आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १५ ऑगस्ट, २०२४

जनता विद्यालय आंगवली येथील रांगोळीचे अशोक अणेराव यांच्या हस्ते उदघाटन

कोकण (शांताराम गुडेकर )भारताचा आज ७८ वा स्वातंत्र्य दिवस सर्वत्र  उत्साहात साजरा झाला.रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर  तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील मु. पो आंगवली गावातील शैक्षिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आंगवली विकास मंडळ मुंबई संचालित जनता विद्यालय आंगवली येथे ध्वजारोहणनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.यावेळी आंगवली गावातील  पुरुष,महिला व विद्यार्थी,युवकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली.दरम्यान रांगोळीचे उदघाटन मा.अशोक अणेराव, सरपंच अरुणा अणेराव,मुख्याध्यापक चव्हाण सर, निर्भीड पत्रकार संदीप गुडेकर,पोलीस पाटील सोनारवाडी अब्दुल बोबडे, सामाजिक कार्यकर्ते अमित रेवाळे,आंगवली पोलीस पाटील सतीश अणेराव, सर्व शिक्षक आणी विद्यार्थी यांच्या उपस्थित करण्यात आले.यावेळी राष्ट्रगीत नंतर विद्यार्थी वर्गाला, सदस्यांना भारताच्या तिरंगा विषयी आपल्या मनात नेहमी आदर तसेच सैनिक आणि वीराच्या भावनांचा आदर असायला हवा.१५ ऑगस्ट हा आपला राष्ट्रीय सण आहे.त्यामुळे प्रत्येकाच्या मनात देशा विषयी राष्ट्रभक्तीची भावना असायला हवी.देशासाठी आपण नेहमी जागृत राहिले पाहिजे असे सूचक मार्गदर्शन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मोहन जोशी यांना 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' घोषित...

मुंबई (गणेश तळेकर)  मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' यंदा ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांना घोषि...