आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१

1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनसाठी मुंबई येथे सहविचार सभा संपन्न


मुंबई | प्रतिनिधी : 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवानिवृत्ती नंतर 1982 ची जुनी पेन्शन मिळावी , यासंदर्भात मुंबईतील घाटकोपर मधील महेश्वरी विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे सहविचार सभा संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांनी मुंबईतील 2005 पूर्वीचे नियुक्त 532 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना एकत्रित करून संघटित लढा प्रबळ करणे कारण राज्यातील इतर सर्व विभागातील 2005 पूर्वी नियुक्त कर्मचार्‍यांना जूनी पेन्शन मिळते , ती आपल्यालाही मिळालीच पाहिजे असे मत व्यक्त केले. राज्याचे लोकप्रिय व संवेदनशिल मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे , उपमुख्यमंत्री आजितदा पवार व महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांची पुढील काही दिवसांत भेट घेवून पत्र देण्याचे सर्वानुमते ठरले.

           यावेळी संघटनेचे राज्य सहसचिव भानुदास शिंदे यांनी प्रास्ताविक मांडले. सचिन ढेरंगे  व संगीता सरोदे यांनी प्रशासकीय बाबींवर प्रकाश टाकला. तसेच याप्रसंगी मुख्याध्यापक धनंजय काळे , मुख्याध्यापक अशोक परदेशी , मुख्याध्यापक लोकरे सर , प्रा. शितलप्रसाद  बडगुजर , प्रा. कलीम शेख , अनिल करवंदे , गणीभाई शेख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अब्दुल जब्बार , समिक्षा तावडे , सविता गटे , कविता कालेकर , संतोष काळू , सुरेखा शिंदे ,  वृषाली पत्की ,  अजयकुमार पांडे , महेश धारकर , रविंद्र भालेराव , प्राची तवटे , अनघा हरचेकर , हेमंत बोढारे , सुभाष गायकवाड , मुकुंद शिंदे आदी शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते. सहविचार सभेचे सूत्रसंचालन संघटनेचे मुंबई सचिव दत्तात्रय शेंडकर यांनी केले. आभार मुख्याध्यापक विद्याधर राणे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...