मुंबई ( प्रतिनिधी )शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)आमदार-विभागप्रमुख रमेश कोरगावकर यांच्या संकल्पनेतून व आमदार विकास निधीतून श्री भांडुप गुजराथी सेवा मंडळ, यांच्या सहकार्याने भांडुप स्मशानभुमी,सोनापूर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या एक्रेलिक डोम (ओपन शेड) लोकार्पण सोहळा शिवसेना नेते,खासदार अरविंद सावंत यांच्या शुभ हस्ते पार पडला.यावेळी श्री भांडुप गुजराथी सेवा मंडळाचे अध्यक्ष बच्चूभाई गाला हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ उद्योजक मॅरेथॉन ग्रुपचे चेतनभाई शहा होते. भांडुप स्मशानभूमीत ऍक्रेलिक डोम ओपन शेडच्या लोकार्पण सोहळ्याचे श्रीफळ वाढून उद्घाटन बच्चुभाई गाला यांनी केले. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष भास्कर दाजी विचारे, व यावेळी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते कोरोना काळात ज्या स्मशानातील कर्मचाऱ्यांनी 650 हून अधिक मृत पार्थिवावर ज्यांनी आपला जीव मुठीत घेऊन आलेल्या प्रत्येक पार्थिवावर अंत्यसंस्कार केले ते नरेश आणि सुरेश या दोन बंधूंचा देखील सत्कार करण्यात आला. खासदार अरविंद सावंत यांनी आमदार रमेश कोरगावकर यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे मुक्तकंठाने स्तुती केली. यावेळी, उद्योजक चेतनभाई शहा व बच्चूभाई गाला यांनी देखील मार्गदर्शनपर आपले विचार मांडले
यावेळी ,भांडुप विधानसभा मतदारसंघातील नगरसेविका दीपमाला बढे ,उमेश माने, सुनंदा वाफारे ,सर्व उपविभाग प्रमुख ,युवा सेनेच्या कार्यकारणी सदस्या राजोल संजय पाटील, प्रभाग क्रं ११० मधील ( उबाठा )सेनेचे सर्व पदाधिकारी,श्री भांडुप गुजराथी सेवा मंडळ,भांडुप स्मशानभुमी,सोनापूर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सदर लोकार्पण सोहळ्यास शाखाप्रमुख,युवासेना-शिवसेना पदाधिकारी,महिला आघाडी,शिवसैनिक व युवासैनिक,पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा