आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

कोकण सुपूत्र राहुल भडवळकर यांच्या रेकॉर्डिंग स्टुडिओचा उद्घाटन सोहळा संपन्न !

मुंबई :(दिपक  कारकर)- जीवनात प्रत्येक व्यक्तीच्या अंगी अवगत असलेल्या विविध कला त्यास कधीच गप्प बसु देत नाही,मात्र जिद्द,मेहनत,घेण्याची आवड असणाऱ्या व्यक्तींना हे यश निश्चितच मिळते.कोकण भूमीतील अनेक सुपुत्र आज स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा मुंबई सारख्या शहरात उमटविताना दिसत आहेत.असंच एक चिपळूण तालुक्यातील डुगवे गावचे भूमिपुत्र राहुल रामचंद्र भडवळकर या रंगभूमीवरील हौशी कलाकाराने चक्क मुंबईत आपलं स्वतःचं "एक धडपड रंगभूमीसाठी" असं ओम साई म्युझिक स्टुडिओ या नावाने - अवेरे बंधू चाळ,महाराष्ट्र नगर,आप्पापाडा मालाड ( पूर्व ) येथे उभारले आहे आणि याचा उद्घाटन सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दि.२९ ऑगस्ट २०२१ रोजी संपन्न झाला.

   आई-वडिलांच्या संस्कारातून वाढेलला राहुल मुंबईत वास्तव्य करताना आपला कौटुंबिक उदरनिर्वाह करता-करता लोककलेची प्रचंड आवड असणाऱ्या या कलाकाराने आपली खरी सुरुवात नमन/जाखडी कलेतून केली.सर्वप्रथम ओम साई नमन नाट्य मंडळ,( मालाड - पूर्व ) यामधून त्यांनी कलाकार भूमिका साकारली. त्यांना शाहिर राजेंद्र टाकले यांनी मार्गदर्शन करत या कलाकाराला घडवले.गेले कैक दिवस स्वतःच मुंबईत रेकॉर्डिंग स्टुडिओ निर्मित करून एक व्यावसायिक सुरुवात आणि त्याचबरोबर मुख्य हेतू नवोदित गायकांना अल्प खर्चात व्यासपीठ निर्माण करण्याचे स्वप्न त्यांचं प्रत्येक्षपणे साकार केलं आहे.

    या स्टुडिओची निर्मिती करताना माझे जन्मदाते आई-बाबा व कलेतील सोबती दिनेश,प्रविण, सुहास,रुषाल,सुशांत,निलेश,सिद्धेश,अंकित,जयेश व मित्र परिवार यांनी मोलाचं योगदान दिले व हा स्टुडिओ उभा राहिला असे राहुल याने बोलताना सांगितले.या सोहळ्याला शाहीर विकास लांबोरे,शाहीर तुषार पंदेरे,शाहीर सचिन धूमक,शाहीर प्रविण कुळये,संगितकार बेंजो मास्टर सतीश साळवी,ऑक्टोपॅड वादक - स्वप्नील गुरव,युवा समाजसेवक दीपक कारकर,कलाकार प्रशांत पाष्टे आणि मित्रमंडळी यांची उपस्थिती होती.कलाकारांना स्फूर्ती देणाऱ्या राहुल भडवळकर यांच्याबद्दल अनेकांनी शब्दसुमनांनी स्तुती करत त्यांस पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...