आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३

पवईतील श्री सुवर्णनाग मंदिरात भक्तांची मांदियाळी

पवई: गेल्या महिन्याभरापासून अधिक मास सोमवार आणि श्रावण सुरू झाला झाल्यावर पवईतील श्री सुवर्णनाग मंदिरात भक्तांची मांदयाळी सुरू आहे. सोमवारी नागपंचमी निमित्ताने महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.  पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त युवा सेनेच्या कार्यकारणी सदस्या राजोल संजय पाटील कुटुंबातील सदस्यांनी श्री सुवर्णनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
      श्री सुवर्णनाग मंदिरात नागदेवतेला दूध अर्पण करताना भक्तगणांना वेगळाच आनंद होतो.व मनातल्या भावना व्यक्त केल्यानंतर समाधान होते.
        श्री सुवर्णनाग मंदिरात भक्तगण मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने यावेळी योग्यती काळजी घेतली होती. इतकेच नाही तर सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.सोमवारी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करणारे व नवसाला पावणारे असे हे श्री सुवर्णनाग मंदिर होय. प्रत्येक भक्त हा श्री सुवर्णनाग मंदिरात दर्शन घ्यायला प्रतिवर्षी येत असतो. भगवान शंकराचा जयघोष करत रविवारी रात्रीपासून भाविकांची गर्दी ही वाढत होती.
     श्रावणी सोमवार निमित्त लाखो भाविक दर्शनासाठी मंदिर परिसरात दाखल झाले होते.सोमवार उपवास असल्याने भक्तांना पाणी व फराळाची आयोजकांच्या वतीने उत्तम व्यवस्था ठेवण्यात आली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ईबीडी बुद्धिबळ स्पर्धेत धनश्री बुद्धिबळ अकादमीच्या स्मित, शुभम आणि विवानचे निर्भेळ यश

मुंबई: (प्रेम पंडित )- धोरणात्मक कौशल्य आणि तरुण बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत ईबीडी बुद्धिबळ स्पर्धा (EBD Chess Tournamen...