नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख)जोगेश्वरी पूर्व (मुंबई) येथील सामाजिक कार्यकर्ते, आदर्श शिक्षक व वृत्तपत्र लेखक, पत्रकार गणेश हिरवे म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले समाजसेवक. हिरवे सर आणि माझा परिचय होऊन आज दहा वर्ष उलटून गेली असतील. मी नेरुळ उपनगरात राहातो तर सर मुंबईत (जोगेश्वरीत). त्यामुळे प्रत्यक्ष भेट तशी खूप कमी होते. मुंबईत जर वृत्तपत्र लेखकांचा मेळावा किंवा पारितोषिक समारंभ असेल तरच भेट होते, मात्र म्हणतात ना खऱ्या मित्राशी रोजच भेट व्हावी असे काही नाही, त्यांच्याशी रोजच बोलावे असेही नाही. दोन व्यक्तींचे स्वभाव आवडीनिवडी जुळल्या की मैत्रीचे रोपटे आपोआप बहरते. आमचेही तसेच काहीसे झाले आहे. आम्ही जरी नेहमी भेटत नसलो तरी आमची मैत्री टिकून आहे याला कारणीभूत आहे सरांचा स्वभाव. मी वृत्तपत्र लेखक आणि सरही वृत्तपत्र लेखक. लेखनाच्या माध्यमातून आमची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. जसजशी मैत्री वाढत गेली तसतसा सरांबद्दल माझ्या मनात असलेला आदर अधिक वृद्धिंगत होत गेला. हिरवे सर गेली पंचवीस वर्ष जोगेश्वरी आणि मुंबईत विविध स्तरावर समाज हिताच्या दृष्टीने विविध उपक्रमांद्वारे सातत्यपूर्ण कार्यरत आहेत. लॉक डाऊन काळात त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन समाजातील गोरगरीब, वंचित, आदिवासी विद्यार्थी, अनाथालय, वृद्धाश्रम, रोजंदारीवर काम करणारे मजूर, घनकचरा व्यवस्थापन कामगार अशा हजारो कुटुंबांना किराणा किट, आरोग्य किट, शैक्षणिक साहित्य आदि आवश्यक आणि गरजेच्या वस्तू वैयक्तिक तसेच आपल्या जॉय ऑफ गिविंग या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊन त्यांच्या जीवनात हातभार लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. आजही अनलॉक सुरू झाला तरी त्यांचे कार्य थांबलेले नाही. गणेश हिरवे यांनी आतापर्यंत एकूण ३५ वेळा रक्तदान आणि १७ वेळा प्लेटलेट्स डोनेट करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. त्यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातूनही अनेक सामाजिक कामे केलेली आहेत. कोरोना काळात त्यांनी स्वतः पाच वेळा रक्तदान केले आहे. सरांना वाचनाचे प्रचंड वेड आहे. तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी. समाजात वाचन संस्कृती रुजावी यासाठी त्यांनी स्वखर्चाने आतापर्यंत तेरा हजारांहून अधिक पुस्तके नागरिकांना व ग्रंथालयांना भेट म्हणून दिली आहेत. हिरवे सर माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणूनही परिचित आहे. माहिती अधिकाराचा वापर करून त्यांनी अनेक नागरी समस्या सरकार दरबारी सोडवून घेतल्या आहेत. एक गुणी व मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून गणेश हिरवे यांची महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली आहे यात नवल नाही. सरांच्या सामाजिक कार्याची दखल राज्यातील अनेक संस्थांनी घेतली असून आजवर त्यांना १२३ पुरस्कार व ७७ करोना योद्धा सन्मानपत्र प्राप्त झाली आहेत. सामाजिक कार्य करतानाच ते आपलं कुटुंब आणि आपल्या मूळच्या शिक्षकी पेशाकडे मात्र ते जराही दुर्लक्ष होऊ देत नाहीत. एक आदर्श, विद्यार्थिप्रिय, उपक्रमशील शिक्षक म्हणून ते जोगेश्वरीमध्ये व मुंबईत नावाजलेले आहेत. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारनेही सन्मानित करण्यात आले आहे. एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या या माझ्या मित्राला आरोग्यदायी निरोगी असे दीर्घ आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
ईबीडी बुद्धिबळ स्पर्धेत धनश्री बुद्धिबळ अकादमीच्या स्मित, शुभम आणि विवानचे निर्भेळ यश
मुंबई: (प्रेम पंडित )- धोरणात्मक कौशल्य आणि तरुण बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत ईबीडी बुद्धिबळ स्पर्धा (EBD Chess Tournamen...
-
प्रतिनिधी : पेण तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाट परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून सामाजिक कार्यकर्ते अमर बळीराम म्ह...
-
दापोली : (विशाल मोरे ) तालुक्यातील ग्रामपंचायत दमामे- तामोंड या गावातील सुतारवाडी, बुद्धवाडी गुरववाडी, मधलीवाडी, वडाचीवाडी, हनुमान वाडी येथ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा