मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरेगांव पुर्व येथे मेनगेटवर महानंदा डेअरीतील कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या करीता एका कामगाराची पत्नी सौ. प्रिया भारत मिटके या भगिनी गेली ५ दिवसापासून अन्न त्याग करून उपोषणाला बसलेल्या आहेत आजचा सलग ५ वा दिवस आहे.गेल्या २०२२ च्या दोन्ही अधिवेशनात कामगारांना व्ही आर एस देणे विषयी सभागृहात चर्चा होऊनही आणि आता नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन आज मा.आमदार सचिन भाऊ आहिर.उपनेते. श्री.रवींद्र वायकर.शिवसेना आणि मा. आमदार प्रविण भाऊ दरेकर आणि इतर नेत्यांनी महानंदा मधील कामगारांच्या मागण्या बाबतीत सभागृहात लक्ष वेधून घेतले.व काही निर्णय कामगार यांच्यासाठी चांगले निर्णय आंदोलन नंतर सरकारने घेतलेले आहेत असं पत्रही आलं आपण सर्व मुंबईतील राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचे वतीने मुंबई मधील गुणवंत कामगार पुरस्कार विजेते असोसिएशनचे सदस्य यांनी महानंद डेअरी गोरेगांव मुंबई येथे उपोषण स्थळी महानंद डेअरी वाचाविण्यासाठी उपोषणाला बसलेल्या आमच्या माऊली सौ. प्रिया मिटके ताई यांना जाहीर पाठिंबा दिला व त्यांचे मनोबळ वाढवण्यासाठी मुंबई तील गुणवंत कामगार बहुसंख्येने हजर होते. त्यामध्ये श्री.दत्तात्रय शां.शिरोडकर.श्री.सदानंद काशिद श्री.केरबा डावरे.श्री.भरत सकपाळ श्री संपत तावरे .श्री.जगताप,श्री.संजय चामे,श्री.सत्यवान भास्कर, श्री.अनिल चासकर ,श्री.संदीप बारी,श्री.लहू भोर,श्री.प्रभाकर कांबळे,आज हजर होते .व महानंदा डेअरीच्या कामगार बरोबर आहोत.असं आम्ही आमच्या असोसिएशनच्या वतीने पत्र देऊन पाठिंबा असल्याचे जाहीर केले . राज्य सरकारने लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावून महानंदा डेअरी वाचवणे काळाची गरज असल्याचेही यावेळी कामगारांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले..
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
मोहन जोशी यांना 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' घोषित...
मुंबई (गणेश तळेकर) मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' यंदा ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांना घोषि...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा