आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ८ जानेवारी, २०२६

लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांच्या 'सिंदूर' या दिवाळी अंकाला महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाकडून पुरस्कार

मुंबई (शांताराम गुडेकर):  लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांच्या 'सिंदूर' या दिवाळी अंकाला महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवी वर्ष आणि पत्रकार दिनानिमित्त बी. आर. दंडवते सभागृह, महाराष्ट्र हायस्कूल शेजारी, ना.म.जोशी मार्ग, करी रोड (प), मुंबई येथील सभागृहात मान्यवरांच्या हस्ते मंगळवार दिनांक ६/१/२०२६ मुंबईचे माजी नगरपाल (मुंबईचे शेरीफ) जगन्नाथ हेगडे, जेष्ठ संपादक डॉ.सुकृत खांडेकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि कवयित्री सौ. जयश्रीताई संगितराव, संघाचे प्रमुख कार्यवाहक अशोक भोसले आणि संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटकर यांच्या उपस्थितीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
        यावेळी २५ पत्रकार आणि ५ दिवाळी अंकासाठी" संपादकांना शाल- सन्मान चिन्ह- सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले' करण्यात आले. बाळकृष्ण कासार हे गेली चाळीस वर्षे पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून लोकनिर्माण मराठी वृत्तपत्र, लोकनिर्माण प्रिंट अॅंड डिजिटल मिडीया आणि लोकनिर्माण न्युज चॅनल चे संपादक असून, काही पत्रकार संघटनेचे आणि सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आहेत.त्यांना अनेक संस्थाकडून ४६ राज्य, चार राष्ट्रीय आणि एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले असून दिवाळी अंकाला दोन राज्य पुरस्कार प्राप्त झालेले असून, कोविड १९ या दिवाळी अंकाला आंतरराष्ट्रीय मराठी दिवाळी अंक संघटनेकडून उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
        यावेळी डॉ. सुकृत खांडेकर,शशिकांत सावंत, विलास देवळेकर, गणेश तळेकर, संपत सुवर्णा, सुनिल भुजबळ, विलास कासार, प्रसाद शेट्ये, हिरामण निकम, दत्ता खंदारे, दिलीप शेडगे आणि विविध ठिकाणांहून आलेले पत्रकार आणि संपादक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांच्या 'सिंदूर' या दिवाळी अंकाला महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाकडून पुरस्कार

मुंबई (शांताराम गुडेकर):  लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांच्या 'सिंदूर' या दिवाळी अंकाला महाराष्ट्र मुक...