जोगेश्वरी (पूनम पाटगावे)- जोगेश्वरी पूर्वेकडील मजास नाल्यावरील समर्थ नगर येथील पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत होता. मागील पंधरा दिवसापासून या पुलाचे काम चालू आहे. पुलाचे काम करताना वारंवार पाण्याच्या पाईपलाईन ला गळती लागते. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. या पुलाचे काम करताना पाईपलाईन ला गळती लागल्याने सदर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा तर काही भागात पाणी न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला.
याबाबत नागरिकांनी पाण्याचा टँकर उपलब्ध करून देण्याबाबत मनसेकडे मागणी केली. नागरिकांच्या या पाण्याच्या समस्येकरिता मनसेचे शाखाध्यक्ष रमाकांत नर, विभागाध्यक्ष बाबुभाई पिल्ले, उपाध्यक्ष प्रवीण मर्गज, उपविभाग अध्यक्ष दिगंबर मांजरेकर यांच्या मार्गदर्शनातून महापालिकेशी संपर्क करून १०,००० लिटर पाण्याचा टँकर नागरिकांना उपलब्ध करून दिला. सदर परिसरातील नागरिकांनी पाण्याचा टँकर मिळाल्याने मनसे व महापालिकेचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा