कल्याण:(प्रतिनिधी-सुनील इंगळे) मराठी विज्ञान परिषद – ठाणे विभाग आणि इंदाला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,पॉलिटेक्निक अँड फार्मसी,कल्याण–मुरबाड रोड, बापसई यांच्या संयुक्त विद्यमाने “सृजन कुंभ 2026” या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण *उदोयन्मुख तंत्रज्ञान* समिटचे आयोजन करण्यात आले आहे. नवोन्मेष, संशोधन आणि तंत्रज्ञानाला चालना देण्याच्या उद्देशाने हे समिट *दि. 17 व 18 जानेवारी 2026* रोजी इंदाला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक अँड फार्मसी,कल्याण–मुरबाड रोड, बापसई कल्याण येथे आयोजित करण्यात येणार आहे.सृजन कुंभ 2026 या उपक्रमामध्ये शैक्षणिक तज्ञ, संशोधक, उद्योगतज्ज्ञ, स्टार्टअप्स,नवोन्मेषक, उद्योजक आणि विद्यार्थी यांना एकत्र आणून उद्योगमुख तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण संशोधन, व्यावहारिक उपयोगआणि भविष्यातील संधींवर उदोयन्मुख तंत्रज्ञान याविषयी सखोल चर्चा करण्यात येणार आहे. उद्योग–अकॅडेमिया सहकार्य,कौशल्य विकास, कल्पनांचे रूपांतर आणि भविष्यातील करिअर संधी निर्माण करणे हा या समिटचा प्रमुख उद्देश आहे. नवऊद्योजक सहाय्य, स्टार्टअप चे सादरीकरण
*समिटविषयी माहिती*
दोन दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय समिटमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यामार्फत सर्जनशीलता वृद्धिंगत करणे, संशोधनाभिमुखता निर्माण करणे आणि प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.आधुनिक तंत्रज्ञान व कारखान्यांनाआवश्यक असलेले मनुष्यबळ निर्मिती, स्टार्टअप यांना सहाय्य आणि त्यांचे सादरीकरण
मुख्य उपक्रम तज्ञ व्याख्याने व थीमॅटिक सत्रे – प्रख्यात वैज्ञानिक, तंत्रज्ञान व उद्योगतज्ज्ञांचा सहभाग तंत्रज्ञान प्रदर्शन –स्टार्टअप्स, उद्योग व विद्यार्थ्यांनी विकसित केलेली अभिनव उत्पादने, मॉडेल्स व प्रोटोटाइप्स कार्यशाळा (वर्कशॉप्स)-रोबोटिक्स, IoT, 3D प्रिंटिंग व उदयोन्मुख तंत्रज्ञानांवरील प्रत्यक्ष प्रशिक्षण*पॅनल चर्चा-उद्योगमुख तंत्रज्ञानाची दिशा,नवोन्मेष पर्यावरण, कौशल्य विकास व उद्योगातील नव्या संधी
मॉडेल मेकिंग व पोस्टर सादरीकरण स्पर्धा-विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती व सर्जनशीलतेला चालना विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादरीकरण आणि स्टार्टअप साठी मार्गदर्शन स्टार्टअप चे सादरीकरण
ICETPR 2026– आंतरराष्ट्रीय परिषद – उद्योगमुख तंत्रज्ञान व आंतरशाखीय संशोधनावरील उच्च दर्जाचे संशोधन पेपर्स सादरीकरण
सृजन कुंभ 2026 चे प्रमुख विषय
“उद्योगमुख तंत्रज्ञान – AI (कृत्रिम बुद्धिमत्ता), ML, IoT, रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग आणि सायबर सुरक्षा, ड्रोन टेकनॉलॉजी.
मार्गदर्शन करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्ती
ख्यातनाम शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर,पद्मभूषण डॉ. जे. बी. जोशी (कुलपती, ICT मुंबई)डॉ. एस. वेंकटेश शर्मा (माजी कार्यक्रम संचालक, ISRO)
*निश्चित वक्ते व त्यांची संस्था
प्रा.पी.एस.के.नटराज-प्राध्यापक,IIT बॉम्बे
श्री.भुवनसिंग दमाहे-डीजीएम, L&T
श्री अतुल कहाते-भावनिक शिक्षणतज्ज्ञ,ट्रेनर व लेखक, श्री ऋषिकेश पाटणकर-उपाध्यक्ष,NSDC
डॉ.सुभाष देशमुख-संचालक, NCVET दिल्ली,श्री.नितीन कोमावर-संस्थापक,Grok लेअरनिंग Pvt लटड.,डॉ.विनायक मेंढेकर-सहयोगी प्राध्यापक, के.जे.सोमय्या कॉलेज
भागीदार संस्था
RCIIF, WISE SNDT, IDEMI, Grok, Indrones, MET, NTTF, Wadhwani Foundation (NEN), AVNL, DroneAcharyaUdaan LLP, The Good Work, III-RF
लक्षित सहभागी
इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, ITI, फार्मसी व विज्ञान शाखेतील विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ व नवोन्मेष-आधारित संस्था, स्टार्टअप तसेच सर्व नागरिकांनी या परिषदेचा लाभ घ्यावा असे आवाहन सृजनकुंभ परिषदचे समन्वयक डॉ विजय महाजन यांनी केले...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा