आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०२३

भांडुपच्या युवा प्रतिष्ठान व जीवनदान फाउंडेशनची अवयवदान समाज प्रबोधन दहीहंडी ; मुंबईकरांनी केले कौतुक

मुंबई: मुंबईत गोकुळाष्टमी निमित्त होणाऱ्या दहीहंडी उत्सवात अवघी तरुणाई रस्त्यावर उतरलेली असते .प्रदेशातून अनेक परदेशी पाहुणे हा उत्सव पाहण्यासाठी मुंबईत येतात.
           मुंबईतील दहीहंडी उत्सवात भांडुपच्या "युवा प्रतिष्ठान " व "जीवनदान फाउंडेशन " च्या गोविंदा पथकाने संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले. उत्सवाला समाज प्रबोधनाची संधी मानून अध्यक्ष रिध्देश रमेश खानविलकर व युवा प्रतिष्ठान गोविंदा पथकाने अवयव दानाचे महत्त्व मुंबईकरांना समजवण्याकरिता व समाजात असलेले समज - गैरसमज , अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अवयव दानाची माहिती संपूर्ण मुंबईभर पोहचविण्याचा संकल्प करून विविध संदेश फलक ,घोषवाक्य, वैद्यकीय माहिती गोविंदा पथकाच्या वाहनांवर व बँनियन लावून जनजागृती केली.
         युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रिद्धेश खानविलकर याबाबत म्हणाले की आमच्या गोविंदा पथकात 250 पेक्षा अधिक तरुण असून सर्वच तरुण पदवीधर ,व्दिपदवीधर, इंजिनियर, व आय.टी. क्षेत्रातील आहेत. सन 2003 हे वर्ष "युवा प्रतिष्ठान" व "जिवदान फाउंडेशन" "अवयव दान जागृती वर्ष" म्हणून साजरे करत आहे . दहीहंडीत अवघी तरुणाई व मुंबईकर रस्त्यावर उतरलेले असतात. हा उत्सव एक जनजागृतीसाठी चांगली संधी असते. ही संधी साधून आम्ही जनजागृती करत आहोत. आमच्या गोविंदा पथकाने "पोपटी" रंगाच्या ड्रेसचा वापर केला कारण "पोपटी" रंग हा जागतिक अवयव दानाचे प्रतिनिधित्व करणारा रंग आहे.
                जीवनदान फाउंडेशनच्या अध्यक्षा अँड. राजोल संजय पाटील म्हणाल्या की ,रस्त्यावर काहींचे अपघात होतात, कोणीतरी अकस्मात मृत्यू पावतो. त्यांचे अवयव एखाद्या गरजूला मिळाले तर मृत्यूशय्येवरील जीवन आम्ही वाचवू शकतो. त्यांचे संपूर्ण कुटुंब वाचवू शकतो. त्यामुळे आम्ही हा संकल्प केला आहे. संपूर्ण मुंबईत आम्ही यानिमित्त समाज प्रबोधन करत आहोत.
         युवा प्रतिष्ठान व जीवनदान फाउंडेशनच्या या गोविंदा पथकाने मुंबईतील अनेक मोठ्या व मानाच्या दहीहंडीत हजेरी लावून प्रथम पारितोषिके पटकावून पैसे व बक्षिसे म्हणून मिळालेलेही समाजासाठी वापरण्यात येणार आहे . त्यामुळे या तरुणांच्या गोविंदा पथकाचे मुंबईभर कौतुक होत आहे. ही तरुणाई उद्याची मुंबई घडविल अशी भावना मुंबईकर करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ईबीडी बुद्धिबळ स्पर्धेत धनश्री बुद्धिबळ अकादमीच्या स्मित, शुभम आणि विवानचे निर्भेळ यश

मुंबई: (प्रेम पंडित )- धोरणात्मक कौशल्य आणि तरुण बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत ईबीडी बुद्धिबळ स्पर्धा (EBD Chess Tournamen...