आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील गावांच्या विकासकामांचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी घेतला आढावा

अलिबाग :- महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील समाविष्ट 22 ग्रामपंचायतीच्या विकासकामाची आढावा बैठक काल (दि.30 ऑगस्ट 2021) रोजी जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात घेण्यात आली. 

     या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, महाराष्ट्र सामाजिक ग्रामपरिवर्तन अभियानाचे जिल्हा कार्यकारी अधिकारी रत्नशेखर गजभिये, तालुका समन्वयक  धनंजय पाटील,  दत्तात्रय गायकवाड,अवधूत पाटील व श्रीराम पन्हाळकर उपस्थित होते.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील समाविष्ट गावांच्या विकासकामे तसेच प्रलंबित कामांबद्दल माहिती घेण्यात आली. तसेच पुढील काळात इतर विभागांच्या सहकार्याने गावातील सामाजिक विकास करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी मार्गदर्शन केले.

     यावेळी उपस्थित महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन चे जिल्हा कार्यकारी अधिकारी रत्नशेखर गजभिये व तालुका समन्वयक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांना तालुक्यातील गावातील उद्दिष्टांबद्दल सविस्तर माहिती दिली.या बैठकीत मनरेगामधील कामांचा महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तनमध्ये समाविष्ट असलेल्या गावांसाठी प्राधान्याने उपयोग, अभियानातील  गावांतील लोकांचे 100% कोविड लसीकरण,स्वदेशच्या माध्यमातून आधी निवडलेल्या गावांव्यतिरिक्त इतर गावांचा समावेश व तळागाळातील लोकांनाही या अभियानाचा लाभ, या अभियानांतर्गत उपजीविका साधने व उदरनिर्वाह होण्याकरिता महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच मनरेगाच्या माध्यमातून सहकार्य, महसूल विभागाच्या ई-पीक पेरा योजनेबाबत अभियानातील गावांमध्ये प्रबोधन करून मोहीम यशस्वी करणे,माझं गाव सुंदर गाव ही योजना यशस्वी करणे, महिला सक्षमीकरण, बचतगट निर्मिती, गटविकास अधिकाऱ्यांच्या समन्वयातून समृद्धी बजेट बनविणे आदि विषयासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

     या बैठकीच्या निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. किरण पाटील यांनी अभियानातील सर्व गावांमध्ये मनरेगा अंतर्गत श्रमदान, 15 वा वित्त आयोग, सीएसआर फंड व सामाजिक संस्थांच्या मदतीने लोकांना लाभ मिळावा,याकरिता कामे करण्यासंदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले तसेच विविध विभागांतर्गत प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, अशा सूचना केल्या.शेवटी श्री.रत्नशेखर गजभिये यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...