आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

अविनाश शां. लाड - राजकारणातील समाजसेवक

    महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नुकतीच नवीन कार्यकारिणी जाहीर केली त्यामध्ये नवी मुंबई माजी उपमहापौर श्री अविनाश लाड यांची चिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.गेली २० वर्षे सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या या हरहुन्नरी माणसाचा हा बहुमान पक्ष श्रेष्ठींनी केला आहे. हे श्रेय त्यांच्या कामाला आहे.श्री. लाड विद्यार्थी असल्यापासून शैक्षणिक क्षेत्रात आहेत. कमवा आणि शिका हे तत्त्व त्यांनी अंगीकारले. वडिलांच्या व्यवसायात अर्धा दिवस काम केले आणि पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. रयत शिक्षण संस्थेच्या मॉडर्न कॉलेज नवी मुंबई येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्याठिकाणी  ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्याशी त्यांचा परिचय झाला तो अखेपर्यंत कायम होता. एन डी पाटील साहेबांचे माणस पुत्र म्हणूनच ते ओळखले जातात.लाड गेली १५ वर्षे रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद आहेत.साखरापा आणि राजापूर येथील संस्थेचे व्यवस्थापन ते आस्थेने विचारपूस करतात आणि वेळप्रसंगी स्वखर्चाने कामे करतात.सन २००० साली लाड नवी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले.कुटुंबात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ विद्यार्थी असताना केलेले काम त्यांच्या उपयोगी आले. पहिल्याच वर्षी त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श नगरसेवक पुरस्कार प्राप्त झाला. त्यातून अनेक कामे करण्याची ऊर्जा मिळाली.राजकारणात असूनही ते सामाजिक आणि शैक्षणिक व सहकार, शेती क्षेत्रात जास्त रमले. कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई, तालुका शाखा संगमेश्वर, कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संगमेश्वर, संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतपेढी आणि कुणबी सहकारी बँक मुंबई या कोकणातील कुणबी समाजाच्या प्रमुख संस्थांतून ते कार्यरत आहेत. याशिवाय नवी मुंबई येथील डझनभर संस्थांमध्ये त्यांचे कार्य आजही सुरू आहे. काही संस्था त्यांनी स्वतः सुरू केल्या आहेत.

          श्री. लाड कुणबी सहकारी बँकेचे सल्लागार समिती सदस्य आहेत. गेली ५ वर्षे मुंबईतील संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतपेटीचे अध्यक्ष असून त्यांच्याच  कारकीर्दीत संगमेश्वर आणि देवरूख येथे नवीन शाखा सुरू करण्यात आल्या. देवरूख येथे सुरू असलेल्या मामासाहेब भुवड कॉलेज ऑफ कॉमर्स अँड हाँटेल मॅनेजमेंट सुरू करण्यात सहभाग होता. दापोलीतील रामराजे कॉलेज आणि कुणबी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे कॉलेज सुरू व्हावे यासाठी ज्या प्रमुख व्यक्तींनी पुढाकार घेतला त्यापैकी एक लाड आहेत.श्री.अविनाश लाड तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. एक वेळा केवळ नऊ मतांनी पराभव झाला. त्याच त्यांच्या पत्नी निवडून आल्या. गेली २१ वर्षे त्यांच्या घरी नगरसेवकपद आहे.मुंबईत वास्तव्य करून ते कोकणात गावी जाऊन सार्वजनिक जीवनात काम करीत असतात. सन २०१६ साली कोकणातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब उर्फ शामराव पेजे यांच्या जन्मशताब्दी वर्षात कोकणातील अनेक ठिकाणी शेती, सहकार व शिक्षण विषयक मेळावे आयोजित करण्यात आले. शामराव पेजे स्मृती न्यास रत्नागिरी यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्यात श्री. लाड अग्रेसर होते. नवी मुंबई आणि मुंबईतील षण्मुखानंद येथे त्यांनी भव्य सभा आयोजित करून कोकणातील कुणबी व तत्सम बहुजन समाजातील अनेक नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणले होते.श्री. लाड यांनी राजापूर लांजा मतदार संघातून विधान सभा निवडणूक लढविली. थोड्या मतनी अपयश आले परंतु मतदारांशी संपर्क कायम ठेवला. कोरोना महामारीत ते सर्वप्रथम मदतीसाठी धावून गेले. गावोगावी फिरून वैद्यकीय साधने आणि धान्य वितरण केले.शहरी भागात राहूनही ते ग्रामीण भागात जास्त रमले. शेती आणि सहकार यातूनच कोकणात प्रगती होईल अशी त्यांची धारणा आहे. त्यासाठी त्यांनी अनेक कृषी तज्ञांच्या सोबत शेती मेळावे आयोजित केले.श्री.अविनाश लाड यांच्या सेवाभावी कार्याची पक्ष श्रेष्ठींनी दखल घेतली आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चिटणीस म्हणून नियुक्ती केली आहे. श्री. लाड यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि कामाची ही पावती आहे.त्यांना हार्दिक शुभेच्छा.

- पी. डी. ठोंबरे , संचालक,कुणबी सहकारी बँक, मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...