संत ज्ञानोबाराय द्वितीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातील संख्या मान्यवरांच्या सारस्वतांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना डॉ राम शिंदे म्हणाले की, ज्ञानोबांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार म्हणजे माझे सौभाग्यच आहे आणि हा माऊलीचा प्रसाद मला प्राप्त झाला हे मी माझे परमभाग्य समजतो. यावेळी त्यांनी पुरस्कार निवड समिती स्वतः अध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज, लेखक संदीप जी राक्षे, लोककवी विजयजी पोहनेरकर, कवयित्री अलका बोर्डे, चित्रकार अरविंद जी शेलार, उद्योजक शांताराम गायकवाड या सर्वांनी ज्ञानरत्न पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानले. ज्ञानेश्वराच्या पावनस्पर्शाने पवित्र झालेल्या अपेगावी हा सन्मान झाला, त्याबद्दल जो आनंद होत आहे तो शब्दांच्या पलीकडे आहे. शब्दांमध्ये गुंफून ठेवणे केवळ अशक्यच आहे असेही ते पुढे म्हणाले.
पुरस्कार प्रदान करताना जी साहित्य मुद्रा वाचली गेली ती अत्यंत शब्दामृताने ओतप्रोत भरलेली अशी होती. साहित्य मुद्रेचे शब्दांकन पुढील प्रमाणे होते. सारस्वतांच्या चिद्राकाशात आपल्या अपूर्व तेजाने तळपणाऱ्या सत्-चित्त आनंदरुपी योगीयांचे मुकुटमणी, ज्ञानभास्कर, संतकुलश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मभूमीत आपणांस ज्ञानरत्न पुरस्काराने सन्मानित करतांना विशेष आनंद होत आहे ! समाज मनावर नवरसांच्या माध्यमातून संस्कार करणाऱ्या आपल्या सृजनात्मक सुगंधी लेखणी चा दरवळ सदैव बहरत राहो हीच शुभेच्छा !
"कुठल्याही पुरस्कारापेक्षाही ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने मिळणारा हा ज्ञान रत्न पुरस्कार सर्वश्रेष्ठ असाच मी मानतो" असे डॉ. राम शिंदे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा