आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

वॉर्ड स्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी पांचाळ व विचारे या शिक्षकांचा सजावटीसाठी पुढाकार

मुंबई (गणेश हिरवे) नुकतेच बृहन्मुंई उत्तर विभागाचे वॉर्ड स्तरीय विज्ञान प्रदर्शन कुर्ला पश्चिम येथील गांधी बाल मंदिर शाळेत दिनांक १२ ते १४ डिसेंबर २०२३ कालावधीत यशस्वी रित्या पार पडले.यावेळी शाळेत रांगोळी काढण्यापासून ते फलक लीहिण्या पर्यंत शाळेतील शिक्षक विश्वनाथ पांचाळ आणि रत्नकांत विचारे यांनी पुढाकार घेतला होता.
यावेळी शाळेच्या मेन गेटपासून इतर अनेक दर्शनी भागात या दोघांनी आकर्षक अशा रांगोळ्या, फुलांची सजावट आणि नीटनेटके सुवाच्च अक्षरात फलक लेखन केलेले दिसून येत होते.प्रदर्शनासाठी उपस्थित राहणारे लोक देखील या सर्व सजावटीकडे निरखून पहात होते.शाळेत कोणताही कार्यक्रम असला की हे दोन्ही शिक्षक काय काय आकर्षक सजावट करता येईल यासाठी कायमच पुढाकार घेत असतात.अनेकांनी वेळोवेळी या दोघांचे कौतुक केले असून असे शिक्षक आमच्याकडे आहेत याचा शाळेला नक्कीच अभिमान असल्याचे मुख्यध्यापक अनिल पांचाळ यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आदिवासी पाड्यावर बालदिन साजरा

मुंबई: कांजूरमार्ग पूर्व येथील एक सेवाभावी संस्था यांच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये जागतिक बालदिन साजरा केला ...