आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ९ सप्टेंबर, २०२३

पायी माताजी की झोळी साडेतीन शक्तिपीठ पायी प्रवास तुळजापूर येथे होणार पदार्पण - नाशिकच्या गोसावी दांपत्याचा सेवानिवृत्ती नंतर संपुर्ण पायी प्रवास

नाशिक : नाशिक पाथर्डी फाटा येथील रहिवासी श्री.दिनकर गणपत गोसावी व सौ.चित्रा दिनकर गोसावी हे दांपत्य साडेतीन शक्तिपीठ पायी चालत पदयात्रा करून पूर्ण करत आहे. अध्यात्मिक तेची असणारी ओढ व आपले जीवन सर्वस्वी भगवंताच्या चरणी अर्पण करण्याचा मानस गोसावी दांपत्य यांनी केला आहे.पाच नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण केल्यानंतर परिक्रमा वासी करिता व स्थानिक आदिवासी लोकांकरिता पिण्याच्या पाण्याची व निवासाची सोय व्हावी या उद्देशाने नर्मदा परिक्रमा मार्गात शुलपाणी जंगलात विहीर चे काम पुर्ण केले असून आश्रमाचे काम जंगलात सुरू आहे.
श्री.दिनकर गणपत गोसावी वय वर्षे ६२ तर पत्नी सौ.चित्रा दिनकर गोसावी वय वर्षे ५५ या वयात पाच ठिकाणी केलेल्या नर्मदा पुरणातून मिळालेला गुरुआदेश वरून ही साडेतीन शक्तिपीठ पायी प्रवास पदयात्रा करण्याचा मानस पूर्ण करत आहे. यांच्या सोबत सौ. कल्पना गोसावी यादेखील पायी चालत आहे.
   श्री.दिनकर गोसावी हे मराठा विद्या प्रसारक समाज,नाशिक या शिक्षण संस्थेत ४१ वर्षे ग्रंथालय परिचर या पदावर नोकरी पूर्ण करून वयाच्या ६० व्या वर्षी संन २०२२ ला सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त नंतर आपण आपली अध्यात्मिक व सामाजिक कार्यात आपली वाटचाल करावी व नर्मदा माई चरणी विलीन व्हावे या उद्देशाने आपले सेवानिवृत्ती चे येणारे पैसे,पी.एफ हे नर्मदा परिक्रमा आश्रम बांधकाम करण्यासाठी लावले असून,तेथील स्थानिक आदिवासी लोकांच्या हाती आश्रम सुपूर्द केला आहे.
    शुक्रवार दि.०४ ऑगस्ट २०२३ रोजी नाशिक रामकुंड येथून गोदावरी जल व नर्मदा जल संकल्प पूजा विधी करून सोबत घेऊन आज साडेतीन शक्तिपीठ हे गोसावी दांपत्य पदयात्रा पायी करत आहे. नर्मदा परिक्रमा ज्या प्रमाणे केली जाते. तशाच प्रकारे आपल्या सर्वांचे कुलदैवत कुलस्वामिनी असते.आपल्या कुळाचे रक्षण आपली कुलस्वामिनी करीत असते.आपल्या परिवारावर येणारी संकटे व येणारी आपत्ती चे संरक्षण व्हावे व नर्मदा पुराणातून मिळालेला गुरु आदेश वरून आपण आपल्या कुलस्वामिनी ची पदयात्रा करावी.तसेच,या अगोदर कोणीही सुरू न केलेली साडेतीन शक्तिपीठ पदयात्रा आपण सुरू करावी या अनुषंगाने गोसावी दांपत्य आज साडेतीन शक्तिपीठ पायी चालून पदयात्रा करत कोल्हापूर नंतर आज तुळजापूर येथे आगमन करीत आहेत.
नाशिक रामकुंड - कोल्हापूर - तुळजापूर - माहूर - वणी - नाशिक रामकुंड असा पूर्ण साडेतीन शक्तिपीठ पदयात्रेचा मार्ग आहे.साडेतीन शक्तिपीठ पदयात्रेत गरजू शाळा व मुला मुलींना मोफत वह्या पुस्तके वाटप करत हि पदयात्रा पूर्ण होत आहेत.साडेतीन शक्तिपीठ पदयात्रा सोबत सामाजिक जनजागृती देखील गोसावी दांपत्य करीत आहे. विशेषत गोसावी दांपत्य पती पत्नी हे दोघेच ही पायी प्रवास करत आहेत.यासोबत वाटेत असणारे प्राचीन मंदिरे व गावो गावी जाऊन यांचा इतिहास प्रकाश झोतात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.गोसावी दांपत्य साडेतीन शक्तिपीठ पदयात्रा हे यू ट्यूब चैनेल असून यावर रोजचा प्रवास माहितीचे विश्लेषण याद्वारे करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ईबीडी बुद्धिबळ स्पर्धेत धनश्री बुद्धिबळ अकादमीच्या स्मित, शुभम आणि विवानचे निर्भेळ यश

मुंबई: (प्रेम पंडित )- धोरणात्मक कौशल्य आणि तरुण बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत ईबीडी बुद्धिबळ स्पर्धा (EBD Chess Tournamen...