आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ७ फेब्रुवारी, २०२४

बौद्धजन पंचायत समिती निवडणूक मंडळ ग्रामीण शाखा निवडणूकीकरता रत्नागिरीत दाखल

रत्नागिरी दि. ७ (अधिराज्य) बौद्धजन पंचायत समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई - १२ येथे मध्यवर्ती कोन्सिलची सभा ३० डिसेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती सदर सभेत ठराव क्र. ४ अन्वये निवडणूक मंडळ गठीत करण्यात आले, सदर निवडणूक मंडळाला मध्यवर्ती कोन्सिलच्या सर्वसाधारण सभेत सागरी प्रांतातील ग्रामीण शाखा यांचे पंचपदाधिकारी आणि तालूका शाखा यांचे पंचपदाधिकारी यांच्या निवडणूका घेण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आणि निवडणुकीकरता मंजुरी देण्यात आली त्या अनुषंगाने निवडणूक मंडळाने १ जानेवारी २०२४ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२७ अश्या त्रिवार्षिक कालावधीकरता ग्रामीण शाखा यांचे पंचपदाधिकारी आणि १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२९ अश्या पंचवार्षिक कालावधीकरता तालूका शाखा यांचे पंचपदाधिकारी पदाकरिता निवडणूका घेण्यात येतील असे जाहीर करण्यात आले.

सदर मध्यवर्ती कोन्सिल सभेचा ठराव आणि निवडणूक मंडळाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार निवडणूक मंडळ अध्यक्ष मिलिंद तुकाराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, शिवाजीनगर, रत्नागिरी येथे दाखल झाले असून निवडणूक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद तुकाराम जाधव, चिटणीस विजय जाधव, सदस्य चंद्रकांत लोखंडे आणि मर्चंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रियेला आनंदी व चैतन्यमय वातावरणात मोठ्या उत्साहात सुरवात झाली आहे, सदर निवडणूक मंडळ रत्नागिरी नंतर चिपळूण, दापोली, महाड, माणगाव, अलिबाग याठिकाणी ही जाऊन निवडणूका घेणार आहेत सदर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व लोकशाही पध्दतीने घेण्यात येणार असून मतदात्यांनी आपले अमूल्य मत योग्य व पात्र उमेदवारास देऊन योग्य उमेदवार निवडून द्यावा असे मत अध्यक्ष मिलिंद तुकाराम जाधव यांनी आमच्या प्रतिनिधींशी चर्चा करत असताना व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

विसर्जनावेळी “श्री स्वामी समर्थ कट्टा ” परिवाराकडून गणेश भक्तांना पुरी भाजी

मुंबई : आर्थर रोड येथील श्री स्वामी समर्थ मठात कै राजेंद्र विश्राम चव्हाण यांच्या स्मरणार्थ, गणेश भक्तांना पुरी-भाजीचे वाटप करण्...