आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३

सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ व डिजिटल मीडिया परिषद आयोजित 'डिजिटल मीडिया' कार्यशाळेचा समारोप

सांगली: आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहता आले पाहिजे. नवनवीन ज्ञान आत्मसात करता आले पाहिजे. विद्यार्थी असताना तुम्ही तुमचे स्टेटस, तुमचे पद हे बाहेर ठेवून शिकता आले पाहिजे. जगात अशा अनेक गोष्टी आहेत जे अजून आपल्याला माहिती नाहीत. त्याचे जर ज्ञान मिळत असेल तर ते जरूर घेता आले पाहिजे. पत्रकारितेत अशा अनेक नवनवीन गोष्टी येत आहेत. 
जेष्ठ पत्रकार चंद्रकांत क्षीरसागर यांचे
हस्ते प्रमाणपत्र स्वीकारताना
      सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ व डिजिटल मीडिया परिषदेच्यावतीने सांगलीत 'डिजिटल मीडिया' कार्यशाळेचे आयोजन केले होते. शिवाजी विद्यापीठाने यासाठी पुढाकार घेतला होता.या कार्यशाळेला सर्व वयोगटातील पत्रकार व विद्यार्थी सहभागी झाले होते. मला या कार्यशाळेत विद्यार्थी म्हणून सहभागी होता आले. डिजिटल मीडिया हा एक नवीन प्लॅटफॉर्म उभा राहत आहे. पत्रकाराने नवीन गोष्टी आत्मसात न केल्यास ते बाजूला पडण्याची शक्यता आहे. पत्रकारांचे काम ज्यावेळी संगणकावर सुरू झाले, त्यावेळी संगणक न येणारे अनेक दिग्गज पत्रकार बाजूला पडले. याचे भान असणे गरजेचे आहे. त्यामुळे नवीन गोष्टींचा तातडीने स्वीकार केला पाहिजे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ईबीडी बुद्धिबळ स्पर्धेत धनश्री बुद्धिबळ अकादमीच्या स्मित, शुभम आणि विवानचे निर्भेळ यश

मुंबई: (प्रेम पंडित )- धोरणात्मक कौशल्य आणि तरुण बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत ईबीडी बुद्धिबळ स्पर्धा (EBD Chess Tournamen...