आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

जसिंता लोपिस यांची सेवानिवृत्ती

मुंबई (गणेश हिरवे) सेंट टेरेसा बॉईज हायस्कूल वांद्रे पश्चिम येथील उपुख्यध्यापिका जसिंता लोपीस ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाल्या.१९८९ पासून त्या या शाळेत शिक्षिका म्हणून कामाला लागल्या होत्या.या काळात त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले की जे विविध ठिकाणी मोठमोठ्या हुद्यावर कामाला आहेत.हिंदी आणि मराठी विषय त्या आवडीने शिकवीत असत.आज त्यांच्या निवृत्ती कार्यक्रम निमित्ताने माजी मुख्यद्यापक फादर जेरोम, सध्याचे शाळेचे मुख्यद्यापक फादर निकी, शाळेचे मॅनेजर फादर हेनरी, अडमीन ऑफिसर फादर शीनोय, नव्यानेच उपमुख्यद्यपीका म्हणून कार्यभार स्वीकारणाऱ्या टीचर निकुल डिसोजा, नवीन पर्यवेक्षक सर फिलिप रॉड्रिग्ज आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते टीचर जसिंता यांचा शाल, श्रीफळ, आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील आयुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी सर्वांनीच त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमासाठी लोपिस कुटुंबातील सभासद आणि अनेक माजी विद्यार्थी शिक्षक आवर्जून उपस्थित होते.नव्यानेच पदभार स्वीकारणारे टीचर निकुल आणि सर फिलिप यांचा देखील सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...