आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४

लाभार्थ्यांनी पी.एम.किसान योजनेच्या लाभासाठी 12 ऑगस्ट पासूनच्या कॅम्पमध्ये सहभागी व्हावे- कृषी सहसंचालक श्री.अंकुश माने

ठाणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम.किसान) अंतर्गत 18 व्या हप्त्याचे वितरण लवकरच होत आहे. केंद्र शासनाने योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थीचे बँक खाते आधार संलग्न करणे, eKYC प्रमाणीकरण, लँड सिडिंग करणे या बाबी बंधनकारक केलेल्या आहेत. त्याशिवाय त्यांना योजनेचा पुढील हप्ता अदा होणार नाही.
          दि.12 ऑगस्ट 2024 पासून पी.एम.किसान संपृक्तता मोहिमेला सुरुवात होत असून त्या काळात पात्र लाभार्थ्यांची नवीन नोंदणी करणे (विशेषतः पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातील आदिम जमातीतील-कातकरी लाभार्थ्यांची नोंदणी करणे), ई-केवायसी, आधार सिडिंग, स्वयंनोंदणी मान्यता पूर्ण करणे, 5% लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे, लँड सिडिंग करणे या बाबी करण्यात येणार आहेत. राज्यात सद्य:स्थितीत जवळपास 2.21 लाख व 1.92 लाख लाभार्थींची अनुक्रमे बँक खाते आधार संलग्न करणे व eKYC करणे प्रलंबित आहे.
         या कॅम्पची कार्यवाही कृषी विभाग व ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (VNO) मार्फत युद्धपातळीवर सुरू असून कृषी सहाय्यकांना गावे वाटप करण्यात येऊन प्रलंबित लाभार्थ्यांच्या याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कॅम्पबाबत प्रत्येक गावामध्ये नोटीस लावून, दवंडी देऊन तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर प्रचार प्रसिद्धी करण्यात आली आहे. दि.12 ऑगस्ट रोजी कोकण विभागामध्ये एकूण 23 हजार 848 लाभार्थ्यांची ई-केवायसी तर 29 हजार 82 लाभार्थ्यांची आधार सिडिंग शिल्लक आहे. यामध्ये ठाण्यामध्ये 3 हजार 509, पालघरमध्ये 5 हजार 361, रायगडमध्ये 9 हजार 580, रत्नागिरीमध्ये 3 हजार 567, सिंधुदूर्गमध्ये 1 हजार 831 इतक्या लाभार्थ्यांची ई-केवायसी बाकी आहे. त्याचप्रमाणे ठाण्यामध्ये 3 हजार 29, पालघरमध्ये 4 हजार 463, रायगडमध्ये 9 हजार 842, रत्नागिरीमध्ये 7 हजार 744, सिंधुदूर्गमध्ये 4 हजार 4 इतक्या जणांची आधार सिडिंग शिल्लक आहे. 
         प्रलंबित लाभार्थ्यांनी या कॅम्पमध्ये सहभागी होवून त्यांची eKYC करण्यासाठी कृषी विभागाच्या मदतीने पी.एम.किसान पोर्टलवरील Farmers corner मधील eKYC-OTP आधारित सुविधेद्वारे अथवा सामायिक सुविधा केंद्र(CSC) च्या मदतीने अथवा पी.एम.किसानच्या नवीन अँप्पद्वारे Face authentication च्या माध्यमातून ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे. लँड सिडिंग महसूल विभागामार्फत करण्यात येणार आहे. तसेच संबंधित लाभार्थ्याला जर बँक खाते आधार संलग्न करायचे असेल तर कॅम्पवेळी बँकेच्या सहकार्याने बँक खात्यास आधार संलग्न करावा किंवा या कॅम्पवेळी पोस्टमास्तर यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) खाते उघडावे व 18व्या हप्त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आदिवासी पाड्यावर बालदिन साजरा

मुंबई: कांजूरमार्ग पूर्व येथील एक सेवाभावी संस्था यांच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये जागतिक बालदिन साजरा केला ...