आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १५ ऑगस्ट, २०२४

भांडूपगावात ७८वा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा

मुंबई: सार्वजनिक पूजा समिती, भांडूपगाव यंदा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. यानिमित्ताने १५ ऑगस्ट, २०२४ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्य सैनिक व देशभक्त यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सार्वजनिक पूजा समितीचे अध्यक्ष श्री. परशुराम कोपरकर यांनी ध्वजारोहण केले. यावेळी राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त प्रा. जयवंत पाटील यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना ते म्हणाले की " देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ होणार नाही याची तरुणांनी खबरदारी घेऊन, भारताचे संविधान सुरक्षित राहण्यासाठी कटिबद्ध असणे गरजेचे आहे. तसेच आज घरोघरी तिरंगा फडकवला जात आहे, पण या तिरंग्याची अस्मिता जपणे आजच्या तरुणांचे कर्तव्य आहे. ". याशिवाय सार्वजनिक पूजा समितीचे उपाध्यक्ष श्री धनंजय म्हात्रे यांनी पूजा समितीच्या अमृत महोत्सवी वर्षात होणाऱ्या कार्यक्रमांचा तपशील सांगितला. 
     यावेळी भांडुपगावातील अनेक ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र कुरकुटे, महेश पाटील, रमेश शेलार, उषा काकडे, डॉ. देविदास किनी, मयुर म्हात्रे, रजनी पाटील, प्रवीण पवार, विजय एकनाथ कडव, दयानंद पवार, शिवा सुवरे, सोनम भावेश कोपरकर,वर्षा वाघिलकर, संजय उलवेकर, पल्लवी खारकर,उमा मळेकर, प्रमिला कोपरकर, चारुशीला पाटील, स्मिता मिसाळ,इ. कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आदिवासी पाड्यावर बालदिन साजरा

मुंबई: कांजूरमार्ग पूर्व येथील एक सेवाभावी संस्था यांच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये जागतिक बालदिन साजरा केला ...