मुंबई(गणेश हिरवे )सेंट टेरेसा शाळा वांद्रे मुंबई येथील प्राथमिकच्या इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्यानी नुकतेच वेस्ट म्हणजेच टाकावू वस्तूंपासून टिकवू वस्तू तयार करण्याचा उपक्रम साजरा केला.चौथीच्या वर्गशिक्षिका सिंथिया डिमेलो, मीनल कुटीन्हो, डीपसीना डिसोजा, रींकल गोंसलविस यांनी मुलांना या वस्तू तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले.यावेळी फ्लॉवर पॉट, कंदील, पेनदाणी, फुलदाणी, ग्रीटिंग कार्ड, टेबल पीस, डेकोरेटिव ट्रे, लॅम्प, बास्केट, लाईट अप बॉटल आदी वस्तू तयार झाल्या.विद्यार्थ्याना पर्यावरणाचं महत्व समजावे तसेच पुनर्वापर करून आपण त्यापासून पुन्हा काहीतरी छान बनवू शकतो हा या उपक्रमाचा उद्देश होता.टाकून दिलेले पुठ्ठे, टिनचे डब्बे, प्लॅस्टिक बॉटल, वर्तमानपत्र यांचा पुनर्वापर करण्यात आला.या शाळेत कायमच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना, कौशल्ये विकसित होण्यासाठी,त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी शाळेचे प्रिन्सिपॉल फादर निकी यांच्या प्रयत्नाने नेहमीच शिक्षक अनेक चांगले उपक्रम राबवित असतात.स्वतः विद्यार्थी देखील या वस्तू बनविताना खूप आनंदित आणि उत्साहित होते.आकर्षक वस्तू तयार केलेल्या विद्यार्थ्याचा यानिमित्ताने गौरव करण्यात आला.आपल्या मुलांनी बनविलेल्या वस्तू पाहताना पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
२६/११ च्या दहशतवादी भ्याड हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली !
मुलुंड( सतिश वि.पाटील)२६/११ च्या भ्याड हल्ल्यात देशवासियांचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाने लढलेल्या मुंबई पोलीसांचे तसेच देशाच्या ...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा