आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०२४

सेंट टेरेसा शाळेत संविधान दिन उत्साहात

मुंबई(गणेश हिरवे )सेंट टेरेसा बॉईज शाळा वांद्रे येथे २६ नोव्हेंबर संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सर्वप्रथम संविधान गीत शांत चित्ताने सर्वांनी ऐकेले.त्यानंतर शाळेतील शिक्षक शैलेश पांडे यांनी संविधाना बद्दल माहिती दिली आणि मुंबईवर झालेला २६/११ अतिरेकी हल्ला यातील शहिद आणि बहादुर पोलीस ऑफिसर यांच्या स्मृतीना उजाळा दिला.तसेच मुलांना संविधान शपथ देखील यानिमित्ताने देण्यात आली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक फादर निकी यांना संविधान फ्रेम आणि संविधान पुस्तक शाळेतील शिक्षक अनुक्रमे फिलिप रॉड्रिग्ज आणि गणेश हिरवे यांनी प्रदान केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

स्वागत दिवाळी अंकाचे

स्वागत दिवाळी अंकाचे छायांकित दिवाळी अंक २०२५ (पोस्टमन) मराठी साहित्य क्षेत्रात प्रथमच "पोस्टमन" या विशेष व्यक्तिमत्त्...