मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना(ऊ.बा.ठा )शाखा २०४ यांच्या संयुक्त विद्यमाने परळ गावात "नवोदित मुंबई श्री" २०२४ शरीरसौष्ठवं स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण ११० खेळाडूंनी भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी केली. स्पर्धेत महिला बॉडीबिल्डर्स ने सहभाग घेऊन स्पर्धा रंगतदार करून दाखवली. "नवोदित मुंबई श्री"चा उदय धुमाळ 'किताब विजेता आणि मंगेश बेत उपविजेता ठरला. महिला गटात हर्षदा पवार हिने पहिला क्रमांक पटकावला. संघटनेचे अध्यक्ष राहुल कनाल,जनरल सेक्रेटरी अमोल कांबळी आणि खजिनदार जोसेफराज ऍंथोनी,संतोष पवार,प्रभाकर कदम, सर्वेश पराडकर, सूर्यकांत सालम,मंदार आगवणकर राकेश बाईंग या युवा कार्यकारिणीमुळे पुन्हा एकदा बॉडीबिल्डिंग क्षेत्राला सुगीचे दिवस दिसत आहेत. मुलांनी व्यसनाच्या आहारी न जाता हेल्थ आणि फिटनेस क्षेत्रात आपलं नाव उंचाविण्याच्या दृष्टीने येणाऱ्या आगामी काळात "ज्यु. महाराष्ट्र श्री", "मुंबई श्री" तसेच "महाराष्ट्र श्री २०२४" अश्या अनेक मानाच्या स्पर्धेचें आयोजन संघटनेमार्फत करण्यात येणार आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
स्वागत दिवाळी अंकाचे
स्वागत दिवाळी अंकाचे छायांकित दिवाळी अंक २०२५ (पोस्टमन) मराठी साहित्य क्षेत्रात प्रथमच "पोस्टमन" या विशेष व्यक्तिमत्त्...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा