मुंबई (पी.डी.पाटील): मेघवाडी, डॉ. एस्. एस्. राव रोड, लालबाग, मुंबई येथील श्री म्हसोबा मंदिर समिती व मेघवाडीतील रहिवाश्यांच्या वतीने गुरुवार दि. २२ जानेवारी ते सोमवार दि. २६ जानेवारी २०२६ या कालावधीत "श्री म्हसोबा देवस्थान उत्सव" मोठया उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात येणार आहे.
त्यानुसार गुरुवार दि. २२ जानेवारी रोजी संध्याकाळी ६.०० वा. डिजिटल जाहिरात फलक उद्घाटन, शुक्रवार दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वा.: होमहवन,सायंकाळी ६.०० ते १०.०० वा. श्री म्हसोबा पालखी सोहळा, शनिवार दि. २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६.०० ते ९.०० वा.: हळदीकुंकु समारंभ, रविवार दि. २५ जानेवारी रोजी सायंकाळी ७.०० वा. : सुस्वर भजन तसेच सोमवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ८.०० वा. : श्री सत्यनारायणाची महापूजा व दुपारी १२.०० ते ४.०० वा. महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.
तरी आपण सहपरिवार, मित्रमंडळींसह सहभागी होऊन उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन समिती मार्फत करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा