नवी मुंबई(वैभव पाटील) मुंबईच्या देव फाउंडेशन यांच्या वतीने नवी मुंबईतील अडवली भूतावली येथील महागरपालिकेच्या शाळा क्रमांक ४१ येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. १६ नोव्हेंबर २०२४ रोजी शाळेच्या प्रांगणात आयोजित एका विशेष कार्यक्रमात शाळेतील गोरगरीब आदिवासी, गरजू विद्यार्थ्यांसाठी एक संगणक व प्रिंटर, ३०० वह्या, चार रेघी २०० वह्या, दात घासण्यासाठी टूथपेस्ट, प्राथमिक व माध्यमिक च्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ३०० कंपास बॉक्स, शाळेत शिक्षकांसाठी अध्यापनास उपयुक्त खडू बॉक्स, नकाशे, पृथ्वीगोल, भूमिती पेट्या असे अनेक प्रकारचे शैक्षणिक साहित्याचे वाटप देव फाउंडेशनच्या सदस्यांनी केले. फाउंडेशनच्या वतीने क्रिशानी नितान छाटवाल व आर्यमन नितान छाटवाल यांच्या सौजन्याने ह्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी देव फाउंडेशनचे अनेक सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक श्री भिकाजी सावंत तसेच शाळेतील सहशिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
देव फाउंडेशनच्या वतीने सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असून त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ समाजातील गरीब, गरजू लोकांना होत आहे. विद्यार्थ्यांसाठी देव फाउंडेशन करत असलेले कार्य कौतुकास्पद असून समाजातील वंचित घटकांना अशा प्रकारची मदत नक्कीच उपयुक्त ठरेल असे मत भिकाजी सावंत यांनी व्यक्त केले. देव फाउंडेशनमार्फत सदर उपक्रम अडवली भूतावली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या आदिवासी भागातील शाळेत राबवण्यासाठी जॉय ऑफ गिव्हिंगचे अध्यक्ष गणेश हिरवे तसेच नवी मुंबई समन्वयक वैभव मोहन पाटील यांचे महत्वाचे योगदान लाभले असल्याचे सावंत सरांनी स्पष्ट करून ह्या स्तुत्य उपक्रमास सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा