आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची ऑनलाईन बैठक संपन्न ; नागरिकांच्या विविध प्रश्नांवर घडली साधक-बाधक चर्चा

रायगड :- जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक काल (दि.30 ऑगस्ट 2021) रोजी "वेब एक्स" या दूरदृष्य प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. 

       या बैठकीस समितीचे शासकीय सदस्य या नात्याने जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके,सहाय्यक आयुक्त (अन्न) लक्ष्मण दराडे, जिल्हा वजनमापे नियंत्रक राम राठोड, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजित पिंगळे, पोलीस अधीक्षक कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, स्टेट बँक ऑफ इंडिया या शासकीय कार्यालयाचे प्रतिनिधी हे शासकीय सदस्य तर प्रा.डॉ.संगिता चित्रकोटी, पत्रकार उद्धव आव्हाड, गणेश भोईर, विनायक सारणेकर, सचिन पिंगळे, यशवंत बागूल, डॉ.फरीद चिमावकर, अनंत गुरव, स्नेहा येरुणकर, प्रशांत बच्छाव, अमित कांबळे, नागेश वाकडे, संदीप चाचले, मकरंद जोशी हे अशासकीय सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.

      बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले व अशासकीय सदस्यांना त्यांच्या जिल्हा ग्राहक संरक्षण संबंधीच्या अडीअडचणी तसेच काही सूचना असल्यास त्या मांडण्याबाबत विनंती केली.यानुषंगाने नागरिकांच्या रेशन कार्ड, बँक खाते, जनधन अकाउंट, मिठाई किंवा तत्सम दुकानातील अन्न भेसळीचे प्रकार, महावितरणची देयके इत्यादी विषयांबाबत ग्राहकांच्या छोट्या-मोठ्या समस्यांविषयी समिती सदस्यांनी साधक-बाधक चर्चा केली. तसेच ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनीही आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ राबविण्याविषयी, कार्यवाही करण्याविषयी  आश्वस्त केले.

    याशिवाय करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर सर्व नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून स्वतःचे, कुटुंबाचे आणि समाजाचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचे मत सर्वांनी मांडले. त्या दृष्टीने प्रशासन आणि जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य मिळून नागरिकांचे प्रबोधन करतील,असेही सर्वानुमते ठरले.या ऑनलाईन बैठकीच्या संपूर्ण समन्वयाची जबाबदारी जिल्हा पुरवठा शाखेच्या श्रीमती मयुरा घरत यांनी उत्तमरित्या सांभाळली.

    बैठकीच्या शेवटी जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी उपस्थित सर्व शासकीय व अशासकीय समिती सदस्यांना पुढील काळात येणाऱ्या सण-उत्सवानिमित्त शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...