गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०२३
कॉम्रेड डांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गिरणी कामगार लढवय्या झाला होता - प्रा डॉ अशोक चौसाळकर
बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३
कांजूरमार्ग - भांडुप (पूर्व)सार्वजनिक गणेशोत्सव २०२३ : श्री गणेश दर्शन
| बाल मित्र मंडळ,वरची पाखाडी,कांजूरमार्ग वर्ष :४७ वे |
| शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, प्रेमनगर “राजा कांजूरचा... गणेश मानाचा” |
| सेंट अँथनी समाज सेवा संघ, शास्त्री नगर |
| बाल विकास मित्र मंडळ, शास्त्री नगर यंदा वर्ष:४६ वे साजरा करीत आहे. |
| सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,नेहरू नगर कांजूरचा गणराज , यंदा ५२ वे वर्ष |
| नेहरु नगर मित्र मंडळ,कांजूरमार्ग |
रविवार, १७ सप्टेंबर, २०२३
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिमतर्फे आरती संग्रह पुस्तकाचे प्रकाशन
सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३
मुंबईत आगरी सेना आक्रमक !! गावठाण कोळीवाड्यांच्या पुनर्विकासासाठी " गावठाण विकास प्राधिकरण " स्थापन करावे : जयेंद्र दादा खुणे ( मुंबई आगरी सेना प्रमुख )
रविवार, १० सप्टेंबर, २०२३
बळीराज सेनेच्या घाटकोपर विधानसभा उपाध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हा सहसंपर्क प्रमुख पदी सत्यवान रामचंद्र शिंदे यांची नियुक्ती
शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०२३
भांडुपच्या युवा प्रतिष्ठान व जीवनदान फाउंडेशनची अवयवदान समाज प्रबोधन दहीहंडी ; मुंबईकरांनी केले कौतुक
शिवसेना पुरस्कृत शिवबा मित्र मंडळ बोरिवली (प.)तर्फे भव्य दहिकला उत्सव -२०२३ थाटामाटात संपन्न ; उत्सवाबरोबर जपली सामाजिक बांधिलकी.. दहीहंडीला अनेक मान्यवरांची हजेरी
बुधवार, ६ सप्टेंबर, २०२३
आदर्श शिक्षक श्री.संदीप परब यांना "महापौर पुरस्कार" जाहीर
मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३
ईको फ्रेंडली गणेशा तयार करण्याचा आनंद वेगळाच
शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३
माध्यमांनी सामाजिक जाणिवा वाढविण्याचे कार्य करावे –उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर,दि.31 : जनसामान्यांच्या जडणघडणीत माध्यमांचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे सामान्यजनांपर्यंत योग्य आणि राष्ट्रीय विचार पोहोचणे आवश्यक असते. माध्यमे कोणतीही असो, माध्यमांनी समाजाच्या सामाजिक जाणिवा वाढविण्याचे कार्य करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेडच्या (दैनिक तरुण भारत) वाडी-हिंगणा मार्गावरील 'मधुकर भवन' या नव्या इमारतीचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॅा. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती. श्री. नरकेसरी प्रकाशन लिमिटेडचे अध्यक्ष डॅा. विलास डांगरे, कार्याध्यक्ष अनिल दांडेकर आणि प्रबंध संचालक धनंजय बापट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, समाजाच्या विचारांमध्ये सकारात्मकता आणण्याचे कार्य माध्यमांनी करणे अपेक्षित आहे. नकारात्मकता संपविणे हेच माध्यमांचे उद्दिष्ट असले पाहिजे. व्यवसायापेक्षा याठिकाणी विचारांना प्राधान्य मिळणे अपेक्षित असते.बदलत्या काळात तंत्रज्ञानामुळे माध्यमांमध्ये अनेक बदल आले आहेत. यामुळे माध्यमांच्या बाह्यरुपामध्ये बदल झपाट्याने होतो. तो व्हायला हवा. ज्यांनी हा बदल स्वीकारला नाही, ते काळाच्या मागे पडतील. मात्र, यामध्ये माध्यमांच्या मूळ वैचारिक गाभ्यात बदल होऊ नये. त्याला सकारात्मकतेची व राष्ट्रीयत्वाची जोड असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, दैनिके ही विचारांनी प्रेरित असण्याची गरज आहे. ध्येयवाद हा गरजेचा आहे. सर्वसमावेशकता वृत्तपत्राची ओळख व्हावी. वैचारिक ओळखीसोबत सर्वसमावेशकता असणारी माध्यमे वाचकांना प्रिय असतात. सर्वसामान्यांसाठी लेखणीचा वापर होण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी माध्यमांनी राष्ट्रनिर्मितीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. देशाला जागतिक सत्ता बनविण्यासाठी समाजाची बांधणी करण्याचे उद्दिष्ट ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.दै. ‘तरुण भारत’ने 98 व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त संपादकीय व व्यवस्थापन क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणा-या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात भैय्यासाहेब मुंडले, उदयभास्कर नायर, अनिल दांडेकर, विश्वास पाठक, लक्ष्मणराव जोशी, सुधीर पाठक यांचा सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दै. तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव यांनी केले. सूत्रसंचालन प्रगती किडे यांनी तर आभार डिजिटल आवृत्तीचे संपादक शैलेश पांडे यांनी मानले.
गोविंदा खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ३१ : दहीहंडी गोविंदा या खेळास साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. आता या दहीहंडी खेळातील गोविंदांना अन्य खेळांच्या खेळाडूंना लागू असलेल्या नियमानुसार शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
वरळी येथील एनएससीआय येथे देशातील पहिली प्रो गोविंदा लीग २०२३ या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, बाळा नांदगावकर, नितीन देसाई, अभिनेते अभिषेक बच्चन, पूर्वेश सरनाईक, दहीहंडी समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्य शासनाने 50 हजार गोविंदांना विमा कवच दिले होते. 50 हजार नोंदणी पूर्ण झाली आणि अनेक गोविंदांना नोंदणी करता आली नाही. त्यामुळे आणखी 25 हजार गोविंदांना विमा कवचाला तत्काळ मंजुरी दिली. आता ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण दिले आहे. दहीहंडी उत्सव स्व.आनंद दिघे यांनी ठाणे शहरात प्रथम मोठ्या उत्साहात साजरा करण्यास सुरुवात केली. थरांचे विक्रमही ठाण्यातील गोविंदांनी केले. प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आली आहे.
राज्यातील सर्व नागरिकांनी आता गणेशोत्सव, नवरात्री असे सन उत्साहात साजरा करावेत. पूर्वीचे सर्व निर्बंध आता काढून टाकले आहेत. राज्यातील परंपरा सण, उत्सव, एकता, बंधूभाव निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे असतात. प्रो कबड्डी सारखे प्रो गोविंदासाठी अभिनेते अभिषेक बच्चन यांनी काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणाले की, देशात पहिल्यांदा गोविंदाचा विमा उतरविण्यात आला आहे. इतर राज्यातील गोविंदा पथकांनी आपल्या राज्यात विमा घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनाही सहकार्य करण्यात आले आहे.यापुढे ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. क्रीडा मंत्री श्री. बनसोड म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांचे प्रो गोविंदा लीगचे स्वप्न होते ते आज साकार होत आहे. हा खेळ जागतिक पातळीवर घेवून जाण्यासाठी शासन प्रयत्न करील. राज्य शासनाने 2015 साहसी खेळाचा दर्जा प्रदान केला. पारंपरिक खेळांना जागतिकस्तरावर नेण्यासाठी आयपीएल, प्रो कबड्डी यासारख्या लोकप्रियता या स्पर्धेच्या निमित्ताने वाढणार आहे. या स्पर्धेसाठी एमआयडीसी आणि दहीहंडी समन्वय समितीचे सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेचे थीम 'घेवून टाक' ही आहे. तीन फेऱ्यांमध्ये स्पर्धा होणार आहे. प्रो गोविंदा स्पर्धेमध्ये एकूण १६ संघ सहभागी झाले आहेत. पहिले बक्षीस ११ लाख रुपये, दुसरे बक्षीस ७ लाख रुपये, तिसरे बक्षीस ५ लाख रुपये आणि चौथे बक्षीस ३ लाख रुपये ठेवण्यात आले आहे. याचबरोबर महिला संघ आणि अंध गोविंदा पथकांनाही सहभागाबद्दल एक लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३
गणेश हिरवे यांना आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर
रविवार, २७ ऑगस्ट, २०२३
महाराष्ट्र लॉटरी विक्रेता संघटनेचा दणका परराज्यातील बोगस पेपर लॉटरीवर राज्यात कडक कारवाई : उपमुख्यमंत्री पवार
३० ऑगस्ट रोजी त्रिवेणी काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा
बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी पत्रलेखन महत्त्वाचे - ना. मंगलप्रभात लोढा
पवईतील श्री सुवर्णनाग मंदिरात भक्तांची मांदियाळी
सार्वजनिक उत्सव समिती, साई हिल आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३
सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ व डिजिटल मीडिया परिषद आयोजित 'डिजिटल मीडिया' कार्यशाळेचा समारोप
रविवार, २० ऑगस्ट, २०२३
डॉ गजानन शेपाळ यांच्या 'रंगासभा' ग्रंथाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन ; ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात सुरु करण्यासाठी केंद्र व राज्याकडे पाठपुरावा करण्याचे राज्यपालांचे आश्वासन
बुधवार, १६ ऑगस्ट, २०२३
दुनियेचा पोशिंदा लघुचित्रपटाने मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा ; झुंजार प्रोडक्शन एक पाउल पुढे
ईबीडी बुद्धिबळ स्पर्धेत धनश्री बुद्धिबळ अकादमीच्या स्मित, शुभम आणि विवानचे निर्भेळ यश
मुंबई: (प्रेम पंडित )- धोरणात्मक कौशल्य आणि तरुण बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत ईबीडी बुद्धिबळ स्पर्धा (EBD Chess Tournamen...
-
प्रतिनिधी : पेण तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाट परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून सामाजिक कार्यकर्ते अमर बळीराम म्ह...
-
दापोली : (विशाल मोरे ) तालुक्यातील ग्रामपंचायत दमामे- तामोंड या गावातील सुतारवाडी, बुद्धवाडी गुरववाडी, मधलीवाडी, वडाचीवाडी, हनुमान वाडी येथ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
.jpg)
.jpg)
.jpg)