माता सप्तश्रृंगी देवी
'अर्ध शक्तिपीठ'
महाराष्ट्र राज्यामधी
जिल्हा नाशिक तो असे
पायथ्याशी नांदुरीच्या
सप्तश्रृंगी गड वसे..१
साडे तीन पीठांपैकी
वणी देवी सप्तश्रृंगी
'अर्धे शक्तिपीठ' असे
मनोहारी रुप अंगी..२
अष्टभूजा रुप तुझे
साडी अकरा वारीची
तीन खणांची चोळी ही
सप्तश्रृंगी या देवीची..३
शिरी सोनेरी मुकुट
कर्णफूले शोभतात
नाकामध्ये नथ असे
मंगलसूत्राची साथ..४
पूतळ्यांचे ते गाठले
तोडे असती पायात
शोभे तो कमरपट्टा
रूप देवीचे साक्षात..५
महाकाली,महालक्ष्मी
आणि महासरस्वती
ब्रह्मस्वरुपिणी रूप
सप्तश्रृंगी भगवती..६
सात शिखरांचा गड
सप्तश्रृंगी हे शिखर
मार्कंडेय ऋषींमूनी
स्थापनेचे शिल्पकार..७
-------------------------------
नवनाथ ठाकुर-खिडकाळी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा