गडब ( अवंतिका म्हात्रे) आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक संदर्भात पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पेण जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाली. यावेळी तालुका अध्यक्ष दयानंद भगत,जिल्हा सेवादल अध्यक्ष गंगाधर पाटील ,जिल्हा उपाध्यक्ष विकास म्हात्रे ,जिल्हा युवक उपाध्यक्ष तयलेश पाटील, पेण विधानसभा सचिव प्रभाकर लांगी, पेण तालुका युवक अध्यक्ष विकास पाटील, पेण विधानसभा महिला चिटणीस ललिता ठाकूर, पेण विधानसभा महिला सचिव अवंतिका म्हात्रे, तालुका महिला उपाध्यक्ष जयश्री पाटील, महिला उपाध्यक्ष सुनीता घरत, तालुका सचिव नरेंद्र म्हात्रे, तालुका उपाध्यक्ष भरत महाडिक, शिक्षक सेल अध्यक्ष नथुराम म्हात्रे, विद्यार्थी तालुका अध्यक्ष साजन पाटील, कोळी सेल तालुका अध्यक्ष बिपीन पाटील, सेवादल तालुका अध्यक्ष अशोक म्हात्रे, जिता जिल्हा परिषद मतदारसंघ अध्यक्ष सुदर्शन पाटील, दादर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप म्हात्रे ,शिहू जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद तांडेल, वाकरूळ पंचायत समिती अध्यक्ष प्रमोद पाटील ,सहसचिव प्रमोद म्हात्रे, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर ,युवक उपाध्यक्ष आदित्य पाटील, युवक उपाध्यक्ष कैलास रुठे, दत्ताराम म्हात्रे ,सुधीर पाटील, वासुदेव पाटील ,जिते पंचायत समिती अध्यक्ष धर्मेंद्र म्हात्रे , विद्यार्थी उपाध्यक्ष गणेश घरत, दत्ता ठाकूर, कळवे माजी उपसरपंच श्रीधर पाटील आदी पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुका अध्यक्ष दयानंद भगत ह्यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आमदार अनिकेत भाई तटकरे ह्यांच्या नेतृ्वाखाली लढाविण्याचा निर्णय एकामुखी घेण्यात आला असून इच्छुक उमेदवार ह्यांना अर्ज मागविण्यात आले असून पेण तालुक्यासाठी आमदार अनिकेत भाई तटकरे हे जे निर्णय घेतील ते सर्वांना मान्य असणार असल्याचे कार्यकर्त्यांनी बैठकी दरम्यान सांगितले आहे .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
महिला वादक, गायिकांच्या सादरीकरणाने संगीतप्रेमी तृप्त
नवी मुंबई : लता मंगेशकर, आशा भोसले या नामांकित गायिकांनी अजरामर केलेली एकाहुन एक सुंदर, श्रवणीय गाणी "रहे ना रहे हम" ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा