आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २९ जून, २०२३

काटी गावात आषाढीनिमित्त विद्यार्थ्यांची दिंडी

ठाणे : पालघर जिल्ह्यातील काटी गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त गावात पायी दिंडी काढली. शिक्षण व आधुनिकतेच्या जगात अध्यात्माची ही सांगड पालक व ग्रामस्थांना सुखावणारी ठरली. विद्यार्थ्यांच्या दिंडी निमित्त सर्व गावात आनंदाचे वातावरण दिसून आले. गावातील शाळा 100% प्रगत असून शाळेत सातत्याने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केले जातात.
      आषाढी एकादशी निमित्त केंद्र प्रमुख रमेश चव्हाण सर, मुख्याध्यापक जाधव सर यांची संकल्पना आणि प्रविण बडे सर यांच्या निजोजनातून दिंडी पार पडली. गावातून सर्व ग्रामस्थांनी दिलेला उत्स्पूर्त प्रतिसाद उल्लेखनीय होता. गावात ठिकठिकाणी या विद्यार्थी दिंडीचे स्वागत करण्यात आले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ईबीडी बुद्धिबळ स्पर्धेत धनश्री बुद्धिबळ अकादमीच्या स्मित, शुभम आणि विवानचे निर्भेळ यश

मुंबई: (प्रेम पंडित )- धोरणात्मक कौशल्य आणि तरुण बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत ईबीडी बुद्धिबळ स्पर्धा (EBD Chess Tournamen...