आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

आमच्या विषयी


वाचकहो, 6 जानेवारी 2020 या पत्रकारदिनी "आदर्श वार्ताहर "या वृत्तपत्राचे  (पाक्षिक )मुंबईतून प्रकाशन झाले. वृत्तपत्र सृष्टीत नव्याने दाखल झालेले सर्वसमावेशक, निःपक्ष, निर्भीड बाण्याचे हे  मराठी पाक्षिक सध्या वाचकप्रिय होऊन सर्वांकडून त्याचे कौतुक केले जात आहे. 
या पाक्षिकाच्या  माध्यमातून आमचा  वाचनसंस्कृती अन वाचनप्रेरणा कायम टिकवून ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
  मात्र वृत्तपत्राच्या माध्यमा व्यतिरिक्त हे पाक्षिक  आणखीन सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी व त्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी आम्ही माहिती -तंत्रज्ञाना सारखा आधुनिक पर्याय स्वीकारला आहे . सध्याचे हे युग अतिशय जलद असून इंटरनेटच्या जाळ्यामुळे संपूर्ण माहिती केवल कॉम्पुटर -लॅपटॉपवरच नाही तर  हातातील अँड्रॉइड  मोबाईल मध्ये पाहणे शक्य झाले आहे. आज प्रत्येकाकडे  आपल्या मोबाईल च्या माध्यमातून फेसबुक,व्हाट्सअप  ट्विटर, इंस्टाग्राम व इतर समाजमाध्यमांवर (सोशल साईट )अगदी केव्हाही, कुठेही, कोणत्याही प्रकारची माहिती अगदी क्षणार्धात पोहचत आहे.
नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन आम्ही आदर्श वार्ताहर (ADARDH VARTAHAR) च्या ब्लॉग साईटची निर्मिती केली. हि  साईट म्हणजे एक वेब न्युज पोर्टल आहे.
या पोर्टलमध्ये आम्ही देश -विदेश यासह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्या -घडामोडी, कर्तृत्ववान व्यक्तींचे लेख -मुलाखती, विशेष -प्रासंगिक, वैचारिक तसेच आरोग्य, शैक्षणिक विषयक लेख, प्रबोधनात्मक -सामाजिक कविता, चारोळ्या व अन्य साहित्य प्रसिद्ध -प्रकाशित करीत असतो. 

    "प्रसिद्धी तुमची -साथ आमची" हे आमचे ब्रीदवाक्य असून विश्वासार्हता कायम राखत आपल्या पसंतीस उतरणे यास आम्ही प्राधान्य देत आहोत.त्यासाठी आपली साथ आणि सहकार्य कायम मिळत राहो हिच अपेक्षा.धन्यवाद 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

समाजसेवक कृष्णा कदम यांचा हभप विठोबाआण्णा मालुसरे स्मृती सन्मान पुरस्काराने गौरव

मुंबई (शांताराम गुडेकर )स्वातंत्र्यसेनानी आणि तत्कालीन कुलाबा जिल्हा कृषी सभापती वै.हभप विठोबाआण्णा मालुसरे यांच्या जन्मशताब्दी ...