आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २८ सप्टेंबर, २०२५

पर्यावरण प्रदर्शनाचे आयोजन

नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृष्टी २०२५ - वेस्ट टू वेल्थ दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आले. शाश्वत विकासासाठी नवोन्मेषी उपाय सुचविणे, सर्जनशील कल्पनांना प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जागृती निर्माण करणे या उद्देशाने आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन समीर शाह (विप्रो) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. प्रसंगी महाविद्यालयाचे व्यवस्थापन सदस्य डॉ. एस. व्ही. विश्वनाथन, विशाल गडा, डॉ. को. एल. रॉय चौधुरी उपस्थित होते.
     प्रदर्शनाचे परीक्षण कीर्ती कॉलेजचे निवृत्त पर्यावरण सेवी डॉ. स्मिता जाधव आणि झेवियर्स मुंबई कॉलेजचे निवृत्त शिक्षक डॉ. स्मिता दास या शिक्षण तज्ञांनी केले.या वर्षीच्या प्रदर्शनात ४० महाविद्यालयांमधील ५२ संघांनी सहभाग नोंदवला. ज्यात एकूण १२९ विद्यार्थी व शिक्षकांनी आपली सादरी करणे सादर केली. वेस्ट टू वेल्थ या विषयावर आधारित या प्रदर्शनात प्रकल्प व मॉडेल्स द्वारे कचऱ्याचे पुनर्वापर करून उपयुक्त साधनांमध्ये रूपांतर करण्याचे अभिनव मार्ग सादर करण्यात आले. प्रसंगी प्रथम पुरस्कार सेंट मेरी मल्टीपर्पज स्कूल, द्वितीय पुरस्कार सोमय्या ज्युनिअर कॉलेज, तृतीय पुरस्कार रामशेठ ठाकूर विद्या मंदिर या पुरस्कार प्राप्त संस्थांना मान्यवराच्या हस्ते सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. 
     आदित्य सुब्रमण्यम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या प्रदर्शनीच्या समारोप समारंभात महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला. शेवटी विद्यालयाच्या उपप्राचार्या सुमिता अंभोरे यांनी सहभागी झालेल्या सर्व संघांचे त्याचप्रमाणे उपस्थितांचे व मान्यवरांचे यथोचित आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

स्वागत दिवाळी अंकाचे

स्वागत दिवाळी अंकाचे छायांकित दिवाळी अंक २०२५ (पोस्टमन) मराठी साहित्य क्षेत्रात प्रथमच "पोस्टमन" या विशेष व्यक्तिमत्त्...