मुंबई(गणेश हिरवे) बोरिवली पूर्व येथील अभिनव शिक्षण मंदिर येथील शिक्षिका तेजस्वी निवाते यांना नुकताच जॉय ऑफ गिविंग संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आला असून येत्या फेब्रुवारी महिन्यात जॉय वर्धापन दिन कार्यक्रमात त्यांना उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते तो प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे यांनी दिली.शिक्षिका तेजस्वी २०१० पासून या क्षेत्रात कार्यरत असून कर्तव्यदक्ष आणि उपक्रमशील म्हणून ओळखल्या जातात. प्रत्येक पाठामध्ये नाविन्यता कशी आणता येईल आणि डिजिटल युगाशी कसा कसा संबंध लावता येईल या साठी त्या प्रयत्नशील असतात. तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून तो टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम केले आहेत.अनेकदा विद्यार्थ्याना विविध ठिकाणी घेऊन जाऊन प्रत्यक्ष अनुभव देतात.अशा मुलांशी एकरूप होऊन कार्य करणाऱ्या तेजस्वी यांचा अभिमान असल्याचे हिरवे सांगतात.पुरस्कार जाहीर झाल्याने शाळेतील शिक्षक शिक्षकेतर, संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी, पालक यांनी निवाते टीचर यांचे अभिनंदन केले असून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
तेजस्वी निवाते यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार
मुंबई(गणेश हिरवे) बोरिवली पूर्व येथील अभिनव शिक्षण मंदिर येथील शिक्षिका तेजस्वी निवाते यांना नुकताच जॉय ऑफ गिविंग संस्थेच्या वतीने आदर्श शिक...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा