मुंबई : बौद्धजन पंचायत समितीचे सभापती, इंदू मिलचे प्रणेते, सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार तसेच कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत आणि राजेश घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनमानसात पाली भाषेची जागरूकता निर्माण होऊन सर्वांनी पाली भाषा आत्मसात करून वैभवशाली धम्माचा इतिहास संशोधन करावे तसेच पाली भाषा व धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उदात्त हेतूने बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कार समिती अध्यक्ष मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली पाच दिवसीय पाली प्रशिक्षण शिबिराचे आयोजन बौद्धजन पंचायत समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई - १२ येथे करण्यात आले होते.
सदर प्रसंगी सूत्रसंचालन संस्कार समिती चिटणीस मनोहर बा. मोरे यांनी केले, सदर पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिरात पाली भाषा ज्ञानदानाचे प्रशिक्षण आयु. विकास ढवळे सर यांनी दिले त्यांनी पाली भाषा, तिची बाराखडी, मुळाक्षरे, स्वर, व्यंजन, ह्रस्व दीर्घ यांची तोंडओळख, त्यांचे उच्चार, मांडणी याची अत्यंत सोप्या भाषेत माहिती देत शिबिरार्थींकडून त्याची उजळणी करून घेतली व यशस्वीरित्या शिबीर संपन्न केले, त्यासोबतच सदर प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या सर्व बौद्धचार्य, बौद्धाचार्या यांना कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत आणि सरचिटणीस राजेश घाडगे यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यकामास कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे, चिटणीस श्रीधर साळवी, संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार, चिटणीस मनोहर बा. मोरे हे उपस्थित होते त्यांनी आपले मौलिक शुभेच्छापर मते व्यक्त केली तसेच मंगेश पवार यांनी बौद्धचार्य, बौद्धाचार्या यांना प्रशिक्षिक विकास ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पाली भाषा आत्मसात करून पुढे तिचा प्रचार व प्रसार करा असे मार्गदर्शन केले.
सरतेशेवटी सदर शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी शिबीर व कार्यक्रमाची सांगता केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा