प्रतिनिधी (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख: यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्रा तर्फे प्रतिवर्षी नवी मुंबई कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था / व्यक्ती यांना कृतज्ञता पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षीही सदर पुरस्कार जानेवारी २०२५ मध्ये समारंभपूर्वक प्रदान करण्याचे संस्थेने ठरविले असून त्यासाठी मान्यवर संस्था / व्यक्ती यांनी प्रवेशिका पाठवाव्यात असे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी केल्याचे सचिव डॉक्टर अशोक पाटील यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
संस्थेने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, अर्जदार संस्था / व्यक्ती नवी मुंबई कार्यक्षेत्रात असणे आवश्यक असून त्यांची आपल्या क्षेत्रात भरीव कामगिरी असणे आवश्यक आहे, प्रामुख्याने विज्ञान, पर्यावरण, क्रीडा, चित्रकला, नाट्यसंगीत, साहित्य, सामाजिक सेवा, रुग्णसेवा, अंध व दुर्बल घटकांना सहाय्य, पत्रकारिता, प्रशासन व व्यवस्थापन, शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, महिला सबलीकरण इत्यादी नमूद कोणत्याही एका कार्यक्षेत्रात वा तत्सम अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असणे आवश्यक असून अर्ज करतेवेळी त्यास पुष्टी देणारी कागदपत्रे, वर्तमानपत्रातील बातम्या इत्यादी बाबी जोडणे आवश्यक आहे.
पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या संस्था / व्यक्ती यांनी आपली इत्यंभूत माहिती व अर्ज अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई यांचे नावे आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक यासह सर्व माहिती असलेला व आपल्या कार्याविषयी तपशील देणारा अर्ज अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई यांच्या नावे ycp.navimumbai123@gmail.com अथवा pramodkarnad@gmail.com या ई- मेल द्वारे १० डिसेंबर २०२४ पर्यंत पाठविण्याची व्यवस्था करावी. यापूर्वी ज्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यांनी पुन:श्च अर्ज करू नये. अधिक संपर्कासाठी मोबाईल नंबर : प्रमोद कर्नाड: ९८६७६७३३९९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा