आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२६

वासिंद नगरीत राष्ट्रभक्तीचा जागर! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भव्य विजयादशमी उत्सव संपन्न होणार !!

सरस्वती विद्यालयाचे उपप्राचार्य श्री. वासुदेव तुकाराम भोईर यांची प्रमुख उपस्थिती

वासिंद (हर्षल शेलवले): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वासिंद मंडळाच्या वतीने विजयादशमी उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रभक्ती, हिंदू संघटन आणि समाज प्रबोधन या त्रिसूत्रीवर हा उत्सव साजरा होणार आहे.
     येत्या मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर रोजी, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर, निसर्ग गार्डन हॉल, वासिंद येथे हा उत्सव संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सरस्वती विद्यालयाचे उपप्राचार्य श्री. वासुदेव तुकाराम भोईर हे उपस्थित राहणार आहेत.तसेच उत्सव वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहापूर तालुका कार्यवाह श्री.योगेश जोशी असणार आहेत.
     "विजयादशमी म्हणजे अधर्मावर धर्माचा विजय. 
या पवित्र दिवशी संघाचे स्वयंसेवक राष्ट्रसेवेचा संकल्प करतात. वासिंद परिसरातील प्रत्येक देशप्रेमी नागरिकाने या उत्सवात सहभागी होऊन राष्ट्रकार्यात आपले योगदान द्यावे," असे आवाहन वासिंद उपखंड प्रमुख श्री.जगदीश भोईर व सर्व स्वयंसेवकांनी केले आहे.

जनता हायस्कूल गडब विद्यालयास सौ. करुणा तुरे व श्री. नंदकुमार तुरे यांच्याकडून १४ प्लास्टिक खुर्च्यांची सप्रेम भेट

गडब (अवंतिका म्हात्रे ): येथील नामांकित शिक्षण संस्था जनता हायस्कूल गडब विद्यालयास खारपाले येथील मूळ रहिवासी व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. करुणा तुरे (मॅडम) तसेच त्यांचे चिरंजीव श्री. नंदकुमार तुरे (दुबई) यांच्या वतीने १४ प्लास्टिक खुर्च्या सप्रेम भेट देण्यात आल्या. या उपयुक्त वस्तूभेटीमुळे विद्यालयाची बैठक व्यवस्थेची महत्त्वाची गरज पूर्ण झाली आहे.
        सौ. करुणा तुरे या मुंबईत विविध सामाजिक कार्यांत सातत्याने सक्रिय असतात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यांसह विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांत त्यांचा नियमित पुढाकार असतो. विशेष म्हणजे, त्या जनता हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी असून त्यांनी आपल्या शाळेप्रती दाखवलेल्या या कृतज्ञतेचे व स्नेहाचे गडब पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मनःपूर्वक कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आहे.
या सामाजिक दातृत्वाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सोनवणे सर, श्री. एस. के. पाटील सर, श्री. पांडे सर, श्री. मांडवे सर, श्री. नेवरे सर, सौ. आर. आर. पाटील मॅडम, सौ. घरात मॅडम, श्री. चौधरी सर, श्री. शेळके सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी तुरे कुटुंबीयांचे आभार मानले.

वासिंद नगरीत राष्ट्रभक्तीचा जागर! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भव्य विजयादशमी उत्सव संपन्न होणार !!

सरस्वती विद्यालयाचे उपप्राचार्य श्री. वासुदेव तुकाराम भोईर यांची प्रमुख उपस्थिती वासिंद (हर्षल शेलवले):  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वासिंद...