आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

आर टी ई अंतर्गत प्रवेश नाकारणाऱ्या तसेच अवैधरित्या शुल्क आकारणी करणाऱ्या बदलापूर मधील खाजगी इंग्रजी शाळेला दणका ; मा. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी तक्रारीची तात्काळ घेतली दखल, शाळेला दिले लेखी आदेश

पालक प्रतिनिधी डॉ. अमितकुमार गोईलकर यांच्या पाठपुराव्याला यश

आदर्श वार्ताहर वृत्तसेवा,ठाणे : राज्यातील खाजगी इंग्रजी शाळांच्या फिवाढ आणि फि वसुली विरोधात सर्वत्र गोंधळाचे आणि संतापाचे वातावरण असतानाच बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ (RTE) अंतर्गत सन २१-२२ सालचे प्रवेश नाकारल्याबाबत तसेच ज्यांना प्रवेश दिले आहेत त्यांच्याकडून इतर अशैक्षणिक सुविधांच्या नावाखाली फि वसूल केली जात असल्याच्या आणि फी न दिल्यास शिक्षण बंद केल्याबाबतच्या अनेक तक्रारी पालक प्रतिनिधी तथा रा काँ पा डॉक्टर्स सेल ठाणे जिल्हा सरचिटणीस डॉ. अमितकुमार गोईलकर यांचेकडे प्राप्त झाल्या होत्या.

   त्यानंतर या पालकांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करून तसेच आवश्यक कागदोपत्री संदर्भ पुरावे घेऊन मा. जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्या आसनाकडे तक्रार नोंदवली. मा. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन मा. गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती, अंबरनाथ यांना या प्रकरणी कारवाई करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले.

डॉ. अमितकुमार गोईलकर

   या आदेशानुसार संबंधित शाळा प्रशासनाला मा. गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या दालनात हजर रहायला सांगितले. त्यानुसार पालक प्रतिनिधी डॉ. अमितकुमार गोईलकर यांचे स्वयंसेवक मंडळ यांनी मा. गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनात अधिकाऱ्यांची भेट घेऊन पालकांची बाजू मांडली असता शाळा प्रशासनाचे गैर प्रकार उघड झाले. शाळा सुरू होऊन तीन महिने पूर्ण झाले तरी या शाळेने RTE प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना खोटी कारणे सांगून, पालकांची दिशाभूल करून शाळेत प्रवेश देण्यास  मनाई केल्याचे निष्पन्न झाले.

यावर मा. गटशिक्षण अधिकारी यांनी शाळा प्रशासनाला मुख्याध्यापकांच्या नांवे सक्त आदेश दिले ते पुढील प्रमाणे-1) आपली शाळा अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त असली तरी त्यावर्षीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे.2) सदरचे विद्यार्थी RTE प्रवेश प्रक्रियेच्या प्रतिक्षा यादीतील असून प्रवेश नाकारलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नियमानुसार तात्काळ प्रवेश देण्यात यावेत.3) सदर शाळेला अल्पसंख्यांक दर्जा जरी मिळालेला आहे तरी या अनुषंगाने उचित प्रक्रिया राबवून सण २०२२-२३ पासून RTE प्रवेश पक्रियेतून ही शाळा वगळण्यात येईल याची नोंद घ्यावी.4) सबब RTE प्रवेश अंतर्गत २०२१-२२ मध्ये निवड झालेल्या सर्व प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावा.5) एकही पात्र विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील. तसेच 6) सन २०२१-२२ च्या RTE च्या प्रवेश अथवा फी संदर्भात आपल्या शाळेची एकही तक्रार या कार्यालयास प्राप्त होणार नाही याची दक्षता घ्यावी.

वरीलप्रमाणे लिखित आदेश माननीय गटशिक्षण अधिकारी यांनी संबंधित शाळेला दिला. या आदेशानुसार RTE अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून. सर्व पालकांनी डॉ. अमितकुमार गोईलकर यांचे आभार मानले. या आदेशाची प्रत कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच RTE प्रवेश आणि शुल्क संदर्भात कुठल्याही शाळेच्या पालकांची तक्रार असल्यास 867258725 या क्रमांकावर किंवा जनसंपर्क कार्यालयात सम्पर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे डॉ. गोईलकर यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...