आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १६ डिसेंबर, २०२३

शेतकरी व मुंबई गोवा महामार्गासाठी पुकारण्यात आलेला बेमुदत साखळी उपोषण ०४ दिवसानंतर मागे

रायगड वृत्त 
कासु-पांडापूर : दिनांक-१२ डिसेंबर २०२३ पासून शेतकरी व मुंबई गोवा महामार्गासाठी मागील ०४ दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुजाण नागरिक, स्थानिक शेतकरी यांच्या वतीने जनआक्रोश आंदोलन चालू होते.
उपोषणाच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाकडून कासु ते पांडापूर येथील ३००-४०० मिटर रस्त्याचे DLC कामाला सुरुवात करण्यात आली व दिवसाला धुळीवर पाणि मारण्याचे काम करण्यात आले.अधिकारी पहिल्याच दिवशी चर्चेला आले परंतु आम्हाला आता तोंडी चर्चा मान्य नसून लेखी स्वरूपात उत्तरे द्यावीत अशी भूमिका उपोषणकर्ते, सुजाण नागरिक व शेतकरी यांच्या वतीने घेण्यात आली.पहिल्याच दिवशी १२ उपोषणकर्ते व २५०-३०० कोकणकर, सुजाण नागरिक, स्थानिक रहिवाशी व शेतकरी यांनी सहभाग नोंदवला. 
   दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:०० वाजल्यापासून पाण्याचे टँकर वाढवून सरकारमुळे धुळीचे माहेर घर झालेल्या कासु ते पांडापूर या टप्यात पाणि ०८ टँकरच्या माध्यमातून पाणी मारण्याचे काम सुरु झाले तर दुसऱ्या बाजूला DLC चे काम चालु होते. उपोषणकर्ते आपल्या उपोषणावर ठाम्ब असल्याने सायंकाळी लेखी उत्तरे घेऊन प्रशासन उपोषण स्थळी पोहचले परंतु अर्धवट व थातूर मातुर उत्तरे आम्हाला मान्य नसून उपोषणकर्ते आपल्या मतांवर एकमत राहिले व दुसरा दिवस देखील निकाला अभावी गेला.
    तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांची संख्या वाढली. उपोषणाची बातमी वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली.अनेक संघटना,वरिष्ठ सदस्य, स्थानिक रहिवाशी यांनी उपोषणाला पाठिंबा दर्शवीला.प्रशासनाला वेळ देण्यात आला. तर दुसऱ्या बाजूने उपोषणात तिव्रता आणण्याचे काम करण्यात आले. अधिकारी यांच्या सोबत फोनद्वारे संपर्क करून लेखी उत्तर न मिळाल्यास सदर उपोषण ठिकाणाहून उठून तुमच्या कार्यालयात येऊन बसु असे ठणकावून सांगण्यात आले, परंतु आम्हाला वेळ द्यावा म्हणून प्रशासनाकडून विनंती करण्यात आली.
     चौथ्या दिवसाच्या बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात झाली. तेथील स्थानिकांनी आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल आवाज उठविण्यासाठी पाठिंबा दर्शवीला शेकडो महिला विविध विभागातून उपोषण स्थळी दाखल झाल्या. उपोषणाला तीव्र स्वरूपाची धार येताना दिसत होती. प्रशासन उपोषण कर्त्यांचा अंत पाहत होते, पण उपोषणकर्ते शांत बसणारे नव्हते. अखेर स्थानिकांचा पाठबल, आंदोलनाची तिव्रता बघून प्रशासनाला अखेर लेखी स्वरूपात उत्तरे द्यावी लागली व शेतकऱ्यांचा नाला प्रश्न याची रिपोर्ट व पुन्हा प्रत्येक्ष स्थळ पाहणी करत सर्वांच्या एकमताने ०४ दिवसाने बेमुदत साखळी उपोषण मागे घेण्यात आला.
   चौथ्या दिवशी आंदोलनाची गर्दी पाहता या महिला कुठून पैसे देऊन आणलेल्या न्हवत्या किंवा गाड्या पाठवून आणलेल्या न्हवत्या तर स्वखर्चाने आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल उपोषण स्थळी दाखल झाल्या.
     या सर्व आंदोलनात पेण -कासू विभागातील सुजाण नागरिक कु.चैतन्य उषा लक्ष्मण पाटील,श्री.रुपेश दर्गे श्री .धनाजी शेळके ,कु.रुचिता हिरा खंडू तांडेल ,डॉ.भावना पाटील ,कु.चेतन तांडेल ,कु.सिद्धेश जुईकर , अभय पाटील मागील ०४ दिवसापासून आपला कामधंदा सोडून उपोषणाला बसलेले शेतकरी,स्थानिक रहिवाशी यांनी मोलाचे सहकार्य केले.तसेच जनआक्रोश समिती तील काही सदस्यांनी पाठिंबा दर्शवून स्थानिकांना पाठबल दिले व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.अरुण शिवकर , श्री. हरिष बेकावडे , श्री.राजेंद्र झेमसे , श्री.गजानन भोईर यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन तथा सहकार्य केले 
    जर शासनाने पुन्हा फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर यापुढील लढाई तीव्र स्वरूपाची असेल असा ईशारा सुजाण नागरिक,स्थानिक रहिवाशी,शेतकरी यांनी दिला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आदिवासी पाड्यावर बालदिन साजरा

मुंबई: कांजूरमार्ग पूर्व येथील एक सेवाभावी संस्था यांच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये जागतिक बालदिन साजरा केला ...