सांताक्रुझची आई जगदंबा
मुंबईतील सांताक्रूझ (पूर्व ) येथील नवयुवक नवरात्रौत्सव मंडळाने विराजमान केलेली देवीची हि मनमोहक मूर्ती.यावर्षी मंडळाने “मराठी आणि महाराष्ट्र” हा देखावा साकारला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि शौर्याचा गौरव करत, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व माता दुर्गेची उपासना यांचा सुंदर संगम या सजावटीत मांडला आहे.
विशेष म्हणजे सजावटीत मराठी पंचांगातील महिने देखील दाखवले असून, त्यातून आपल्या पारंपरिक दिनदर्शिकेचा आणि सांस्कृतिक वारसा याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे.या माध्यमातून समाजात अभिमान , शौर्य अन् भक्तीची भावना जागवून आपल्या संस्कृतीचे जतन व स्मरण करून देवीच्या कृपेने शक्ती, समृद्धी व ऐक्याची प्रेरणा मिळावी हा मंडळाचा प्रामाणिक हेतू असल्याचे यावर्षी नवरात्री उत्सवातून अधोरेखित केले आहे.
जय भवानी, जय शिवराय!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा