारख्या नैसर्गिक संसाधनांचा कमीत कमी वापर कसा होवू शकतो, याबद्दल जागृती करणे हा होता.  

       श्री.डी.डी.विसपुते महाविद्यालयाने स्वच्छतेसाठी आपले काम वाढविले असून यानुषंगाने त्यांनी पनवेल तालुक्यातील विचुंबे हे गाव दत्तक घेतले आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. धनराज विसपुते यांनी घेतलेला पुढाकार तसेच सचिव श्रीमती संगीता विसपुते, प्राचार्या विद्या मोहोड, SAP चे समन्वयक प्रा.दीपक पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांचा यात मोलाचा वाटा आहे.

पेण तालुक्यातील ग्रामपंचायत डोलवी व ग्रुप ग्रामपंचायत वडखळ येथील विविध विकासकामांचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

वडखळ: पेण तालुक्यातील ग्रामपंचायत डोलवी येथे व्यायामशाळा भूमीपूजन, आर-ओ फिल्टर प्लांटचे उद्घाटन व ग्रामपंचायत डोलवी व एम.जी.एम.हॉस्पिटल कामोठे यांच्या सौजन्याने आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते आज संपन्न झाले. 

      तसेच ग्रुप ग्रामपंचायत वडखळ येथे ग्रामपंचायत निधीतून बांधण्यात आलेल्या आधारकेंद्राचे तसेच जिल्हा नियोजन समितीमार्फत नागरी सुविधा योजनेतून बांधलेल्या अभ्यास केंद्राचे उद्घाटन आणि आठवडा बाजाराचे सुशोभिकरण या ग्रामपंचायत हद्दीतील विकासकामांचेही उद्घाटन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या  हस्ते संपन्न झाले.

       यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे,  पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पेण तहसिलदार डॉ.अरुणा जाधव, डोलवीच्या सरपंच श्रीमती वनिता म्हात्रे, वडखळ सरपंच राजेश मोकल, गडब सरपंच अपर्णा कोठेकर, शहाबाद सरपंच धनंजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ  उपस्थित होते.

जिल्ह्यात दि.25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

अलिबाग : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यामध्ये दि.25 सप्टेंबर 2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग श्री.संदीप वि. स्वामी यांनी दिली आहे.

        या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, 138 एन.आय.अॅक्ट, खालील प्रकरणे, दिवाणी अपिले, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे व अपिले ठेवली जाणार आहेत. तसेच नगरपालिका व ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी व पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. 

     राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली केल्यास लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यय होत नाही, पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो. त्यामुळे दि.25 सप्टेंबर 2021 रोजी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग श्रीमती विभा प्र. इंगळे यांनी केले आहे.

वनिता फाऊंडेशनचे संस्थापक व गुणवंत कामगार श्री. प्रभाकर कांबळे याना " आंतरराष्ट्रीय ग्लोबल गोल्ड आयकॉन पुरस्कार " जाहीर ; दि. ५ सप्टेंबर रोजी नवी मुंबई येथे होणार गौरव ..

मुंबई ( प्रतिनिधी) - विक्रोळी टागोर नगर येथील ज्येष्ठ समाजसेवक, वनिता फाऊंडेशनचे संस्थापक व गुणवंत कामगार, महाराष्ट्ररत्न श्री. प्रभाकर तुकाराम कांबळे यांच्या  समाजकार्याची दखल " ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड " या संस्थेने घेतली असून त्यांना दिनांक 5 सप्टेंबर 2021  रोजी शिक्षक दिनानिमित्त खारघर नवी मुंबई येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात विधान परिषद सदस्य शिक्षक आमदार मान. बाळाराम पाटील व झी मीडियाच्या सीनियर पत्रकार अनुपमा खानविलकर - शितोळे यांच्या हस्ते सन 2021 चा " आंतरराष्ट्रीय ग्लोबल गोल्ड आयकॉन अवार्ड "  देऊन गौरवण्यात येणार असल्याचे श्रीराम महाजन यांनी  लेखी पत्रकाद्वारे कळविले आहे.

     गुणवंत कामगार व ज्येष्ठ समाजसेवक तसेच वनिता फाऊंडेशनचे संस्थापक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार विजेते श्री. प्रभाकर तुकाराम कांबळे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व सर्वांना बरोबर घेऊन जाणारे सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून कार्य करणारे सामाजिक शैक्षणिक कला साहित्य सहकार कामगार आरोग्य व पत्रकारिता क्षेत्रात अनेक वर्ष झोकून देऊन महाराष्ट्र शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रत्यक्ष कृतीच्या तसेच वृत्तपत्र लेखांच्या माध्यमातून तळागाळातील समाजात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे महान कार्य करत आहेत. तसेच सामाजिक, शैक्षणिक, कामगार सहकार संबंधी परिवर्तनवादी स्तंभलेखन करून जनतेला जागे करण्याचा प्रयत्न सतत करत आहेत समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन समाज परिवर्तन घडवत आहे. सन 2013 महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार तसेच अनेक संस्था संघटनेकडून दोनशेहून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत.                       

   सह्याद्रीच्या पायथ्याशी असणाऱ्या कोल्हापूर  जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील छोट्याशा गावात भूमिहीन शेतमजूर यांच्या पोटी जन्माला आल्यानंतर गरिबी आणि भूक याची जाणीव करून देणार्‍या संघर्ष खूप जवळून अनुभवला आहे सामाजिक प्रश्नाची जाण असल्यामुळेच आज पर्यंतचा प्रवास हा संघर्षमय सुरू आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या शिका ' संघटित व्हा व संघर्ष करा याचा अवलंब करून समाजकार्य सुरू आहे.                                     

   प्रभाकर कांबळे अनेक सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता व सहकारी संस्था संघटनेच्या विविध पदावर काम करीत आहेत. त्यांचे सामाजिक, कला, सांस्कृतिक, आरोग्य कामगार, सहकार व पत्रकारिता क्षेत्राशी त्यांचे जवळचे नाते असून मुंबईच्या झोपडपट्टी भागात राहून " वनिता फाउंडेशन"  या सामाजिक संस्थेची स्थापना करून " मानव सेवा हीच ईश्वर सेवा " मानून समाज कार्य सुरू केले आहे . त्यांच्या पुढील कार्याच्या  वाटचालीसाठी " ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड " या संस्थेने दखल घेऊन त्यांना " ग्लोबल गोल्ड आयकॉन अवार्ड " देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रेरणा फाउंडेशन तर्फे आदिवासी पिंपळोली गाव बदलापूर येथे धान्य किट वाटप व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करुन वाढदिवस साजरा

ठाणे- प्रेरणा फाउंडेशन ठाणे  महाराष्ट्र राज्य रजि. 564/एफ 38784/बदलापूर/ठाणे /महाराष्ट्र. प्रेरणा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने पिंपळोली  बदलापूर दि. 26/8/2021 गुरुवार रोजी सकाळी ११ ते 3 वाजता उपखजिनदार दिव्या गांवकर यांच्या वाढदिसाच्या निमित्ताने किराणा मालाचे व जीवनावश्यक वस्तूंचे धान्य किट  वाटपाचा कार्यक्रम केला. 

या कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका/अध्यक्षा दिप्ती (प्रेरणा)गांवकर व उपखजिनदार दिव्या गांवकर यांच्या सहकार्याने केले. तसेच या कार्यक्रमासाठी सभासद रोहन गावकर, विकास पवार, सुनील गांवकर यानी मोलाचं सहकार्य केले. वाटाणा,पोहे,मूग, मिठाई साबण,साखर व गहू  तांदूळ डाळ पोहे . मसाला, कडधान्य, मीठ,मसाला,साबण चहा पावडर, असे किट ५० कुटूंबाला पिंपळोली गाव  येथील कुटुबांना वाटप केले. हे देताना गरिबांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच प्रेरणा फाऊंडेशनचे समाधान .पूरग्रस्त शासनापासून वंचित असलेल्या पूरग्रस्त लोकांना मदत करुन प्रेरणा फाउंडेशन च्या उपखजिनदार दिव्या गांवकर यांचा वाढदिवस सुंदर साजरा झाला.  तसेच व्यसनाधीन झालेल्या लोकांना दारूचे दुषपरिणाम सांगितले यांनी आपल्या गावातील दारू बंदी करुन दया तुटलेल्या घराना    काही बेघर विधवा बायकांना घरकुल योजनेतून घर मिळालेली परंतु पूर्ण  पडझड झालेल्या झोपड्या आकारून देण्याचा प्रयत्न करू व कुटूंबाला सावरण्याचे आश्वासन दिले. व सध्या चालू असलेल्या कोरोना आजारापासून आपण स्वतः ची काळजी कशी घ्यावी याचे महत्त्व सांगून तेथील गंभीर परिस्तिथी लक्षात घेऊन काही लोकांना रहाण्यासाठी झोपड्या व मुलांना शिक्षकाची जबाबदारी आपण स्वतः घेऊ असे प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका दिप्ती (प्रेरणा) गावकर यांनी सांगितले. बऱ्याच लोकांच्या जीवनातील समस्या सोडवण्यातही मुलाखत घेऊन त्याची यादी बनवली  नंतर केक कापून मुलांना मिठाई खाऊ वाटून वाटप  करुन या कार्यक्रमासाठी  सांगता झाली.  प्रेरणा फाउंडेशन गोरगरिबांसाठी नेहमीच तत्पर असेल. तेथील महिला दारू पिणाऱ्या नवऱ्यापासून त्रासलेल्या असून  त्यांनी तसे अर्ज संस्थापिका  दीप्ती उर्फ प्रेरणा गांवकर यांच्याकडे दिला आहे. त्या गावातील दारूबंदी करुन बायकांना  व्यसनाधीन झालेल्या पुरुषांपासून मुक्त करू असे धीराचे आश्वासन  दीप्ती प्रेरणा गांवकरयांनी दिले. पोलिसांनी जर योग्य सहकार्य केलें तर नक्की शक्य होईल असे उदगार यांनी काढले.

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

राष्ट्रपती पोलिस पदक विजेते संतोष महादेव पवार यांचा दक्षता हीच सुरक्षा या टीम तर्फे सत्कार ; दक्षता हीच सुरक्षा या वेब मालिकेच्या भागाचे उद्घाटन...!

आदर्श वार्ताहर वृत्तसेवा,मुंबई- सिका थिएटर्स अंतर्गत, रसिका सिने व्हिजन प्रस्तुत.. प्रियांका दत्तात्रय निर्मित आणि आबा पेडणेकर लिखित-दिग्दर्शित दक्षता हीच सुरक्षा या वेब मालिकेच्या ६व्या भागाचे उद्घाटन नुकतेच राष्ट्रपती पोलिस पदक विजेते संतोष महादेव पवार यांच्या शुभहस्ते त्यांच्याच माहीम, मच्छीमार नगर येथील निवासस्थानी पार पडले. संतोष पवार यांना १५ऑगस्ट रोजी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालं आणि प्रजासत्ताक दिना दिवशी (२६ जानेवारी) रोजी पदक देऊन त्यांना सन्मानित केलं जाणार आहे. याचे औचित्य साधून दक्षता हीच सुरक्षा ह्या वेबसिरीज मधील सर्व कलावंत आणि तंत्रज्ञ यांनी मिळून संतोष पवार यांचा त्यांच्याच निवासस्थानी यथोचित सन्मान केला. सत्काराला उत्तर देतांना संतोष पवार यांनी दक्षता च्या सर्व टीम चे कौतुक करून या वेबसिरिज च्या माध्यमातुन वेगवेगळे सामाजिक विषय हाताळून तुम्ही समाजप्रबोधनाचे कार्य करत असून तुमच्या या कार्याला नक्कीच यश मिळेल असे उद्गार काढले. याप्रसंगी रसिका थिएटर्स संस्थेचे संस्थापक तसेच मालिकेचे लेखक-दिग्दर्शक आबा पेडणेकर, निर्माती प्रियांका दत्तात्रय, सहदिग्दर्शक गणेश तळेकर, कलाकार अर्चना तांदळे, सुरेश डाळे, राजन काजरोळकर, राहूल मौजे, दिग्दर्शक-पत्रकार महेश तेटांबे, छायाचित्रकार-संकलक शिवाजी सगरे, ऋषिकेश पेडणेकर, संतोष पवार यांच्या अर्धांगिनी श्रद्धा संतोष पवार आदी मान्यवर उपस्थित होते.


पीपीपी तत्वावर 30 वर्षासाठी जेएनपीटीचे खासगीकरण ; कामगार संघटनेत तीव्र असंतोष

उरण - रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात केंद्र शासनाचा जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हा महत्त्वाचा प्रकल्प कार्यरत आहेत. देशात अनेक कंपन्या, प्रकल्पाचे खासगीकरण झाल्यानंतर आता शेवटी जेएनपीटीचे खासगीकरण सुरू झाले आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेला जेएनपीटीच्या खाजगीकरणाचे ग्लोबल टेंडर निघाले आहे.30 वर्षासाठी पीपीपी तत्त्वावर ग्लोबल टेंडर (निविदा )वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. 18-10-2021हि निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे खासगीकरणाबद्दल कामगारांमध्ये असंतोष पसरला असून केंद्राच्या या कृतीचा विविध कामगार संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. जे एन पी टी चे खासगीकरण होऊ नये यासाठी विविध कामगार संघटनांनी तत्कालीन नौकानयन मंत्री मनसूख मांडवीया यांची भेट घेतली होती. त्यांनी जे एन पी टीच्या कंटेनर टर्मिनलचे कधीहि खासगीकरण करू देणार नाही असा शब्द दिला होता. 24/12/ 2020 रोजी झालेल्या बैठकीत खासगीकरणाचा ठराव मांडण्यात आला होता यात हा ठराव 8 विरुद्ध 2 अश्या मतांनी मंजूर झाला होता.

[ केंद्र सरकारने जेएनपीटीच्या खासगीकरण संदर्भात निविदा काढून कामगारांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.जेएनपीटीच्या खासगीकरणाच्या विरोधात सभा बैठके घेऊन मोठे आंदोलन उभारले जाणार आहे.त्यासाठी कामगार संघटनेच्या बैठका, सभा घेणे सुरू झालेआहे या बैठकीत एकत्रितपणे विचार करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल.]

-दिनेश पाटील,जे.एन.पी.टी-विश्वस्त.


 [ कामगारांना विश्वासात न घेता जेएनपीटीचे खाजगी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. वर्षानुवर्षे जेएनपीटीशी संबंधित प्रकल्पग्रस्तांचे,स्थानिक भूमीपुत्रांचे, बेरोजगारांचे प्रश्न प्रलंबित आहेत त्यांचे प्रश्न न सोडविता जेएनपीटीचे खाजगीकरण सुरू झाले आहे. सर्व कामगारांचा खाजगीकरणाला विरोध आहे. खाजगीकरणाच्या विरोधात मी अनेकदा आवाज उठवीला आहे.शेवटी केंद्र सरकारने कामगारांची,जनतेची दिशाभूल केली आहे.कामगार व जनतेची फसवणूक केली आहे.]

-भूषण पाटील, कामगार नेते तथा जेएनपीटी विश्वस्त


 [ जेएनपीटीच्या कामगारांसाठी व्हीआरएस स्कीम तयार करून मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आली आहे.]- रवींद्र पाटील, जेएनपीटी वर्कस युनियन सरचिटणीस तथा माजी विश्वस्त जेएनपीटी

मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन करून शिवसेना उरण तालुक्या व शहराच्या वतीने जाहीर निषेध

नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा ; शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण यांच्याकडे मागणी

उरण -केंद्रीयमंत्री पदाचा दुरुपयोग करून अतिशय खालच्या पातळीवर वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांची त्यांच्या नेत्यांनी समजूत घालावी तसेच जाहीर माफी मागावी, अन्यथा शिवसैनिक शिवसेना स्टाईलने उत्तर देतील, असा इशारा देण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख,महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्र राज्यात शिवसैनिकांमध्ये तसेच सामान्य जनतेमध्ये संतापाची लाट उसळली. 

   दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र बुधवंत  यांच्याकडे नारायण  राणे यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली  व त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

    यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुकासंपर्कप्रमुख जे.पी. म्हात्रे, शिवसेना गटनेते गणेश शिंदे, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, उरण विधानसभा युवासेना अधिकारी नितेश पाटील, अवजड तालुकाअध्यक्ष चेतन म्हात्रे, उपतालुकाप्रमुख जयवंत पाटील, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, उपतालुकासंघटक के.एम.घरत, उपतालुकासंघटक रुपेश पाटील, माजी नगराध्यक्ष परमानंद करुंगुटकर, विभागप्रमुख एस.के.पुरो, माजी विभागप्रमुख मधुकर ठाकूर, नगरसेवक अतुल ठाकूर, नगरसेवक समीर मुकरी, उपशहरप्रमुख गणेश पाटील, ग्रा.सं.कक्षशहर धीरज बुंदे, अल्पसंख्याक उप-जिल्हाध्यक्ष कुरेशी, अल्पसंख्याक सेल एजाज मुकादम, माजी नगरसेवक निलेश भोईर, माजी सरपंच जगजीवन नाईक, ग्रा.पं.सदस्य धनेश ठाकूर, मा.शहरसंघटक प्रवीण मुकादम, मा.शहरसंघटक महेश वर्तक,  शाखाप्रमुख कमलाकर तांबोळी, शाखाप्रमुख शैलेश भोईर, युवासेना विभाग अधिकारी निशांत घरत, युवसेना चेतन पाटील, युवासेना प्रशांत पाटील, शाखाप्रमुख प्रशांत म्हात्रे, शाखाप्रमुख राकेश तांडेल, शाखाप्रमुख प्रकाश घरत, शाखाप्रमुख रोहिदास म्हात्रे, उपशाखाप्रमुख राजू पाटील, उपजिल्हासंघटिका ममता पाटील, संघटिका प्रणिता म्हात्रे, शहरसंघटिका श्रद्धा सावंत, संदिप जाधव, धनाजी भोईर, संदिप पाटील, राकेश कोळी, नंदकुमार पाटील, संजय मेश्राम, भारत पाटील, अशोक म्हात्रे, निलेश म्हात्रे, गणेश तांबोळी, यज्ञेश गोवारीम, निखिल पाटील, निरंतर सावंत, सम्राट घरत आदिसह शिवसैनिक उपस्थिती होते.

प्रसिद्ध अभिनेते, साहित्यिक, कवी आणि पत्रकार यांच्या उपस्थितीत आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार सोहळा संपन्न..!

मुंबई-दादर (प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)  आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण सो...