पनवेल( प्रतिनिधी): युवाशक्ती स्वयंसेवी संस्था, नवी मुंबई च्या वतीने दरवर्षी सामाजिक भान जपणारा दिवाळी उपक्रम राबवला जातो. दिवाळी सण म्हणजे आंनदाचा, प्रकाशाचा सण मानला जातो. परंतु आपण जल्लोषात हा सण साजरा करीत असताना कितीतरी समाजातील असे घटक आहेत की ज्यांना हा आनंद उपभोगता येत नाही अशा आपल्या बांधवांबरोबर दिवाळी साजरी करता यावी या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम प्रदीप कासुर्डे सर यांच्या वतीने राबवला जातो. यावर्षी या उपक्रमासाठी भांडुप मधील विद्यार्थी प्रतिष्ठान या संस्थेचा सुद्धा हातभार लागला होता. रविवार दि.१९ ऑक्टोबर रोजी सकाळी शांतीवन येथे पोहोचल्यावर शांतीवन मधील सर्व परिसराची माहिती घेण्यात आली. यानंतर आणलेला सर्व फराळ एकत्र करून हा फराळ कुष्ठरोग हॉस्पिटल, ओपीडी हॉस्पिटल,शांतीवन मध्ये राहणारे कुष्ठरोगी बांधव, तसेच कार्यकर्ते यांना वाटप करण्यात आला. तसेच येथील महिलांना साड्या वाटप देखील करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश फक्त काहीतरी वाटप करणे हा नसून दिवाळीनिमित्त या बांधवांशी संवाद साधने हा असतो. त्यामुळे नुसताच फराळ वाटप न करता आम्ही त्यांच्याशी बोलतो, त्यांच्याशी संवाद साधतो, त्यांची रोजची दिनचर्या कशी असते, त्यांना येथे कोणकोणत्या सुविधा मिळतात इत्यादी बाबत आम्ही त्यांच्याशी संवाद साधतो. यानंतर अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे आश्रम शाळा ,वाकडी या ठिकाणी काही शैक्षणिक साहित्याचे वाटप देखील करण्यात आले अशी माहिती युवाशक्ती सोन्याचे संस्थेचे अध्यक्ष, उपक्रमशील शिक्षक प्रदीप कासुर्डे सर यांनी दिली. या कार्यक्रमासाठी डॉ. सुरेश पाटील सर, वृषाली पाटील मॅडम, किशोर पांचाळ, विश्वनाथ पांचाळ साहेब, कोळी सर वइतर कार्यकर्ते उपस्थित होते या उपक्रमातील फराळ व शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे त्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
युवाशक्ती स्वयंसेवी संस्था नवी मुंबई व विद्यार्थी प्रतिष्ठान भांडुप वतीने शांतीवन पनवेल येथे केली दिवाळी साजरी
पनवेल( प्रतिनिधी): युवाशक्ती स्वयंसेवी संस्था, नवी मुंबई च्या वतीने दरवर्षी सामाजिक भान जपणारा दिवाळी उपक्रम राबवला जातो. दिवा...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा