आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६

शासनाच्या मिशन बंधारे अभियानात ग्रामपंचायत दमामे-तामोंड येथील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग!!

दापोली : (विशाल मोरे ) तालुक्यातील ग्रामपंचायत दमामे- तामोंड या गावातील सुतारवाडी, बुद्धवाडी गुरववाडी, मधलीवाडी, वडाचीवाडी, हनुमान वाडी येथील सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन श्रमदानातून नुकतीच बंधारे उभारणी केली आहे.
      आगामी काळातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि पाण्याचा साठा वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या ‘मिशन बंधारे विशेष अभियानात ग्रामपंचायत दमामे-तमोड येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार, १५ ऑक्टोबर रोजी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात किमान २० बंधारे बांधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत ग्रामपंचायत दमामे-तामोंड यांच्या पुढाकाराने बंधारे बांधण्याची मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत गावातील सर्व तरुणवर्ग,महिला आणि ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून बंधारे बांधण्याचे काम केले. आवश्यक साहित्याची जमवाजमव करून सर्वांनी आपल्या परीने योगदान दिले. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि सामूहिक प्रयत्नांमुळे या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
        या उपक्रमात ग्रामसेवक श्री.अशोक त्रिंबक शिंदे सरपंच,श्रीम. अर्पिता अनंत शिगवण,उपसरपंच श्री. गंगाराम हरवडे, सदस्या श्रीम. रुपाली निलेश हरावडे सदस्य श्री तानाजी बाबु पडयाळ,श्री. महादेव बेंडू सावंत,पं.कर्मचारी. श्री. शंकर रामचंद्र धनावडे आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी बंधारे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे अशा जलसंधारणाच्या उपक्रमांमध्ये प्रत्येक गावाने पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे.
गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांची एकजूट आणि श्रमदान हीच खरी ताकद आहे, हे ग्रामपंचायत दमामे-तमोंड येथील ग्रामस्थांनी या उपक्रमातून दाखवून दिले. जलसंधारणाच्या या सामाजिक कार्यात सहभागी झालेल्या सर्व ग्रामस्थांचे आणि मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.
जलसंधारणाचा निर्धार, पाणी समृद्ध गावाचा विचार!
आजचा बंधारा, उद्याच्या पाण्याचा आधार !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शासनाच्या मिशन बंधारे अभियानात ग्रामपंचायत दमामे-तामोंड येथील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग!!

दापोली : (विशाल मोरे ) तालुक्यातील ग्रामपंचायत दमामे- तामोंड या गावातील सुतारवाडी, बुद्धवाडी गुरववाडी, मधलीवाडी, वडाचीवाडी, हनुमान वाडी येथ...