आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४

जॉना जे बुथेलो एज्युकेशन फॉउंडेशन ट्रस्ट /अनाथ आश्रम मालाड पश्चिम ( मढ)येथे ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात संपन्न

मुंबई(शांताराम गुडेकर/मोहन कदम ) पश्चिम उपनगर येथील जॉना जे बुथेलो एज्युकेशन फॉउंडेशन ट्रस्ट /अनाथ आश्रम मालाड पश्चिम (मढ)येथे श्री. अनिल रामनाथ वडके यांच्या हस्ते ७८ व्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी साई परिवाराचे ट्रस्टी श्री.मंगेश अंकुश रासम,जॉना जे बुथेलो एज्युकेशन फॉउंडेशन ट्रस्ट /अनाथ आश्रम मालाड पश्चिम ( मढ)ट्रस्टी दीपाली दीपक चव्हाण, साई परिवाराचे अंकुश मंगेश रासम, प्रतीक चव्हाण, रोहन चव्हाण, डिसोझा मॅडम,धनश्यामदास सराफ कॉलेजमधील कार्तिक खंडेलवाल, क्रिषी मुद्धा, आदित्य मिश्री, श्लोक शेट्टी, आंकाशा पुरोहित आणि कॉलेज मधील सर्व सहकारी यावेळी उपस्थित होते.शिवाय आश्रम बाळ-गोपाळ,भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनी यामध्ये भाग घेऊन हा ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या जल्लोषात व उत्साहात पार पाडला. ध्वजारोहण श्री. अनिल रामनाथ वडके यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाल्यावर राष्ट्रध्वजाला सलामी देवून राष्ट्रगीत गाण्यात आले.यावेळी राष्ट्रगीत नंतर विद्यार्थी वर्गाला, सदस्यांना भारताच्या तिरंगा विषयी आपल्या मनात नेहमी आदर तसेच सैनिक आणि वीराच्या भावनांचा आदर असायला हवा.१५ ऑगस्ट हा आपला राष्ट्रीय सण आहे.त्यामुळे प्रत्येकाच्या मनात देशा विषयी राष्ट्रभक्तीची भावना असायला हवी.देशासाठी आपण नेहमी जागृत राहिले पाहिजे असे सूचक मार्गदर्शन करण्यात आले.साई परिवाराकडून वर्षभरात विविध कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक, पर्यावरण आदी उपक्रम राबविले जातात.झेंडा वंदननंतर कॉलेजच्या मुलांनी आश्रमातील मुलांना खाऊ आणि अन्य जीवनावशक साहित्य वाटप केले. त्यांच्या सोबत विविध खेळ खेळत आनंद साजरा केला.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जॉना जे बुथेलो एज्युकेशन फॉउंडेशन ट्रस्ट /अनाथ आश्रम मालाड पश्चिम ( मढ)चे पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, सर्व विद्यार्थी, साई परिवार ट्रस्टी, कॉलेज पदाधिकारी, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.समस्त कर्मचारी,मान्यवर, हितचिंतक, देणगीदार यांच्ये आयोजकांतर्फे आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गडब येथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्यासाठी दिलेल्या निवेदनाला यश

गडब (अवंतिका म्हात्रे) पेण तालुक्यातील गडब येथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्यासाठी पेण विभाग नियंत्रक दीपक घोडे व पेण डेपो इन...