ठाणे (प्रतिनिधी)अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान, बालक मंदिर संस्था कल्याण, सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित ३६ तासांचे वाचन यज्ञ उत्साह आणि नियोजनबद्ध पार पडले. यातील शंकर सखाराम पाटील वाचन सत्रात आगरी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी वेगवेगळ्या धाटणीच्या कविता सादर करून सर्वच आगरी कवींनी उपस्थितांची दाद मिळवली.
दरम्यान हे वाचन सत्र तीन सत्रात झाले असून त्या तिन्ही सत्रात अध्यक्ष पाहुणे म्हणून अनुक्रमे श्री. म. वा. म्हात्रे ज्येष्ठ साहित्यिक कादंबरीकार कथाकार, श्री पुंडलिक म्हात्रे ज्येष्ठ कवी नाटककार रायगड भूषण, श्री रामनाथ म्हात्रे ज्येष्ठ कवी गीतकार संगीतकार हे उपस्थित होते तसेच प्रसिद्ध कवी जागो ग्राहक जागो चे मंत्रालयातील अधिकारी कवी गजानन पाटील, युवा पत्रकार नरेंद्र पाटील, खाडीवरची माडी फेम गज आनन म्हात्रे, नाट्यकर्मी कवी सत्यवान पाटील, ज्येष्ठ कवी भानुदास पाटील , गीतकार संगीतकार कवी दया नाईक, प्रसिध्द युवा साहित्यिक प्रथम म्हात्रे, प्रसिध्द आगरी कवी जयंत पाटील, प्रसिद्ध धावलारीन आगरी पुरोहित सरशीबाईठाकूर, प्रसिद्ध कवियत्री स्नेहाराणी गायकवाड आणि आगरवाट काव्य मैफिलीचे प्रसिद्ध कवी संदेश भोईर यांची उपस्थिती लाभली तसेच या प्रसंगी युवा कवी हरिश्चंद्र दळवी, मंगेश मात्रे, रवी भांडे, नवनाथ ठाकूर, सुनील म्हसकर, जय म्हात्रे, गोपीनाथ ठाकूर, अश्विनी म्हात्रे नीतुराज पाटील यांनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या
दरम्यान ह्या तीनही सत्राचे काव्यात्मक निवेदन अनुक्रमे प्रसिद्ध डॉक्टर कवयित्री शोभा पाटील, प्रसिद्ध कवयित्री कोशेट फेम निर्मला पाटील, प्रसिद्ध अभिनेत्री कवयित्री प्रज्ञा म्हात्रे यांनी केले या संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून नियोजन प्रसिद्ध कवी श्री संदेश भोईर यांनी केले पूर्ण आयोजनाची जबाबदारी असताना अक्षरमंच प्रतिष्ठानचे योगेश जोशी सर, सार्वजनिक वाचनालयाचे भिकू बारस्कर सर, बालक मंदिर संस्थेच्या तेजस्विनी पाठक मॅडम, हेमंत नेहते सर, क्षीरसागर सर आणि दैनिक प्रहार चे संपादक सुकृत खांडेकर सर आगरी कविता ऐकायला आवर्जून उपस्थित होते
दरम्यान आगरी कवी संमेलनाच्या सत्रा नंतर समारोपाचे सत्र झाले त्यात आलेल्या पाहुण्यांनी आणि वक्त्यांनी आगरी कवितांच्या सत्रांचे तोंड भरून कौतुक केले तर कुटुंब रंगले काव्यात फेम विसू भाऊंनी तर आगरी कवींच्या कविता आठवण म्हणून त्यांच्या खास डायरीत ज्यात गदिमांपासून अनेकांच्या कविता हस्ताक्षरात आहेत त्यात आगरी कवींच्या कविता लिहायला सांगून आगरी कवींचा व कवितांचा सन्मान केला.
