आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०२४

प्रभा सोलंकी यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे )मारवाडी विद्यालय हायस्कूल येथील सेवा निवृत्त शिक्षिका प्रभा सोलंकी यांना नुकताच जॉय संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार घोषित करण्यात आला असून येत्या फेब्रुवारी महिन्यात जॉय वर्धापन दिनी तो त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचे संस्थापक गणेश हिरवे यांनी कळविले आहे.सोलंकी या १९८२ साली शाळेत इंग्लिश इतिहास या विषयाच्या शिक्षिका म्हणून कामाला लागल्या.३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्या २०२० मध्ये सेवा निवृत्त झाल्या.त्यांच्या हाताखालुन शिकलेले विद्यार्थी अज विविध ठिकाणी चांगल्या पदावर कार्यरत आहेत.
       एक कर्तव्यदक्ष,विद्यार्थीप्रिय आणि उपक्रमशील शिक्षिका म्हणून प्रभा सोलंकी यांना लोक ओळखतात.सामाजिक कार्यात देखील त्या नेहमीच पुढाकार घेऊन अनेकजणांना सहकार्य करीत असतात.त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन केलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

स्वागत दिवाळी अंकाचे

स्वागत दिवाळी अंकाचे छायांकित दिवाळी अंक २०२५ (पोस्टमन) मराठी साहित्य क्षेत्रात प्रथमच "पोस्टमन" या विशेष व्यक्तिमत्त्...