आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १८ मार्च, २०२६

अष्टपैलु व्यक्तिमत्त्व प्रमोद न सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय विकासरत्न प्रेरणा पुरस्कार 2026 जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): समृद्धी पर्यटन सांस्कृतिक सेवा विकास ट्रस्ट यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय विकासरत्न प्रेरणा पुरस्कार 2026 हा पुरस्कार यंदा प्रमोद सूर्यवंशी यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराबाबत त्यांना अधिकृत निवडपत्र देण्यात आले आहे.
ट्रस्टच्या संस्थापिका मीनाक्षी पाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान दिला जातो. यावर्षी विविध क्षेत्रांतील योगदान लक्षात घेऊन प्रमोद सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे.
या संदर्भातील पुरस्कार वितरण सोहळा 19 एप्रिल रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमात त्यांना राज्यस्तरीय विकासरत्न प्रेरणा पुरस्कार 2026 देऊन गौरविण्यात येणार आहे.
या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याचा गौरव होत असून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना यामुळे प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अग्निसुरक्षेसाठी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे 'हवाई कवच'; 'फायर सेफ्टी ड्रोन'ची यशस्वी निर्मिती!

रायगड/ अवंतिका म्हात्रे वाढत्या आगीच्या घटनांवर आणि अरुंद गल्ल्यांमधील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी, शहापूर येथील ...