नवी मुंबई( सुभाष हांडे देशमुख ): महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या मुंबई प्रादेशिक विभागाचे आठवे द्वैवार्षिक अधिवेशन ७ नोव्हेंबर २०२५ रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात उत्साही वातावरणात पार पडले. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान फेस्कॉम चे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी भूषविले.
या कार्यक्रमात अभिनेते प्रशांत दामले यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रसंगी आईस्कान चे अध्यक्ष दिगंबर चापके. फेस्कॉम चे अध्यक्ष अरुण रोडे, मुंबई विभाग फेसकॉम चे अध्यक्ष सुरेश पोटे, अरुण रोडे आणि कार्यकारणी सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
जेष्ठ व्यक्तीं ने उर्वरित जीवनात शांत राहणे , ध्यान करणे, छंद जोपासणे, आनंदी राहणे असे मत लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केले.
उपस्थितांशी संवाद साधताना गणेश नाईक म्हणाले की आज ज्येष्ठांच्या बाबतीत हिंसाचाराच्या अनेक घटना घडत आहेत. मुलांनी ज्येष्ठ व्यक्तींना त्रास न देता त्यांचा सांभाळ करावा. आजची मुले उद्याचे ज्येष्ठ नागरिक आहेत. याचे भान त्यांनी ठेवावे. असं सांगून ते म्हणाले की, ज्येष्ठांच्या हिंसाचाराच्या विषयावरती उत्तम नाटक प्रशांत दामले यांनी घेऊन यावे. त्यांना जे काही सहकार्य लागेल ते आम्ही देऊ.
नवी मुंबई हे ज्येष्ठ नागरिकांना राहण्यासाठी परिपूर्ण असे शहर आहे. नवी मुंबईत ज्येष्ठांसाठी अनेक विरंगुळा केंद्र आहेत. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेत ज्येष्ठांसाठी एक कक्ष आहे . असे अण्णासाहेब टेकाळे यांनी सांगितले.
माधवबागचे डॉक्टर मिलिंद सरदार यांनी ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी याविषयी सखोल माहिती दिली. त्याचप्रमाणे अपोलो हॉस्पिटल, माधवबाग, पितांबरी व संजीवनी ब्लड ग्रुप ॲप यांनी आपला सहभाग दर्शवून ज्येष्ठांना उपयोगी अशी आरोग्य विषयक माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पल्लवी देशपांडे यांनी खूप सुंदरपणे केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा