मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी संविधान दिवस साजरा केला. सकाळी ८ वाजता विद्यार्थ्यांनी संविधान प्रत हातात घेत , तिरंगी झेंडा फडकावत परिसरातून संविधान रॅली काढली. शाळेचे सचिव राजेश सुभेदार , संचालिका ज्योती सुभेदार यांच्या संकल्पनेतून संविधान रॅली आयोजित करण्यात आली. इयत्ता चौथी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी या रॅलीत सहभाग घेतला. यावेळी भारत माता की जय , वंदे मातरम् अश्या घोषणा देण्यात आल्या. विद्यार्थांनी यावेळी रॅलीत बाबासाहेबांचे योगदान , भारताचे संविधान , नको राजेशाही , नको ठोकशाही संविधानाने दिली मजबूत लोकशाही अशी घोषवाक्य या रॅली द्वारे देण्यात आली. यावेळी २६/११ हल्यातील पोलीस अधिकारी, कुटुंबातील व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहण्यात आली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
स्वागत दिवाळी अंकाचे
स्वागत दिवाळी अंकाचे छायांकित दिवाळी अंक २०२५ (पोस्टमन) मराठी साहित्य क्षेत्रात प्रथमच "पोस्टमन" या विशेष व्यक्तिमत्त्...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा