कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण कु.रक्षिता बन्सीनाथ ठाकुर-खिडकाळी या विद्यार्थीनीच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी ७.०० वा. पडलेगावातून ढोलच्या तालावर 'वंदे मातरम्, भारत माता की जय, जय जवान जय किसान' अशा घोषना देत विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. या दरम्यान गावातील ठाणे महानगरपालिका प्राथमिक मराठी शाळेवर ग्रामस्थ व दोन्ही शाळेतील विद्यार्थी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहन करण्यात आले. तद्नंतर सरस्वती मंदिर पडलेगांव येथील शाळेवर ध्वजारोहन करण्यात आले. राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि झेंडा गीत तसेच विद्यार्थ्यांची भाषणे, शिक्षिका सौ.भारंबे मॕडम यांनी सुमधूर आवाजात देश गीत गायन करून देशभक्तीचे वातावरण निर्माण केले.
यावर्षीचा ध्वजारोहन कु.रक्षिता ठाकुर-खिडकाळी हिच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता १० वी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी कडून ध्वजारोहन करण्यात येईल.हा क्रांतिकारी निर्णय सरस्वती मंदिर पडलेगांव मधील शिक्षक आणि संस्था यांनी घेतलेला आहे. सदर निर्णयाचे पंचक्रोषितील शाळांमध्ये कौतुक होत आहे.
या वर्षी प्रथम ,द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.हरेश पाटील (संस्थेचे उपाध्यक्ष), श्री.किशोर म्हात्रे (सेक्रेटरी), श्री.बाळाराम पाटील (सह सेक्रेटरी ), श्री.जनार्दान म्हात्रे (खजिनदार), श्री.रामचंद्र भोईर (सदस्य), श्री.यशवंत पाटील (सदस्य), श्री.प्रभाकर खरबे (सदस्य), श्री.पंढरीनाथ पाटील (महाराष्ट्र राज्य पो.पाटील संघटनेचे अध्यक्ष), श्री.गोपिनाथ खरबे (समाजसेवक) तसेच ग्रामस्थ मंडल पडलेगांव, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग,पालक सभेचे अध्यक्ष श्री.दिनेश ठाकुर ,उपाध्यक्ष श्री.नामदेव पाटील त्याचप्रमाणे पंचक्रोषितील पालक वर्ग आणि विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा